शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

शांती-सुख समाधान

By admin | Updated: April 29, 2014 15:28 IST

योग हे ‘शास्त्र’ आहे आणि ते आचरण्याचे ‘शास्त्र’ आहे. कोणतेही शास्त्र हे जीवनाच्या आयुष्यमानात पूर्णत: समजणे हे अशक्य असते, हे लक्षात घेणे आवश्यक असते. ?

योग हे ‘शास्त्र’ आहे आणि ते आचरण्याचे ‘शास्त्र’ आहे. कोणतेही शास्त्र हे जीवनाच्या आयुष्यमानात पूर्णत: समजणे हे अशक्य असते, हे लक्षात घेणे आवश्यक असते.?

योगशास्त्रातील सातवे ‘ध्यान’ याविषयी ओळख करून घेतल्यावर आता आठवे अंग म्हणजे समाधी होय. याविषयी समजून घेण्यापलीकडे वेगळे काही सांगता येईल असे वाटत नाही; कारण सामान्यत: याविषयी आवड व ओढ फारच कमी लोकांना असते.सर्वसामान्य लोकांना आवश्यक असते ती शांती, सुख व समाधान. समाधी याचा अर्थ या तिन्हींचा समावेशक म्हणून समाधान असे मानले जाते. आज समाजाचे चित्र आपल्यासमोर आहे, त्यात या तिन्हींचा अभावच आढळतो. विचारांती असे लक्षात येते, की जे काही गुन्हेगारीचे वातावरण दिसते आहे किंवा पुण्य-पापादी संकल्पनांना डावलून भयानक व दु:खदायी कृत्ये केली जातात, त्यामागील जी मानसिकता आहे, ती वासना, असंतुष्टता आणि असमाधान यांमध्येच आहे. एकमेकांवर अवलंबून असलेले हे तिन्ही घटक तसे वेगवेगळे नाहीत आणि तसेच ते वरवर दिसतही नाहीत. कोणतीही व्यक्ती स्वत:तील अज्ञान, वासना, असंतुष्टता व असमाधान ओळखण्याची वा पारखण्याची इच्छा बाळगत नाही. इतरांमधील दोष मात्र चटकन लक्षात येतात व स्वत:मधील दोष अजिबात दिसत नाहीत. ते अज्ञान आणि अस्मिता यांच्या पांघरुणाखाली दडलेले असतात. इतरांच्या चुका डोळ्यांत तेल घालून धुंडाळणे ही अजब मानसिकता सर्वांमध्येच दिसत असते; परंतु आपल्यात चुका वा दोष कुठे आहेत, हे सहजगत्या दृष्टिगोचर होत नाही; लक्षात येत नाही. काही वेळा ते सोयीस्कररीत्या दुर्लक्षिलेदेखील जातात; म्हणूनच ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हटले आहे. कुणी दोष दाखवून दिले, तर दोषपरिहारही शोधता येतो. दुरुस्ती करता येते; अन्यथा अहंकार जोर धरतो.प्रथमत: योग हे एक दर्शन आहे. तत्त्वदर्शन हा त्याचा उद्देश आहे. दर्शन हे आरशासारखे आहे. आरशात जसे आपले प्रतिबिंब, आहे तसेच दिसते; त्याचप्रमाणे या योगदर्शनात डोकावले असताना आपले स्वत:चे प्रतिबिंब आहे तसे दिसते. तत्त्वज्ञान हा जीवनाचा केवळ आदर्श नव्हे, तर ते ‘तत्त्व’ धुंडाळण्याचे काम असते. ते तत्त्व समजण्यासाठी जे अ-तत्त्व आहे, अ-सत्त्व आहे, निर्थक आहे, असत्य आहे म्हणजेच असत् आहे ते सर्वच निवडून बाजूला करण्याइतकी विवेकजागृती होणे आवश्यक असते. ते या योगाभ्यासाने साधायचे आहे आणि तदनुषंगाने पुढले पाऊल टाकायचे आहे.या जागृत विवेकामुळे दृष्टी तशी सृष्टी न राहता, भोवतालची सृष्टी बदललेली जाणवते; किंबहुना बदलता येते. यालाच म्हणतात ‘समाधान’. योगाभ्यासाने दोष जेव्हा कमी होत जातात, तेव्हाच समाधान ही वृत्ती बळावत जाते. वासनेचा क्षय होत गेला, की समाधान ही स्थिती प्राप्त होते; म्हणून समाधी म्हणजे समाधान, हाही एक अर्थ आहे. चित्त विचलित न होता समस्थितीत असते. या समस्थितीत द्वंद्वस्थितीला जागा नसते.