लिब्रा नावाचं डिजिटल नाणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 06:00 AM2020-12-06T06:00:00+5:302020-12-06T06:00:08+5:30

क्रिप्टोच्या बाजारात आता थेट मार्क झुकेरबर्गची फेसबुक ही कंपनी उतरत आहे. आपले स्वतःचे चलन ही कंपनी सुरू करत आहे. या चलनाचं नाव आहे लिब्रा.

A new digital coin called Libra.. | लिब्रा नावाचं डिजिटल नाणं

लिब्रा नावाचं डिजिटल नाणं

Next
ठळक मुद्देही करन्सी नियमात बसवण्यासाठी लिब्रा असोशिएशन कार्यरत असणार आहे. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाही सहभागी होता येईल

 

तुमच्याकडे भरमसाठ लक्ष्मी आहे पण हा पैसा कधीच प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणार नाही... असे चलन म्हणजे क्रिप्टो.. बिटकॉइनमुळे क्रिप्टोकरन्सी आता जवळपास साऱ्यांनाच माहिती झाली आहे. जगात अनेक प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी आहेत. पण त्यावर वॉच ठेवणारी अशी कोणतीही यंत्रणा नाही. या करन्सीमध्ये गुंतवणूक करणारे काही जण मालामालही झाले आहेत तर काही धनकुबेर मोठ्या प्रमाणात पैसा गमावूनही बसले आहेत. कारण, यातली सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे सुरक्षा. आपल्या हातात, बँकेत पैसे ठेवलेले असतात. त्यामुळे ते प्रत्यक्ष कधीही काढता येतात. पण क्रिप्टोकरन्सी केवळ डिजिटली उपलब्ध असते. जसे व्यवहार आपण डिजिटल पद्धतीने सध्याही करतो तसेच व्यवहार या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातूनही आता काही ठिकाणी होत आहेत. पण, अद्याप त्याचा पूर्णपणे वापर होताना दिसत नाही. या क्रिप्टोच्या बाजारात आता थेट मार्क झुकेरबर्गची फेसबुक ही कंपनी उतरत आहे. आपले स्वतःचे चलन ही कंपनी सुरू करत आहे. या चलनाचं नाव आहे लिब्रा. गेल्या वर्षी यासंदर्भात काही घोषणा झाल्या होत्या. पण हे चलन आता जानेवारीत सुरू होईल अशी चर्चा आहे. लिब्रा या क्रिप्टोकरन्सीला जगात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. कारण ही करन्सी नियमात बसवण्यासाठी लिब्रा असोशिएशन कार्यरत असणार आहे. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाही सहभागी होता येईल असे बोलले जाते.

गायब होणारं  गूढ स्मारक
गेल्या काही दिवसांपासून गायब होणाऱ्या स्मारकांची चर्चा जोरात सुरू आहे. ही स्मारकं येतात कुठून, कोण त्यांना उभं करतं आणि ती मध्येच गायब कशी होतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पहिलं स्मारक नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतल्या उताह  राज्यात आढळलं होतं. जवळपास १० फूट उंच आणि दीड फूट रुंद त्रिकोणी आकाराचं स्टीलचं हे स्मारक लक्ष वेधून घेणारे होते. उताहमधल्या खडकांमध्ये - निर्मनुष्य ठिकाणी हे स्मारक कोणीतरी उभं केलं होतं. ते लोकांच्या नजरेत पडताच आणि त्याबद्दल उत्सुकता ताणली जात असतानाच अचानक ते गायब झालं. त्यानंतर तसेच स्मारक रोमानियामध्येही  आढळलं होतं. तेही काही दिवसांतच गायब  झालं. आता गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियामध्येही आणखी एक स्मारक दिसून आलं आहे. विशेष म्हणजे ही तिन्हे स्मारके साऱखी आहेत.
या स्मारकांमुळे पुन्हा एकदा एलियन्सबाबत तर्क लावले जात आहेत. सोशल मीडियावर गेल्या आठवड्यात यावर बरीच चर्चा घडली आहे. काहींनी म्हटले की हे २०२० या महाकठीण वर्षाचा शेवट करणारे हे बटन आहे. ते प्रेस करा, म्हणजे कोरोनाच्या संकटातून सूटका होईल.
एलियन्स आहेत आणि त्यांनी पृथ्वीवर येऊन स्मारकांसारखी हे पिलर्स उभे केले असा मानणाराही एक गट आहे. पण त्यावर कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. जोवर हे पिलर आणते कोण, लावते कोण आणि तयार करतंय कोण, याची ठोस माहिती मिळत नाही, तोवर या चर्चा अशाच रंगत राहणार आहेत

- पवन देशपांडे

(सहायक संपादकलोकमतमुंबई)

Web Title: A new digital coin called Libra..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.