शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Career: इमारत रचनेचे वेड आहे? मग हा कोर्स तुमच्यासाठीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 11:59 IST

Career: केवळ इमारतींचे आराखडे तयार करणे म्हणजे वास्तुकला का? तर नक्कीच नाही. वास्तुकला ही एक कला आहे आणि त्याचबरोबरीने ते एक विज्ञानही आहे. या दोन्हींचा अवकाश व विस्तार अतिशय व्यापक आहे.  

- आनंद मापुस्कर,करिअर मार्गदर्शक

केवळ इमारतींचे आराखडे तयार करणे म्हणजे वास्तुकला का? तर नक्कीच नाही. वास्तुकला ही एक कला आहे आणि त्याचबरोबरीने ते एक विज्ञानही आहे. या दोन्हींचा अवकाश व विस्तार अतिशय व्यापक आहे.  एखाद्या लहानशा खोलीच्या रचनेपासून ते संपूर्ण शहराच्या नियोजनापर्यंत अनेक आराखडे वास्तुविशारद बनवत असतात. यासाठी अर्थातच भूमिती आणि अभियांत्रिकी तत्त्वांचा आधार घेतला जातो. तो वास्तुकलेचा पाया आहे. समकालीन समाजजीवन, संस्कृती, राजकारण, चाली-रूढी, वाणिज्य-व्यापार अशा कित्येक गोष्टींचे प्रतिबिंब वास्तुकलेत उमटत असते. उपयुक्तता, सौंदर्यशास्त्र आणि स्थैर्य हे वास्तुकलेचे तीन मूलभूत घटक आहेत.  

वास्तुकला शिक्षण भारतातील वास्तुकला शिक्षणाबाबतचे सर्व नियम, त्याबाबतचे वेगवेगळे निर्णय ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्टर’ या मान्यताप्राप्त संस्थेद्वारे घेतले जातात. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (बी. आर्च.) हा पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. त्याच्या प्रवेशासाठी ‘नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर’ (नाटा) देणे आवश्यक आहे.  

शैक्षणिक पात्रताविद्यार्थ्याने १२ वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांमध्ये सरासरी किमान ५० टक्के गुण मिळविणे तसेच १२ वीमध्ये सर्व विषयांमध्ये एकत्रितपणे किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. ‘नाटा’ वर्षातून दोनदा घेतली जाते. ‘नाटा’ परीक्षेच्या स्वरूपामध्ये दर काही वर्षांनी बदल करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘नाटा’ची तयारी सुरू करण्यापूर्वी ‘नाटा’च्या वेबसाइटवरून परीक्षेची माहिती घेणे योग्य ठरेल. आर्किटेक्चरच्या पदवी प्रवेशासाठी नाटा व १२ वीच्या गुणांचे वेटेज ५० : ५० टक्के असते. नाटाच्या माहितीसाठी https://www.nata.in ही वेबसाइट पाहावी. वास्तुकला अभ्यासक्रम, महाविद्यालये तसेच अन्य माहितीसाठी ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ची https://coa.gov.in/ ही वेबसाइट पाहावी. अधिक माहितीसाठी https://cetcell.mahacet.org/ ही वेबसाइट पाहावी.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनEducationशिक्षण