शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

लॅपटॉप प्रत्येकासाठी!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 06:00 IST

दुर्गम भागातल्या मुलापर्यंत माहिती आणि शिक्षणाचे  साधन पोहोचवायचे तर काय करावे लागेल? निकोलस निग्रोपॉन्टे या द्रष्ट्या माणसाने त्यासाठी  एका लॅपटॉपची निर्मिती करायला घेतली.  येव बेहार या संवेदनशील व्यक्तीने त्याचे डिझाइन तयार केले.  अविश्वसनीय कमी किंमत, एक प्रभावी, दणकट,  कमी ऊर्जेवर चालणार्‍या, पर्यावरणपूरक लॅपटॉपची  निर्मिती त्यांनी केली. त्याने इतिहास घडवला. हैती, रवांडापासून ते पाकिस्तानपर्यंत अनेक देशांतली  लाखो मुले आज ‘ओएलपीसी’ वापरताहेत.

ठळक मुद्देकुठल्याही वातावरणात सुरक्षित राहू शकतील आणि सहज उघड-बंद करता येतील अशा पद्धतीने डिझाइन केलेले अँँटेना आज ‘ओएलपीसी’ची एक अविभाज्य ओळख आहे.

- हृषीकेश खेडकर

2005 साली एका द्रष्ट्या माणसाने विचारांचे बीज पेरले, जगातल्या प्रत्येक मुलाला स्वत:चा संगणक मिळाला तर आपण मानव उत्क्र ांतीच्या इतिहासात आत्तापर्यंत न आजमावलेली संभाव्यता प्रत्यक्षात आणू शकू. करायचं एकच, जगाच्या दुर्गम भागात राहाणार्‍या मुलापर्यंत माहिती आणि शिक्षणाचे हे साधन घेऊन पोहोचायचं. ठरलं तर मग, शंभर अमेरिकन डॉलरमध्ये (2005 साली भारतीय चलनात याची किंमत साधारण   4500 रुपये) लॅपटॉप बनवायचा. निकोलस निग्रोपॉन्टे नावाचा हा द्रष्टा जगद्विख्यात मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बोस्टन (एमआयटी) येथे संगणक विभागात प्राध्यापक म्हणून काम करत होता. कला आणि गणित याची लहानपणापासून आवड असणार्‍या निकोलसची पक्की धारणा होती की मुलं निसर्गत:च ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक असतात, तरीदेखील बहुतेक देशांमध्ये शिक्षणासाठी कमी संसाधने उपलब्ध असल्याने, ज्ञानार्जन ही तीव्र जागतिक समस्या म्हणून भेडसावते आहे. आपल्या आईवडिलांप्रमाणे कायम दरिद्री आणि विभक्त आयुष्य जगत असताना ज्ञानाचा प्रकाश काय किमया घडवू शकतो याची साधी कल्पनादेखील या मुलांना नाहीये. जर या मुलांना त्यांचा स्वत:चा लॅपटॉप मिळाला तर जगाकडे पाहण्याची त्यांची दारं उघडतील, ही मुलं एकमेकांशी जोडली जातील, ज्ञानाचं भंडार त्यांच्यासाठी खुलं होईल आणि ही त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने एक मोठी संधी ठरेल. आपल्या या विचारांना कृतीत बदलत 2005 साली निकोलसने ना नफा तत्त्वावर आधारित ‘वन लॅपटॉप पर चाइल्ड’ (ओएलपीसी) असं यथार्थ नाव असणारी एक संस्था स्थापन केली. आपली डिझाइनची गोष्ट आज या ‘ओएलपीसी’ नावाच्या एका भन्नाट डिझाइनचा मागोवा घेणार आहे. अविश्वसनीय कमी किमतीत एक प्रभावी, दणकट, कमी ऊर्जेवर चालणार्‍या, पर्यावरणपूरक लॅपटॉपची निर्मिती आपण डिझाइनच्या दृष्टिकोनातून उलगडणार आहोत. ही गोष्ट सुरू होते एमआयटीमधल्या  मीडिया लॅब नावाच्या एका जादुई प्रयोगशाळेतून. आजच्या जगात माहिती आणि तंत्नज्ञान क्षेत्नात मूलभूत कामगिरी करणार्‍या ज्या काही लोकांची नावं अत्यंत आदराने घेतली जातात, जी लोकं हे जग सर्वार्थाने बदलण्यासाठी कायम प्रयोगशील असतात अशा अनेक व्यक्ती या मीडिया लॅबचे विद्यार्थी आहेत किंवा लॅबच्या कामाशी निगडित आहेत. 1985 साली निकोलसने या मीडिया लॅबची स्थापना केली. माहिती-तंत्नज्ञान क्षेत्नातील काही बुद्धिवान लोकांना एकत्न आणून निकोलसने या लॅपटॉपसाठी लागणार्‍या टेक्निकल प्लॅटफॉर्मची निर्मिती केली. या निर्मितीतले काही उल्लेखनीय टप्पे म्हणजे आत्तापर्यंत संगणक क्षेत्नात कधीही विचारात न घेतलेल्या अनेक राष्ट्रीय भाषांचा ‘ओएलपीसी’मध्ये समावेश करण्यात आला, दुर्गम भागात इंटरनेटचा अभाव