शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
4
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
5
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
6
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
7
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
8
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
9
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
10
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
11
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
12
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
13
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
14
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
15
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
16
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
17
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
18
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
19
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
20
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

मेळघाट डायरी

By admin | Updated: August 22, 2015 18:43 IST

आमच्या बंगल्याच्या आवारात सापांचा मुक्त वावर होता. संध्याकाळी कोल्हेकुईला सुरुवात व्हायची. गायी घराकडे परतताना एक जंगली नीलगायही रोज घरी यायची. त्याकाळी शिकारीला बंदी नव्हती, उलट ‘वनाधिकारी’ बनण्यासाठी वाघाची शिकार हा ‘नियम’ होता. आम्ही मुलं शिकार केलेल्या वाघाचं धूड घेऊन येणा:या ट्रकची उत्सुकतेने वाट बघत असू. पुढे याच वाघांचं संवर्धन करण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पावर माझी नियुक्ती झाली.

 
 प्रकाश ठोसरे
 
तत्कालीन मुंबई प्रांतातील पश्चिम बेरार (व:हाड) वनविभागात दोन जिल्हे येत, अकोला आणि बुलडाणा. माङो वडील 1957 साली ह्या विभागाचे विभागीय वनाधिकारी होते. ते वर्ष 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाचे शताद्बी वर्ष होते. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच मोठी देशभक्तीची घटना देशभर मोठय़ा उत्साहाने साजरी केली जात होती. अकोलाही त्यात मागे नव्हता. साक्षात पंडित जवाहरलाल नेहरू अकोल्यात येणार होते. 
मी त्यावेळी पाच वर्षाचा होतो. लहान मुलांच्या चाचा नेहरूंचे स्वागत करण्यासाठी माझी निवड झाली. पांढरा शुभ्र चुडीदार, शेरवानी आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी व स्वागत करण्यासाठी हाती लाल गुलाबाचं फूल घेऊन आमची स्वारी विमानतळावर सज्ज झाली होती. मला आठवतंय चाचाजींनी सुहास्य वदनाने माङया गुलाबाचा स्वीकार केला व पटकन मला कडेवर घेऊन माझं कौतुक केलं. रस्त्याच्या दुतर्फा असणा:या तुडुंब जनसमुदायातून त्यांची उघडी कार जात होती. जनतेच्या स्वागताची परतफेड करण्यासाठी पंडितजी हार भिरकावून देत होते आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी लोक तुटून पडत होते. त्यावेळी मला फारसं काही कळत नसलं तरी आता जाणवतं की भारतीय जनतेचं त्यांच्यावर किती जिवापाड प्रेम होतं.
विभागीय वनाधिका:यांचा बंगला चांगलाच मोठा होता आणि आवारही ऐसपैस होतं. आम्ही तिथं 1957 ते 1959 र्पयत राहिलो. (योगायोगाने पुढे मी स्वत: विभागीय वनाधिकारी, अकोला म्हणून त्याच बंगल्यात 1986 ते 199क् र्पयत परत वास्तव्य केलं.) हा बंगला आजही चांगल्या स्थितीत असून, विभागीय वनाधिकारी, अकोला ह्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. आमच्या आवारात अनेक वन्यजीव होते. त्याकाळी शिकारीला बंदी नव्हती, उलट तो एक प्रसिद्ध खेळ मानला जाई. माङो काका मेजर गायकवाड त्यांच्या