शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नयनमनोहर बदामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:45 IST

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी शहर हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. शिल्पकला, गुहा, लेणी, धार्मिकस्थळ आणि व्यापारी पेठ अशा अनेकविध अंगांनी बदामीचा लौकिक वाढतच आहे.

- डॉ. सुभाष देसाई -कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी शहर हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. शिल्पकला, गुहा, लेणी, धार्मिकस्थळ आणि व्यापारी पेठ अशा अनेकविध अंगांनी बदामीचा लौकिक वाढतच आहे.चालुक्यांच्या काळात बदामीला वातापी असे म्हणत. पूर्वी ग्रीक भूगोलतज्ज्ञ टॉलेमी या व्यापारी केंद्राला बदाममी असे म्हणत. येथील मलप्रभा नदीच्या काठावर प्राचीन संस्कृतीच्या अनेक खुणा सापडतात.चालुक्य सम्राटाचा काळ हा इ. स. ६३१ ते ७४१चा. त्यावेळची भाषा कानडी आणि तेलुगू. बारा आणि तेराव्या शतकानंतर त्या दोन स्वतंत्र भाषा झाल्या. राजा मंगलेशचा काळ ६०२चा होता. या राजाचा उल्लेख कवी कालिदासाच्या रघुवंशात येतो. अहिवोलाच्या टेकडीवरील मंदिरात कालिदास व भार्गव या दोन कवींचा उल्लेख आढळतो. इ. स. ४५५ ते ४६७ मध्ये कालिदास सम्राट विक्रमादित्याच्या दरबारात होता. पाटलीपुत्र म्हणजे बिहार येथील गुप्त वंशाच्या राजाशी हे घराणे संबंधित होते. बदामीचा राजा पुलकेशीने उत्तर प्रदेशमधल्या हर्षवर्धन राजाचा पराभव केला. त्या विजयाप्रीत्यर्थ अहिवोलाला शिवमंदिर उभारले आहे. मागुती मंदिरात शिलालेखाचा उल्लेख आढळतो. कर्नाटकात शक युग बदामीच्या चालुक्य राजवटीने सुरू केले. खास बदामीच्या संग्रहालयात तसा शिलालेख आढळतो.

इ. स. ५४३मध्ये गुरुवार हा बृहस्पतीवार आहे असा उल्लेख दुसरा पुलकेशी राजाने सर्वप्रथम केला. राजा विक्रमादित्याने इ. स. ६९२ मध्ये शनिवार हे नाव प्रथम वापरल्याचा उल्लेख शिमोगा येथील शिलालेखावर केला आहे. तमिळनाडूचा पल्लव वंशाच्या नरसिंहाने इ. स. ६४२ मध्ये बदामी जिंकली. या युद्धात पुलकेशी दुसरा बदामीचा राजा मारला गेला. (त्याने ६१० ते ६४२ या काळात राज्य केले). त्याचा बदला विक्रमादित्य दुसरा याने (७३३ ते ७४४) कांचीपूरम जिंकून घेतला. त्या काळाची माहिती येथील मंदिराच्या दगडी स्तंभांवर कोरलेली आहे. यापूर्वी बदामीला मी दहा-बारा वेळा गेलो आहे; परंतु खालचे शिवमंदिर आणि वरचे शिवमंदिर मी पाहिलेले नव्हते. या योगायोगाला आमचे मित्र डॉक्टर विजय चव्हाण हे प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आहेत. त्यांच्या पत्नी डॉक्टर रश्मी चव्हाण या दोघांनी बदामीचीे सहल अचानक ठरवली. त्यांच्या विनंतीनुसार मी जॉईन झालो. बरोबर अजिंक्य पाटीलही होते.

बदामीला शाकंभरी यात्रा सुरू होती. त्यामुळे बनशंकरी देवीच्या मंदिरात लाखोंनी भाविक जमलेले होते. मंदिराच्या परिसरातून जाऊन आलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पाच-सहाला उठून बदामी गुफेंच्या दिशेने निघालो. अंधार अजूनही होता तोपर्यंत समोरच्या टेकडीवरील शिव मंदिराची वाट चालू लागलो. अतिशय सुंदर आणि त्यातून बदामीचे दृश्य फारच सुंदर दिसत होते. तिथून आम्ही खाली उतरलो. एखाद्या इंग्लिश चित्रपटातील दृश्याप्रमाणे वेगळाच निसर्ग, वेगळी रंगसंगती असणारे प्रचंड दगड आणि त्यातून जाणारी वाट हे पाहून मन प्रसन्न होते. तेथून शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना ठरावा अशी लेणी बघत निघालो.

पूर्वी चांदोबाच्या मासिकांमध्ये दिसणारी चित्रे या भागातील असावीत असे वाटू लागते. शेवटचे लेणी हे जैन धर्मीयांचे दैवत भगवान महावीरांच्या वर आहे. याठिकाणी एक यमसल्लेखना घेऊन मोक्ष मिळवलेल्या स्त्रीचे शिल्प आहे. त्यानंतर पट्टदखल आणि तिथून अहिवोल येथे जाऊन शिल्पकलेची अनेक मंदिरे पाहिली. आपण जा आणि आनंद लुटा. कोल्हापूरपासून फक्त २३५ किलोमीटर अंतरावर साडेचार तासांचा कारचा प्रवास आहे. येथे निवासाची उत्तम सोय आहे. कोल्हापूर-संकेश्वर- गोकाक-यरगट्टी आणि बदामी असा रस्त्याचा मार्ग आहे.(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)