असतानादेखील ‘ओएलपीसी’ एकमेकांशी सहज जोडले जाऊन माहितीची देवाण-घेवाण करू शकतात आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ओएलपीसी’ वापरणारा विद्यार्थी अर्थपूर्णदृष्ट्या त्याची माहिती ‘ओएलपीसी’ वापरणार्‍या इतर विद्यार्थ्यांबरोबर ओपन सोर्स (मुक्त स्रोत)मार्गे वितरित करू शकतो आणि इतर विद्यार्थी त्या माहितीत स्वत:ची भर घालून मजकूर अधिक माहितीपूर्ण बनवू शकतात. या आणि अशा अनेक कारणांमुळे ‘ओएलपीसी’चे तंत्नज्ञान नि:संशय त्याच्या काळाच्या बरेच पुढचे होते. तयार तंत्नज्ञान आता मुलांपर्यंत पोहोचवणे हे निकोलस समोरचे मोठे आव्हान होते. या कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी आता गरज होती प्रॉडक्ट डिझायनरची. येव बेहार नावाच्या एका अत्यंत हुशार आणि संवेदनशील डिझायनरशी निकोलसची गाठभेट झाली आणि त्याची परिणीती म्हणजे ‘ओएलपीसी’ने पुढे इतिहास घडवला. अत्यंत शांत आणि उत्तम र्शोता असलेला येव पहिल्याच भेटीत निकोलसच्या विचारांमध्ये सामावला गेला आणि अत्यंत अकल्पनीय परिस्थितीतदेखील उत्तम प्रॉडक्ट देण्याचे आव्हान त्याने स्वीकारले. सगळ्यात पहिले इतका स्वस्त असलेला, हा लॅपटॉप नक्कीच चीप (म्हणजेच कमी प्रतीचा) असणार! ही इतरांच्या मनात असणारी गैरसमजूत बदलणं गरजेचं होतं. त्यासाठी हा लॅपटॉप बनवताना कुठेही दुय्यम प्रतीचं साहित्य वापरलं जाणार नाही याची दखल येवने घेतली. लॅपटॉपसाठी दोन उच्च तांत्रिक क्षमतेचे वायफाय अँँटेना बनवण्यात आले. कुठल्याही वातावरणात सुरक्षित राहू शकतील आणि सहज उघड-बंद करता येतील अशा पद्धतीने डिझाइन केलेले हे अँँटेना आज ‘ओएलपीसी’ची एक अविभाज्य ओळख आहे. लॅपटॉपचा कि-बोर्ड म्हणजे अखंड रबराचा एक मोठा तुकडा आहे. या पद्धतीने तो बनवण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे, एकसंध कि-बोर्ड असल्याने यात पटकन धूळ किंवा पाणी आत जाऊ शकत नाही आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे, पाहिजे त्या भाषेमधला कि-बोर्ड या रबरी तुकड्यावर छापून पटकन तयार करता येतो. ‘ओएलपीसी’ इतर लॅपटॉपच्या तुलनेत दहा पटीने कमी ऊर्जा वापरतो, तसेच जिथे अजूनही वीज पोहोचलेली नाही अशा दुर्गम भागात याला चार्ज करण्यासाठी एक हँडल देण्यात आले आहे, जे सहज फिरवताना लागलेल्या मानवी ऊर्जेचा वापर लॅपटॉपची बॅटरी चार्ज करण्यासाठी केला जातो. याचबरोबर सौरऊर्जेवरदेखील हा लॅपटॉप चार्ज करता येऊ शकतो. येवच्या मते मुलांना पोताचं (टेक्श्चरचं) ग्रहण पटकन होतं, म्हणून ‘ओएलपीसी’ला बाहेरून अंगावर शहारा आल्यासारखा पोत देण्यात आला आहे. याचा दुसरा फायदा म्हणजे या पोतामुळं बाह्यभागाचे ओरखड्यांपासून संरक्षण होते. निदान एका शाळेतील मुलांना स्वत:चा लॅपटॉप ओळखता यावा, यासाठी लॅपटॉपवर असणारे ‘एक्सओ’ हे चिन्ह 400 वेगवेगळ्या रंगांच्या जोड्यांमध्ये बनवले गेले. हैती, रवांडा, इथिओपिया, घाना, पेरू, उरुग्वे, अफगाणिस्तान, पॅलेस्टाइन, पाकिस्तान अशा अनेक देशांमधली लाखो मुले आज ‘ओएलपीसी’ वापरताहेत. या मुद्दय़ांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की लॅपटॉप डिझाइन करताना किती बारीकसारीक गोष्टींचा विचार येवने केला असेल. येवला वाटत होतं की, लॅपटॉप त्याच्या यंत्नाच्या व्याख्येच्या पुढे जाऊन जेव्हा मुलाचा मित्न बनेल तेव्हा अज्ञानाविरु द्धच्या या लढाईत कुठेतरी आशेच्या किरण दिसायला लागेल. निकोलसने पेरलेल्या बीजाचे येवने ज्या पद्धतीने पोषण केले त्यातून आज ‘ओएलपीसी’ नावाचा एक ज्ञानार्जनाचा अचाट वृक्ष तयार झाला आहे. अज्ञानाविरु द्धची लढाई जिंकायची असेल तर असे अनेक वृक्ष लावणे ही आजची काळाची गरज आहे.

hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)