शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

मार्शा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 3:53 PM

माझ्या शेजारी ती राहायची. एकटीच. ऐंशीच्या घरात असूनही सायकलने फिरायची.  ती गेल्यावर तिचा मुलगा आला.  सगळं घर उलटंपालटं केलं. काहीच न मिळाल्यानं संतापानं निघून गेला. एकदा ती माझ्याकडे आली होती. माझ्याकडची गूळ-पोळी घेऊन गेली होती. यंदा संक्रांतीला गूळपोळी करताना  पुन्हा तिची आठवण झाली.  पण आता ती परत कधीच दिसणार नव्हती.

ठळक मुद्देकाळ बदलला, तसे देशांतराचे संदर्भ आणि कहाण्याही बदलत गेल्या. जिथे जन्मलो-शिकलो-वाढलो ती भूमी सोडून माणसे परदेशी मातीत आपली मुळे रुजवतात; तेव्हा नेमके काय बदलते? - त्या अनुभवांचा हा कोलाज.

- अमृता हर्डीकर

एखादा माणूस गेल्यावर, शेवटचे सगळे विधी उरकायच्या आधी किंवा दहा-पंधरा दिवसातच र्शद्धांजली लेख लिहिला जातो. गेलेल्या माणसाच्या आयुष्याचा, त्याच्या कर्मांचा सारांश आणि त्याच्या कुटुंबाचा उल्लेख त्यात होतो. मी खूपच उशिरा लिहिते आहे. जवळ जवळ सहा-सात महिन्यांनी. एका परिच्छेदात शब्द उरकणं शक्य नाही म्हणून जरा प्रदीर्घ, मनाला टोचणी लावून गेलेलं सगळं काही लिहिते आहे.आज जिच्यावर मी लिहिते आहे तिचं नाव मार्शा. ती माझ्या शेजारी राहायची, तरी तिची माझी 6-7 वर्षांमधली फक्त तोंड ओळख, हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच भेटी, इतकी औपचारिक ओळख की मला तिचं आडनावसुद्धा माहीत नाही. ती एकटीच राहायची. सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान वय. चेहरा जरा उग्र, पांढरे बॉबकट केस,  पाणीदार; पण उदास राखाडी निळे डोळे, डोळ्याखाली  सुजलेल्या लालसर वळ्या, दात ओबडधोबड, थोडे पुढे आलेले.पंचाहत्तर ते ऐंशीच्या वयाची असली तरी मार्शा सायकलने फिरायची. तिच्याकडे गाडी नव्हती. तिच्या मदतीला तिचा मुलगा, नात, कुणी कधी तिच्या घरी आलेलं कधीच पाहिलं नाही. मुख्यत: मार्शा स्वत:च घरातून फारशी बाहेर पडायची नाही. घराच्या आसपास रानटी गवत, मोठी झाडं, रानच उगवलेलं. त्यात उंदीर होतात अशी मार्शाबद्दल म्युनिसिपालिटीकडे एक दोनदा तक्र ारपण झालेली. मार्शा घरातून दुर्मीळच बाहेर पडायची. अनेक शेजार्‍यांनी तिला पाहिलंसुद्धा नव्हतं.नोव्हेंबर 2018 मध्ये मार्शाच्या घरातून, सामानाची आदळ आपट ऐकू आली म्हणून निकीत (माझा नवरा) बघायला गेला,  तर मार्शाचा मुलगा घरात होता. त्याने सांगितलं, न्यूमोनिया आणि काही कॉम्लिकेशन्स होऊन ती हॉस्पिटलमध्येच गेली. सगळं घर उलटं पालटं करून, एखादा खजिना शोधण्याच्या घाईत आणि काही हाती न लागल्याच्या संतापात तो निघून गेला. घरमालकांना आम्हीच कळवलं. घरात हजारो  पुस्तकं, वर्षानुवर्षाचे सामान, कपडे, भांडीकुंडी, खचखचून भरलेली. मालकांच्या गळ्यात हा सगळा पसारा निस्तरण्याची आणि मार्गी लावण्याची अतिशय महागडी जबाबदारी पडली. त्यामुळे तिच्या एकाकी जगण्याची किंवा मृत्यूची खंत न करता ते फक्त तिने त्यांना दिलेल्या त्नासांचे पाढे वाचत होते. ती गेली हेपण अनेकांना नंतर खूप महिने माहीत नव्हतं.कुणी म्हणालं, ‘आय विश नो वन हॅज टू गो धिस वे .’  