अमेरिकेतलं मराठी स्वयंपाकघर

By admin | Published: January 7, 2017 12:48 PM2017-01-07T12:48:51+5:302017-01-07T12:48:51+5:30

जगाच्या पाठीवर पसरलेल्या मराठी माणसांनी कमावलेल्या अनुभवांची, त्यांनी चालवलेल्या धडपडीची कहाणी...

The Marathi kitchen in America | अमेरिकेतलं मराठी स्वयंपाकघर

अमेरिकेतलं मराठी स्वयंपाकघर

Next
>गौतम पंगू, आशय जावडेकर, नीलज रुकडीकर
 
‘मराठी लोकांचं अमेरिकेतलं संपूर्ण सामाजिक जीवन खाण्याभोवती फिरतं. मराठी खाद्यपदार्थांची परंपरा, भारताबाहेरही ते मिळवण्याची असोशी आणि परदेशी लोकांची त्याविषयीची अनभिज्ञता यातूनच Shank’s चा जन्म झाला. भारताबाहेर ही फिल्म करताना आम्ही आमच्याच बालपणात, आमच्या मराठी घरांत डोकावलो आणि आमची संपन्न खाद्यसंस्कृती  आम्हालाही नव्यानं कळत गेली..’
 
अमेरिकेतलं Shank’s  नावाचं एक फाइन डायनिंग रेस्टॉरंट. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे फक्त आणि फक्त मराठी (शाकाहारी) पदार्थ बनवले जातात. कोर्स मीलमध्ये ते वाढले जातात. या रेस्टॉरंटचं बुकिंग महिनोन्महिने आधी करावं लागतं. कित्येक अभारतीय लोक इथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला उत्सुक असतात. हे रेस्टॉरंट अत्यंत प्रसिद्ध आहे. या रेस्टॉरंटचा शेफ आहे शशांक जोशी. तो अतिशय नावाजलेला आहे आणि त्याला ‘एथनिक फूड इंडस्ट्री’मध्ये आदराचं स्थान आहे. त्यानं बऱ्याच अडचणींवर मात करून हे रेस्टॉरंट उघडलं आहे. शशांक आणि रँंल्ल‘ह्ण२ विषयी जाणून घ्यायची खूप लोकांना उत्सुकता आहे. त्यांच्या या चविष्ट नात्याची गोष्ट म्हणजेच आमची फिल्म रँंल्ल‘ह्ण२. लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
या फिल्मवर आम्ही साधारण एक- दीड वर्षापूर्वी काम सुरू केलं. ‘मराठी फूड’विषयी काहीतरी करावं असा भुंगा खूप दिवसांपासून डोक्यात भुणभुणत होता. 
वेगवेगळ्या कुझिन्सवर काही सिनेमे निघालेले आहेत. ‘जुली आणि ज्युलिया’, ‘बिग नाइट’ वगैरे. पण हे सगळे सिनेमे फ्रेंच, इटालियन कुझिन्सवर आहेत. इंडियन कुझिन्सवर काही मोजकेच सिनेमे आहेत, पण त्यातही मराठी फूडवर जवळजवळ नाहीच. 
आम्हा मराठी लोकांचं अमेरिकेतलं संपूर्ण सामाजिक जीवन खाण्याभोवती फिरतं. आपल्या मराठी खाद्यपदार्थांची प्रचंड परंपरा. भारताबाहेर हे खाद्यपदार्थ आवर्जून करायची आणि खायची आमची इच्छा आणि त्याविषयी अभारतीय लोकांची अनभिज्ञता ही तफावत जाणवायला लागली आणि त्यातूनच मग रँंल्ल‘ह्ण२ चा जन्म झाला.
पण ‘फाइन डायनिंग’च का? साधं सरळसोट ‘फास्ट फूड’ किंवा ‘थाळी रेस्टॉरंट’ का नाही, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. या थाळी किंवा फास्ट फूड प्रकारच्या भारतीय रेस्टॉरंट्सचा (मुख्यत्वे भारताबाहेरच्या अशा रेस्टॉरंट्सचा) एक मूलभूत गुणधर्म म्हणजे त्यांना अपेक्षित असलेला ग्राहक वर्ग हा अनिवासी भारतीय आहे. आणि असा वर्ग त्यांना पुष्कळ मिळत असल्याने अभारतीय लोकांमध्ये जागृती करायच्या फंदात वगैरे ते पडत नाहीत. ठीकच आहे ते. ते समीकरण चांगलं जमतं त्यांना. अडचण कुठे येते? जेव्हा भारतीय खाणं माहिती नसलेले लोक ते खायला जातात तेव्हा त्यांना त्याविषयी खूप माहिती नसते. मग कुठल्याही पदार्थाला ‘करी’ असं एक नाव आणि ‘स्पाइसी’ विशेषण लावून मोकळं केलं जातं. अभारतीय लोकांनाही आपलं खाणं आपल्यासारखं कळलं पाहिजे असा उद्देश असेल, तर ते फाइन डायनिंगच्या माध्यमातून करता येईल का?
फाइन डायनिंग म्हणजे नक्की काय? 
- जेव्हा आम्ही या फिल्मविषयी संशोधन करत होतो तेव्हा जाणवलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘फाइन डायनिंग’ सादर करणाऱ्या शेफची अभिव्यक्ती व त्याने गाठलेला संवाद. तो अतिशय व्यक्तिगत स्वरूपाचा असला तरी असा संवाद साधण्यासाठी विचारांची, माहितीची देवाणघेवाण व्हायला हवी. 
