शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सिनेमा

By admin | Updated: February 27, 2016 14:35 IST

श्रीदेवीने मला पार उलटे पालटे करून सिनेमाच्या जगात नेऊन विकून टाकले. मी तिचा ऋणी होतो आणि आहे. कारण. 1989 साली आलेला तिचा ‘चालबाज’. मी तो इतक्या प्रेमाने आणि इतक्या वेळा पाहिला की आधीचे, पुढचे-मागचे, वरचे-खालचे, सगळे काही मी विसरून गेलो. मी तेव्हा सातवीत होतो आणि तेव्हाच ठरवले, बस, आयुष्यात जर काही करायचे तर असेच!

- सचिन कुंडलकर
 
 
मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो की ‘तुम्ही चित्रपट दिग्दर्शित करण्याचे कसे आणि केव्हा ठरवलेत?’ - त्याचे प्रामाणिकपणो उत्तर दिले तर मात्र लोक माङयावर विश्वास ठेवत नाहीत. ‘कसे ठरवलेत?’ हे थोडय़ा विस्ताराने सांगावे लागते, पण ‘कधी ठरवलेत?’ याचे उत्तर मात्र ‘शाळेत असताना’ असे आहे. मी हे उत्तर दिले की लोक ‘काय, काहीपण सांगता काय? शाळेत कुणाला काही माहिती असते काय?’ असे म्हणतात. पण त्यांना तसे वाटणो स्वाभाविक असले, तरी माङया बाबतीत ते खरे घडले. 
त्याला काही प्रमाणात घरच्या व्यक्ती जबाबदार आहेत. माङो आजोबा, आईचे वडील घरात सगळ्यांना सांगत की, एक वेळा उपाशी राहा, दोन कपडे जुने नेसा, पण शुक्र वारी लागणारा नवा हिंदी सिनेमा चुकवू नका. त्यांना सिनेमाची भारी आवड होती. त्यामुळे ते हिंदी सिनेमाचे वेड आपसूकच त्यांच्याकडून आईकडे आणि मग माङयाकडे चालत आले. साधे व्यावसायिक हिंदी सिनेमे बघण्याचे व्यसन. 1972 साली माझी आई माहेरी वसईला राहत असताना तिने डिम्पलचा बॉबी  पाहिला आणि घरात बंड करून शॉर्ट स्कर्ट घालणो सुरू केले. अशी माझी आई. माङया वडिलांच्या वडिलांना दादा कोंडके भारी आवडत. दादांचा सिनेमा लागला की ते मस्त झकपक कपडे करून जाऊन पाहून येत.
आणि माङया वडिलांना हिंदी सिनेमाचा मनस्वी कंटाळा. ते इंग्लिश सिनेमाचे मोठे फॅन. आमच्या घराजवळचे अलका चित्रपटगृह तेव्हा फक्त आणि फक्त इंग्लिश चित्रपटच दाखवे. बाबा मला खूप लहान असल्यापासून ते पाहायला नेत. उत्तम ब्रिटिश आणि हॉलीवूडच्या चित्रपटांची विस्मयकारी दुनिया ही माङया वडिलांमुळे माङया आयुष्याचा भाग बनली. 
मराठी सिनेमा आमच्या घरात पाहिला जात नसे. कारण त्या काळी तो फारच वाईट टुकार दर्जाचा बनत होता आणि मराठी नाटकांना न माङो आई वडील जात न त्यांनी कधी आम्हाला नेले. ‘त्या दहा बाय दहा फुटाच्या स्टेजवर चार माणसे इकडे तिकडे फिरत मोठय़ाने बोलणार, त्यात काय मजा? त्यापेक्षा ग्रेगरी पेक किंवा ओमार शेरीफचा चांगला सिनेमा पाहा’, असे बाबांचे मत. 
बाबा मला शनिवारी टीव्हीवर लागणारे भालजी पेंढारकर, राजा परांजपे, जब्बार पटेल आदि जुन्या लोकांचे सिनेमे आवर्जून पाहायला सांगत. त्यामुळे बरीच वर्षे मराठी सिनेमा काळा-पांढरा असतो आणि हिंदी सिनेमा रंगीत असतो असे मला वाटे.
आपली मुले आपल्याला हवी तशीच नीट वाढवली जावीत असे प्रत्येकच आईवडिलांना वाटते. बरे त्यात त्यांचे एकमत असतेच असे नाही. त्यामुळे जवळजवळ दर शुक्र वारी अमिताभ, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांचे सिनेमे आई आणि मावशीसोबत जाऊन विजय चित्रपटगृहात पाहायचे आणि दर रविवारी अलकाला जाऊन वडिलांसोबत इंग्लिश सिनेमे पाहायचे यात माझा मस्त वेळ जाई. आई इकडे येत नसे आणि बाबा तिकडे येत नसत. पण दोघे माङो खूप लाड करत. लाड म्हणजे हळद, तेल लावलेले ते पूर्वीचे पॉपकॉर्न आणि रंगीत, थंडगार गोल्डस्पॉट. 
अमीर खानचा ‘कयामत से कयामत तक’ येईपर्यंत सिनेमाचे सगळे निर्णय आईवडील घेत. त्या चित्रपटापासून आमचे सगळेच बदलले आणि आम्ही सर्वार्थाने वयात येऊन स्वतंत्र झालो. 
