शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

LMOTY 2020: मी महाराष्ट्राचा; महाराष्ट्र माझा!; सोनी सूदची मनापासून 'साद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:03 IST

Lokmat Maharashtrian of the year award 2020: मी मदत करण्यासाठी कोणाचीही वाट पाहत नाही. तुम्हीही पाहू नका. पुढे चालत राहा. लोक मदत मागतील. करत राहा. प्रत्येक वेळी मदत करणे शक्य होणार नाही. मात्र जेथे शक्य होईल तेथे जरूर मदत करा. - सोनू सूद

लॉकडाऊनच्या काळात तू मजुरांसाठी किती झटलास हे अवघ्या देशाने पाहिले. लोकांना मदत करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळते ?मी मूळचा पंजाबचा आहे. माझी आई प्राचार्य होती. बाबा लंगरमध्ये काम करत असत. त्यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळे मी यशस्वी झालो. माझी शाळा म्हणजे माझे आईबाबा होते. मी मातीशी जोडलो गेलो आहे. मला लोकांनी प्रेम दिले. काम करण्याची जिद्द प्रत्येकाकडे आहे. फक्त आपण आपली ताकद ओळखणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी सरकारला दाेष देण्याऐवजी आपण पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्ट सरकारनेच केली पाहिजे, असे नाही. मी केलेल्या कामामुळे मला समाधान मिळते, एवढे माझ्यासाठी पुरेसे  आहे! आरोग्यासाठी काम करतानाच आता देशातील सर्वात मोठी ब्लड बँक सुरू करण्याचा विचार मी करतो आहे.

       या अनुभवानंतर आता जबाबदारी वाढली आहे, असे वाटते का ?मी मदत करण्यासाठी कोणाचीही वाट पाहत नाही. तुम्हीही पाहू नका. पुढे चालत राहा. लोक मदत मागतील. करत राहा. प्रत्येक वेळी मदत करणे शक्य होणार नाही. मात्र जेथे शक्य होईल तेथे मदत करा. माझी जबाबदारी दिवसागणिक वाढत आहे. कारण लोक माझ्याकडे अनेक कारणांसाठी मदत मागत आहेत. कोणी लग्नासाठी मदत मागत आहे. कोणी गावात माकडे जास्त झाली आहेत त्यांना पकडण्यासाठी, तर काेणी गावात पाण्याचे पंप लावण्यासाठी मदत मागत आहे. हे एवढे सगळे का? - तर लोकांचा विश्वास आहे, की हा माणूस आपले ऐकेल. बरे याने झाले काय?-  तर मी स्वत:च स्वत:ला ओळखू लागलो आहे. आतापर्यंत २१०० शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली आहे. उशिरा का होईना, मला नेमके काय करायचे, ते समजले आहे. दिशा मिळाली आहे. मी रेल्वेने प्रवास केला आहे. मुंबई एक प्रकारची शाळा आहे. येथील रेल्वे आणि रस्त्यांनी मला आयुष्यभराचे धडे दिले आहेत. नागपूरने मला प्रेम दिले. माझ्या कामात नागपूरचे मोठे योगदान आहे. माझे महाराष्ट्राशी, मुंबईशी एक नाते आहे. मुंबईने मला ओळख दिली आहे. मी २५ वर्षांपासून येथे राहातो, महाराष्ट्र हीच माझी कर्मभूमी आहे! म्हणून तर ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’चा हा पुरस्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. 

पण तुझे टीकाकारही आहेत, त्यांना काय उत्तर देशील?लोकांनी टीका केली तर तुम्ही योग्य मार्गावर आहात; असे समजा आणि तुमचे काम सुरू ठेवा. मुंबई महापालिकेने माझ्या हॉटेलवर कारवाई केली असली तरी ते हॉटेल माझे नाही. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली तर त्यांचे आभारच मानेन, कारण ते खूप चांगले काम करत आहेत.

तुझ्या व्यक्तिगत आवडी-निवडीबाबत काय सांगशील ?नागपूर माझे आवडते शहर आहे. मिसळपाव माझा आवडता खाद्यपदार्थ आहे. मराठीत सचिन पिळगांवकर माझा आवडता अभिनेता आहे. राजकारणात मला शरद पवार आवडतात. 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020Sonu Soodसोनू सूद