शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अग्निपरीक्षेतून जाताना..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:05 IST

जगभरातील पर्यटकांची पसंती असलेल्या इथल्या लोकप्रिय पर्यटनस्थळांची अवस्था भग्नावस्थेतील गूढ, भयकारी स्थळांमध्ये झाली आहे.

ठळक मुद्देऑस्ट्रेलियातील सण, उत्सवांच्या या काळानं पहिल्यांदाच इतका भीतिदायक अनुभव घेतला..

- आशय देवजंगलांना आगी लागण्याचे प्रकार ऑस्ट्रेलियात तसे नेहमीचेच. दरवर्षी अशा आगी इथे लागतात. पण यावेळी ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनार्‍यावरील जंगलांना  आतापर्यंतची सर्वाधिक भयानक आग लागली आहे. जंगलातील वणव्यांचा हा ‘सीझन’ यंदा नेहमीपेक्षा थोडा लवकर आला. समोर येईल त्याला कवेत घेत न्यू साउथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि दक्षिणेकडच्या काही भागावर आक्रमण करत या आगीनं आता ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-पूर्व किनार्‍यापर्यंत झेप घेतली आहे. जगभरातील पर्यटकांची पसंती असलेल्या इथल्या लोकप्रिय पर्यटनस्थळांची अवस्था भग्नावस्थेतील गूढ, भयकारी स्थळांमध्ये झाली आहे.ऑस्ट्रेलियातील सण, उत्सवांच्या या काळानं पहिल्यांदाच इतका भीतिदायक अनुभव घेतला. किनारपट्टीवरील मल्लाकुटा या रमणीय शहरात मी आणि माझ्या कुटुंबानं अनेक हॉलीडे मौजमस्तीत घालवले होते, तेच ठिकाण आज पूर्णपणे बेचिराख झालेलं आहे. माझ्या या आवडत्या शहराचे हे हाल उघड्या डोळ्यांनी पाहताना मनाला अतिशय वेदना होताहेत. पण असं असलं तरी आशेची एक वातही इथे तेवते आहे. अक्षरश: अग्निपरीक्षेचा हा काळ. पण या आपत्तीत एकमेकांना मदत करण्याच्या भावनेनं सारेच नागरिक एकत्र येताहेत. आपलं सुख-दु:ख वाटून घेताहेत. जोडीला स्थानिक प्रशासनानं ठिकठिकाणी मदतकेंद्रं स्थापन केली आहेत. सरकारी मदत पोहोचेल, तेव्हा पोहोचेल; पण स्थानिक व्यापार्‍यांनी त्याआधीच लोकांना अन्नधान्याचं फुकट वाटप सुरू केलं आहे. शीख समुदायाचा यासंदर्भातील वाटा लक्षणीय आहे. ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातूनही पैसे जमवले जात आहेत. सेलिब्रिटीजही आपल्याला शक्य ती सारी मदत मनापासून करताहेत. माजी क्रिकेटपटू शेन वॉर्ननंही आपल्या ‘बॅगी ग्रीन कॅप’च्या लिलावातून आलेले लाखो डॉलर्स आपद्ग्रस्तांना दिले. नागरिकांच्या बचावासाठी इतर देशांतूनही मदत आणि अग्निशामक जवानांचा ओघ सुरू आहे. या आपत्तीच्या प्रसंगी प्रत्येक नागरिक आपापल्या परीनं काही ना काही करतो आहे. प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रय}ांची पराकाष्ठा करतो आहे. सर्वस्व गमावूनही आपली मान उन्नत ठेवण्याचा प्रय} करतो आहे. याच ‘फायटिंग स्पिरिट’साठी तर ऑस्ट्रेलिया ओळखला जातो! आगीत सापडलेले नागरिक, प्राणी आणि वनसंपदा वाचवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी तर अक्षरश: आपले प्राण पणाला लावले आहेत.ऑस्ट्रेलियात असे वणवे दरवर्षी पेटतात. पूर्व किनारपट्टीच्या भागात त्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ग्रामीण ऑस्ट्रेलिया आणि तेथील जंगलांना नेहमीच धोका पोहोचतो. त्यापासून दूर राहण्याचा प्रय} आम्ही नागरिक दरवर्षीच करतो; पण यावेळची आग फारच धगधगती आणि अक्राळविक्राळ आहे. 2009च्या ‘ब्लॅक सॅटर्डे’ नंतरची ही दुसर्‍या क्रमांकाची आग आहे. या आगीच्या संकटातून वाचण्यासाठी आणि त्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारनं ‘नॅशनल बुशफायर रिकव्हरी एजन्सी’ स्थापन केली आहे.‘सर्व काही संपलंय’ असं वाटत असताना एकजुटीनं उभा राहिलेला समाज, सरकारची भक्कम साथ, ऑस्ट्रेलियाचे शेजारी देश आणि जगानं दिलेला पाठिंबा यामुळे या अग्निप्रलयात झालेल्या वाताहतीतूनही आशेची एक नवी वात तेवताना दिसते आहे. 

- आशय देव, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

aashay.deo@gmail.com