मला सिनेमा फार म्हणजे फार आवडे. मी जे काही शिकायचो ते जवळजवळ हिंदी सिनेमे पाहून. माझी भावनिक वाढ मी जे सिनेमे पाही त्याप्रमाणो होत होती. प्रेम, सेक्स, हिंसा, लबाडी, त्याग अशा अनेक ख:या आणि आवश्यक भावनांची हिंदी सिनेमामुळे माझी ओळख झाली. नाहीतर मराठी साहित्य वाचून जवळजवळ ‘सखाराम गटणो’ होण्याची वेळ आमच्यावर आली असती. कारण आमच्या घरात समग्र वपु, समग्र पुलं, मृत्युंजय आणि ती रमा-माधवांची एक कोणतीतरी प्रसिद्ध कादंबरी, पेशवाईवरची; जिचे नाव मी आता विसरलो. खेळ खलास. एवढीच पुस्तके होती. हिंदी आणि इंग्रजी सिनेमाने माङो ख:या अर्थाने उत्तम पोषण करत ठेवले. सिलसिला, जंजीर, दीवार, मुकद्दर का सिकंदर (याचा अर्थ मला अजुनी कळत नाही), बेताब, मासूम, मिस्टर इंडिया. वाह वाह वाह ! सिनेमाच्या व्यसनी घरामध्ये आमचे बालपण फार मस्त चालू होते. 
मी साहजिकच आणि आपसूकच ठरवले होते की आपल्याला असे काहीतरी नाटय़मय करून गोष्ट सांगायची आहे. गोष्ट सांगायला आवडायची. गौतम राजाध्यक्ष या व्यक्तीचे माङयावर अगणित उपकार आहेत याचे कारण अगदी नेमक्या त्या काळात त्यांनी सुरू केलेले ‘चंदेरी’ हे मासिक. अतिशय नेमकेपणो आणि जाणतेपणो गौतमने तयार केलेलं ‘चंदेरी’ मी नियमित वाचू लागलो आणि मला सिनेमाच्या जगाविषयी ओढ तयार झाली. 
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळी घरी आलेला व्हीसीआर. त्यामुळे थेटरमध्ये न बघता येणारे सगळे सिनेमे घरी भरपूर बघता येऊ लागले. ‘राम तेरी गंगा मैली’ पाहायला आपल्याला आईवडील का नेत नाहीत? चला, त्याची कॅसेट आणून गुपचूप घरी पाहू. एकदा तर मला ‘सागर’ पाहायला आईने नेले, तर दारावरचा क्रूर माणूस ‘या लहान मुलाला आत सोडणार नाही’ असे म्हणाला. त्यामुळे डिम्पलचा तो लाल साडीतला सुंदर शॉट घरी व्हिडिओवर पाहावा लागला. हे सिनेमे बघताबघता हे पण ठरवता आले की आयुष्यात आपल्याला काय व्हायचे नाहीये. ‘हम आपके है कौन’मध्ये जो मोहनीश बहल होता, सतत नम्र, आल्यागेल्यांच्या पाया पडणारा आणि रेणुका शहाणोसोबत सतत हसत बसणारा,  आपल्याला तसे पुचाट, तुपकट व्हायचे नाही, हे पण कळले आणि सतत घरच्या लोकांसोबत नाचत बसायचे नाही हेसुद्धा ठरवता आले. 
आणि मग दोन मोठय़ा गोष्टी घडल्या. 1989 साली ‘चालबाज’ आला. श्रीदेवीचा डबल रोल असणारा, ‘सीता और गीता’ या जुन्या चित्रपटाचा रिमेक. मी तो इतक्या प्रेमाने आणि इतक्या वेळा पाहिला की मी आधीचे, पुढचे-मागचे, वरचे-खालचे, शेजारचे-पाजारचे सगळे काही विसरून गेलो. मी तेव्हा सातवीत होतो. आणि मी ठरवले की बस, जर काही आयुष्यात करायचे तर असे काही करूया. श्रीदेवीने मला उलटे पालटे करून या सिनेमाच्या जगात नेऊन विकून टाकले. मी तिचा ¬णी होतो आणि आहे. 
आणि अचानक मला एक दिवशी आई म्हणाली की, किशोरी मावशींचा आशुतोष एक हिंदी सिनेमा बनवतोय. रविना टंडन आहे त्यात. मी फुल खल्लास. माझा आ वासलेला बंदच होईना. त्या सिनेमाचे नाव होते ‘पहला नशा’. म्हणजे आपण ज्याला अनेक वेळा भेटलोय आणि ओळखतो तो माणूस डायरेक्ट सिनेमाच बनवतोय. म्हणजे असे करणो शक्य आहे, आपल्याला पण. आजूबाजूचे आणि ओळखीचे कुणी असे करतेय म्हटल्यावर मला फारच धीर आला. मी तर त्यावेळी ठरवलेच की जर कुणी मला आता विचारले की, ‘बाळ, मोठेपणी तू काय करणार?’, तर आपण डॉक्टर, सैन्य, समाजसेवा, इंजिनिअर असे काही न म्हणता थेट उत्तर द्यायचे, ‘काका, मी सिनेमा बनवणार.’ - पुढचे सगळे प्रवास अतिशय अवघड होते, पण शाळा संपताच तीन वर्षाच्या आत मी फिल्मच्या सेटवर क्लॅप देत होतो. मी तेव्हा सतरा वर्षाचा होतो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी दुसरे कोणतेही काम केलेले नाही. 
मला अनेक वर्षांनी यश चोप्रा भेटले, तेव्हा मी कधीही करत नाही ती एक गोष्ट केली ती म्हणजे त्यांना नीट वाकून नमस्कार केला. खूप मनापासून केला. ते माङया सेटवर काही वेळ आले होते आणि  माङयासोबत मॉनिटरजवळ उभे होते. मी मनात इतका खूश झालो, की ज्याचे नाव ते! त्यांनी मला फिल्म स्कूलमध्ये जाण्याआधी, खूप लहानपणापासून सिनेमा शिकवला होता!.
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com