पण मला चुकल्यासारखं वाटत होतं. इतर सगळ्या शेजार्‍यांबरोबर छान घरोबा आहे त्यात मार्शा कधी सामील झाली नाही, मीपण विशेष प्रयत्न केले नाहीत तिला सामावून घेण्याचे. तिच्या एकाकीपणाची जाणीव झाली होती; पण तिच्या रूक्ष बोलण्यामुळे, थोड्याशा विचित्न अनुभवांमुळे, मी त्यापलीकडे जाऊन तिचा विचार केला नाही, याचा खूप पश्चाताप झाला. मनाला टोचणी लागली.जानेवारीपासून मालक नवीन रंग, नवीन फर्निचर, नवीन छत, अशा अनेक गीष्टींनी मार्शाचे घर, आता नवीन भाडेकरूंसाठी सुशोभित करतायत. आमच्या दोन्ही घरांच्यामध्ये एक रातराणीचे झाड होते. त्याच्यावर गेली काही वर्र्षं हमिंगबर्डस घरटं बांधत होती आणि त्यांची पिल्लं आम्हाला बघायला मिळत. शिवाय सगळा परिसर धुंद करणारा सुवास. पण या झाडाचा पाचोळा प्रचंड आणि थंडी-पावसाळ्यात त्या पाचोळ्यामुळे किडे, डास असल्या भानगडी. या वयात मार्शा कुठे हे सगळं साफ करणार म्हणून मीच दोन्ही अंगणातला पाचोळा साफ करायला लागले. तिची माझी शेवटची भेट त्या रातराणीच्या पाचोळ्याशीच झाली होती. सगळं घरच नवीन करण्याच्या मार्गावर असलेल्या मालकांनी अचानक ते रातराणीचं झाडच कापून टाकलं. आता तिथे हमिंगबर्डसची घरटी होणार नाहीत असा विचार करत असतानाच वाटलं, मार्शाची शेवटची खूणपण गेली. झाडामागच्या अंधारलेल्या खिडकीत अचानक प्रकाश ओसंडून वाहायला लागला. मार्शाबरोबरची पहिली भेट आठवली. ड्यू डेट उलटून गेलेली, जड पोट सांभाळत, मी तव्यावर गूळ-पोळी गरम करत होते. तेवढय़ात लाइट गेले. दारावर जोरात थापा पडल्या. दार उघडलं तर मार्शा होती. ‘लाइट गेलेत तर तुम्ही काय करणार आहात?’ मी तिच्या समोर कंपनीला फोन केला. तोपर्यंत वास घेत ती म्हणाली, ‘व्हॉट्स द स्वीट कॅरॅमल स्मेल?’ मी लाइट जायच्या आधी तव्यावर गरम झालेली पोळी तिला दिली. या सगळ्या प्रसंगात माझं नऊ महिन्याचं अवघडलेपण तिला दिसत असून, तिने त्याबद्दल काहीही भाष्य केले नाही. पोळी घेऊन ती निघून गेली.. एकदा कधी ती अंगणाच्या गजाआडून आमच्या अंगणातले फोटो काढत होती. कपडे वाळत घालण्याच्या स्टॅण्डकडे हात दाखवत म्हणाली, ‘आय अँम डॉक्युमेंटिंग दॅट यू हॅव अ केज इन यूर यार्ड .’  तिला सांगितलं तरी समजून घ्यायचं नव्हतं ते काय आहे .मागच्या संक्र ांतीला, मी गूळपोळ्या करत असताना दारासमोर अँम्ब्युलन्स येऊन उभी. मी इराला घेऊन बघायला गेले तर मार्शाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. पुढे होऊन विचारलं काही मदत हवी आहे का? तर नकारार्थी उत्तर आलं .. मोजक्या प्रसंगात आमची देवाण-घेवाण झालीच होती की ! नाळ नाही जुळली फक्त.यंदाच्या वर्षी मार्शा नव्हती; पण संक्र ांतीला गूळपोळी करताना ती आठवली. तिच्या आठवणीत ती पोळी करपली; पण तिच्या उणिवांचे पाढे न वाचता तिची आठवण आली..किती लोकं असे एकटेच जातात. आपल्या जवळचे नसले तरी माहितीतले, ऐकण्यातले .. मार्शाच्या जाण्याने मनाचा एक नवीन कप्पा उघडला. वरवर काटेरी वाटणार्‍या, स्वभावदोष असल्यामुळे एकाकी असणार्‍या व्यक्तींना, त्यांच्याकडून काहीही अपेक्षा न करता, आपण एखादा तरी सोबतीचा समजुतीचा क्षण देऊ शकतो का? मार्शाला मी नाही देऊ शकले असा निसीम समजुतीचा क्षण. पण सहा महिन्यांनी तरी, तिचा विचार करून, तिच्या आठवणीत ही खंतपूर्वक र्शद्धांजली ! मार्शा आणि तिच्यासारख्या अनेकांना.. (लेखिका अमेरिकास्थित रहिवासी आहेत.)

amrutahardikar@gmail.com