समाधी याचा आणखी एक अर्थ म्हणजे समबुद्धी व स्थिरबुद्धी होय. भावनेच्या भरात बुद्धी चंचल होता कामा नये; बुद्धीचे पतनही होता कामा नये. बुद्धीची स्थिरता महत्त्वाची होय. अष्टांग योगाची साधना करताना साधकाची वर्तणूक, समज यांत योग्य बदल घडणे आवश्यक असते. समाधी ही अगोदरच्या सप्तांगांचा परिणाम म्हणून संभवते. नीतियुक्त वर्तणूक, बुद्धियुक्त समज, त्यागयुक्त कर्माची जाण, आसक्तिरहित कर्मवृत्ती, कर्मबंधातून मुक्त राहण्याची संवेदनशीलता, निश्‍चयात्मक बुद्धिप्रवाह, चित्ताची सत्त्वशीलता, सुख-दु:खांत अथवा प्राप्ती-अप्राप्तीच्या संदर्भात चित्त समत्व स्थिती ठेवण्याची कुशलता इत्यादी गुण साधकाने संपादावे लागतात. समाधीसाठी आत्मसंतुष्टी, अनुद्विगन्ता, स्थिरबुद्धी, समत्व बुद्धी, रागद्वेषादींपासून मुक्त होत ममत्त्वाचा मोह सोडत जगण्याची प्रवृत्ती समृद्ध करावी लागते, तेव्हाच सप्तांगांचा अभ्यास वैराग्याच्या दृष्टिकोनातून अर्थपूर्णरीत्या म्हणजे सरावाच्या पाट्या न टाकता, स्वत:मध्ये होत असणार्‍या चित्तपरिवर्तनावर लक्ष ठेवत समाधीकडे वळावे लागते.प्राणायाम, प्रत्याहार, धारणा व ध्यान ही एक सात्त्विक चौकड आहे. या चारही अंगांमधील अंगभूत सांगड लक्षात घेणे आवश्यक असते, तरच समाधीत प्रवेश मिळू शकतो; अन्यथा नाही. तेव्हा समाधीसाठी पूर्वतयारी ही प्राणायामापासून होत असते. स्वामी रामदास म्हणतात त्याप्रमाणे यम, नियम, आसन, प्राणायामाने प्रापंचिक संसार नेटका केला गेला, की या सात्त्विक चौकडीच्या आधाराने आध्यात्मिक संसार थाटता येतो.आता, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्य मनुष्य योगाभ्यास करतो ते आरोग्य मिळावे, शारीरिक रोग संभवू नयेत, मन:शांती लाभावी व रोगमुक्त व्हावे यासाठी होय. ही आरोग्याविषयी जागृती असणेही रास्त आहे. यापेक्षा खोलवर योगविषयात शिरणे सर्वसामान्यांना शक्य नसते. याविषयी पूर्वीदेखील सांगून झालेले आहे. तेव्हा आपल्यापुरते आपणास काय हवे आहे, हे उचलण्याची मुभा योगशास्त्राने दिली आहे. तसेच, सरतेशेवटी योग हे ‘शास्त्र’ आहे आणि ते आचरण्याचे ‘शास्त्र’ आहे. कोणतेही शास्त्र हे जीवनाच्या आयुष्यमानात पूर्णत: समजणे हे अशक्य असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तेव्हा योगाभ्यास करणारे सर्व जण समाधीपर्यंत पोहोचतातच असे नाही, तसे अपेक्षितही नाही; पण समजून घेता मात्र निश्‍चित येते. त्यासाठी निराश होणेदेखील अयोग्य होय. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.तेव्हा ते समजून घेणे, प्रयत्न करणे, त्या दिशेने वाटचाल करणे साधकाचे काम आहे. तसेच, जेव्हा ते जमत नाही, समजत नाही, उमजत नाही, तेथवर मजल जात नाही हे लक्षात येते, तेव्हा उंच उडी घेणे अथवा आकाशी उडणेदेखील चुकीचे होय. अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा यांतील फरक लक्षात घेणे येथे योग्य ठरेल. आसन आणि प्राणायाम ही दोन अंगे या दृष्टीने महत्त्वाची होत आणि सर्वसामान्यांना या दोन अंगांचा अभ्यास, जीवनाच्या मार्गावर सुरळीत व सुरक्षित जाण्यास निश्‍चितच योग्य होय. ही दोन्ही अंगे माणसाचे पाय जमिनीवर ठेवण्यास भाग पाडतात. यामधून पुढील अंगाकडे जाण्यास आवश्यक असलेल्या गुणांचे संवर्धन करण्यास मात्र येथे निश्‍चितच मदत होते. चित्तावर योग्य संस्कार घडत जातात. त्यातून सुख, शांती व समाधान लाभल्यास त्यापेक्षा वेगळे असे आजच्या युगात काय पाहिजे आहे?तेव्हा समाधी म्हणजे काय, हे जाणण्यापूर्वी साधनेत आपण कुठवर उंची गाठली आहे, हे लक्षात घेणे आवश्यक असते.लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगाचार्य, लेखिका योगसाधनेचे तत्त्वज्ञान मांडणार्‍या विचारवंत आहेत.)