बंदुकी, दारूगोळा घेऊन खास मुंबईहून अकोल्याला येत आणि आमच्या आवारातील तितर, बटेर ह्यांच्यावर आपलं कौशल्य पणाला लावत. बंगल्याच्या आवारात जवळपास सगळेच महत्त्वाचे साप आढळून येत. पावसाळ्यात काही सापांना बंगल्यात डोकावयाचा मोह व्हायचा. संध्याकाळ झाली की कोल्हेकुईच्या स्पर्धेला सुरुवात होत असे. ही वेळ आमच्या गायी घराकडे परतायची असे. गंमत म्हणजे पूर्ण वाढ झालेली एक नीलगाय पण त्यांच्या सोबत घरी येत असे. अशा प्रकारे पाळीव व जंगली जनावरांचं अजब मिश्रण होतं ते. रात्र चढली की घुबड, चकवे, टिटव्या आपले घसे साफ करत.
आमचे सख्खे शेजारी होते जिल्हाधिकारी श्री. दिनकरराव देशमुख. उंच, गोरेपान, तरतरीत नाक असलेलं एक अतिशय देखणं व्यक्तिमत्त्व होतं. ते हौशी शिकारी होते. त्यांच्याकडे राजा आणि मेजर नावाची शिकारी कुत्र्यांची जोडी होती. ह्या कुत्र्यांना सशाच्या शिकारीचं प्रशिक्षण दिलेलं होतं. ह्या कुत्र्यांनी एकदा सशाचा पाठलाग करत आमच्या आवारातल्या मोरीत एका सशाला घेरलं होतं. त्याकाळी चंदन खो:यात नावाप्रमाणो चंदन आढळे व वाघद:यात वाघ आढळत असत. शिकार हा खेळ मानला जात असे आणि त्याला एक प्रतिष्ठा, वलय होतं. जिल्हाधिकारी, वनाधिकारी मनमोकळेपणो ह्या खेळात सहभागी होत. विभागीय वनाधिकारी बनण्यासाठी वाघाची शिकार करणो, हा अलिखित नियम काही वरिष्ठ वनाधिका:यांनी घातला होता. माङो वडील शाकाहारी असल्याने त्यांनी ह्या नियमातून सुटका करून घेतली होती. आणि नेहमीच शिकारीपासून चार हात दूर राहिले; मात्र जिल्हाधिकारी काका मेळघाट जंगलातील नरनाळा, धारगड, गुल्लरघाटला वाघाच्या शिकारीकरिता जात असत.
आम्ही मुलं शिकार केलेल्या वाघाचं धूड घेऊन येणा:या ट्रकची उत्सुकतेने वाट बघत असू. एकदा एका मोठय़ा वाघाची शिकार झाली होती, त्याकरता तो ट्रकपण लहान ठरला होता. वाघाचे मागचे पाय बाहेरच लटकत होते. आम्ही ट्रकचा पाठलाग करत जिल्हाधिकारी बंगल्याच्या आवारात शिरलो. वाघाचे चारही पाय बांबूला बांधून खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत त्याला खाली उतरवलं. त्याचं कातडं कमावण्यासाठी मोकळी जागा निश्चित करण्यात आली. वाघाचं चामडं (व्याघ्रचर्म) व नखं शिका:याकडे (जिल्हाधिकारी काका) त्याच्या शौर्याचं प्रतीक म्हणून जाणार होतं. कातडं उतरवण्याचं काम चालू असताना बघ्यांची गर्दी वाढू लागली. मांस, इतर अवयव, रक्त, हाडं (विशेषत: ‘इच्छा अस्थी’ला - 6्र2ँ ुल्ली खास मागणी असे), चरबी, मिश्या प्रत्येक अवयवावर बघ्यांची नजर होती. सर्व मांस काढून झाल्यावर कातडय़ाला मीठ लावण्यात आलं आणि खुंटय़ा रोवून कातडं ताणून ठेवलं गेलं. हा प्रसंग जशाचा तसा माङया बालमनावर कोरला गेला. पुढे दैवगतीने ह्याच वाघांचं संवर्धन करण्यासाठी माझी नियुक्ती क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्पावर  झाली.
व्याघ्र संवर्धनात आपण बरीच मजल मारली आहे. पन्नास वर्षापूर्वी वाघाची शिकार हे मर्दानगीचं काम मानलं जात असे आणि आज तो अतिशय गंभीर गुन्हा आहे. अर्थात त्याकाळी शिकार करण्याचेही काही नैतिक नियम होते. त्यावेळी फासे वापरणो, विजेचा शॉक देणो किंवा पाणवठय़ावर विष घालणो असले प्रकार नव्हते. आपल्या ‘विकासा’मुळे गावे 1क्क् टक्के विजेने जोडली गेली. घनदाट जंगलातील दुर्गम गावांतही वीज जाऊन पोहचली. हरितक्रांतीमुळे कीटकनाशकाच्या रूपात विषही गावोगावी पोहचलं. त्यामुळे वीज आणि विषाचा वाघाच्या शिकारीकरिता, शिकार कसली हत्त्येसाठी खुलेआम उपयोग सुरू झाला आहे. दुर्दैवाने आपल्याच करंटेपणामुळे आपल्या विकासाची अशी किंमत आपल्याला चुकवावी लागत आहे. काळाचा महिमा आणखी काय?
 
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य 
वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com