एक साधं उदाहरण. आम्ही आत्ताच काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमधल्या एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथे एकाने ‘लच्छा पराठा’ मागवला. इतरांनी काही ब्रेड्स म्हणजे नान, रोटी वगैरे मागवले. वेटरने नेहमीप्रमाणे ब्रेड बास्केट आणून ठेवली ज्यामध्ये सगळं एकत्र होतं. तो लच्छा पराठा बहुतेक खाली दडला होता म्हणून आमच्या मित्राने वेटरला विचारलं की ‘लच्छा पराठा’ कुठे आहे, तर तिथल्या अमेरिकन वेटरने ब्रेड बास्केटकडे कुठेतरी हवेत बोट दाखवलं. 
समजा एखाद्याला लच्छा पराठा कसा दिसतो हे माहिती नसेल तर त्याला कसं कळेल की त्याने मागवलेला पदार्थ त्याच्यासमोर आला आहे की नाही? हा संवाद साधण्यात ते रेस्टॉरंट पूर्णतया कमी पडलं. त्यामुळे आम्ही ही फिल्म करताना ठरवलं की जर आपल्याला मराठी पदार्थ अभारतीय लोकांपर्यंत पोचले हे दाखवायचं असेल तर त्या शेफची अभिव्यक्ती दाखवणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. 
या अभिव्यक्तीचं रूपांतरच मग रँंल्ल‘ह्ण२ च्या मेन्यूमधल्या कोर्स मिलमध्ये झालं. याबरोबरच खाणाऱ्या माणसाला प्रत्येक कोर्सची माहिती, पर्सनलाइज्ड अटेन्शन दिलं गेलं. ज्या माध्यमातून संवाद साधायचा ते म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारे पदार्थ. त्यांच्याकडेही आम्ही काटेकोर लक्ष दिलं. कष्टाने बऱ्याचशा भाज्या पर्सनल फार्मवर पिकवल्या. त्यामुळे तिथं येणाऱ्या प्रत्येकाला एक अभूतपूर्व मराठी खाण्याचा लुत्फ मिळाला. ही अभिव्यक्ती एखाद्यामध्ये अशी रातोरात निर्माण होणार नाही. म्हणून मग त्या शेफचं आत्तापर्यंतचं आयुष्य, घडलेल्या घटना, त्याच्यावरचे प्रभाव, त्यातून तयार झालेली त्याची अभिरुची आणि त्यातून उत्पन्न झालेली त्याची अभिव्यक्ती असा प्रवास दाखवायचा प्रयत्न आम्ही फिल्ममध्ये केला आहे. 
शशांक हा महाराष्ट्रात एका मराठी मध्यमवर्गीय घरात जन्मलेला मुलगा. त्याच्या घरात कुणी व्यावसायिक शेफ होण्याचा विचारदेखील अगदीच निषिद्ध. पण लहानपणापासून अंगात भिनलेली स्वयंपाकाबद्दलची आवड, अफाट जिज्ञासा आणि अन्नाबद्दलचा आदर त्याला त्याच्या ध्येयाच्या मार्गावर खेचून घेऊन जातात. या वाटेवर त्याचा बऱ्याच देशांत प्रवास घडतो. बरेवाईट अनुभव मिळतात, अनेक चढउतारांचा, खाचखळग्यांचा सामना करावा लागतो. या वाटचालीत त्याला पॉलिन या फ्रेंच तरुणीची साथ मिळते. या सर्व गोष्टींचा त्याच्या एकूण विचारसरणीवर प्रभाव पडतो आणि त्यातून त्याची अभिव्यक्ती तयार होते. मग तो अमेरिकेत रँंल्ल‘ह्ण२ हे मराठी फाइन डायनिंग रेस्टॉरंट सुरू करतो आणि ते यशस्वीही करून दाखवतो. हा शशांकचा वैयक्तिक प्रवास रँंल्ल‘ह्ण२ चा गाभा आहे. 
अमेरिकेतले अनिवासी भारतीय म्हणून जे बरेच अनुभव मिळाले ते व्यक्त करण्याच्या गरजेतून आमच्या फिल्ममेकिंगला सुरु वात झाली. विल्यम अ‍ॅण्डर्स या चंद्रापर्यंत गेलेल्या अंतराळवीराचं एक खूप छान वाक्य हुस्टनमधल्या नासा सेंटरमध्ये आहे.. 
'We came all this way to explore the Moon, and the most important thing is that we discovered the Earth.' Shank’s बनवताना सारखं हे जाणवतं. भारताबाहेर राहून मराठी शेफ आणि फूडविषयी फिल्म करताना आम्ही आमच्याच लहानपणामध्ये, आमच्या मराठी घरांमध्ये डोकावलो आणि तिथून आम्हालाच आमचे खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती कळत गेली.. 
(उत्तरार्ध)
 
(गौतम आणि आशय हे दोघे केमिकल इंजिनिअरिंगमधले पीएचडीधारक, तर निलज आयटी अभियंता आहे. तिघेही गेली काही वर्षे शिक्षण आणि नोकरीनिमित्ताने अमेरिकेत स्थायिक आहेत.)

Web Title: The Marathi kitchen in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.