शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

…पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 06:05 IST

खरं सांगतो, अशक्तपणा खूप होता तरीही गृह विलगीकरणाची ते पंधरा दिवस मी मनमुराद जगून घेतले !

ठळक मुद्देया धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला कुठे तरी हरवून बसलो आहोत. या दिवसात स्वतःसोबत घालवलेला वेळ कायम माझ्या स्मरणात राहील.

अभिषेकधात्रक, नांदेड

एप्रिलचा महिना. प्रचंड उकाडा जाणवत होता म्हणून कूलर दुरुस्तीचे सामान आणायला बाजारात गेलो आणि सामानासोबत कोरोनाला घेऊन आलो. त्याच रात्री ताप आणि कणकण जाणवायला सुरुवात झाली. ११ एप्रिल रोजी केलेली रॅपिड अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि सुरु झाला कोरोना सोबतचा १५ दिवसांचा वनवास... एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती तर दुसरीकडे मृत्यूचे तांडव चालू होतं. अशा नकारात्मकतेच्या गर्द छायेत सकारात्मक राहणं हे एक आव्हानच होतं माझ्यासाठी. आणि आता सुरु झाली १५ दिवसांच्या वनवासाची कहाणी .

सर्वात आधी मला ‘आनंद’ सिनेमातल्या राजेश खन्ना साहेबांच्या डायलॉगची आठवण झाली-

‘बाबूमोशाय, ज़िन्दगी और मौत उपरवाले के हाथ है ! जहाँपनाह उससे न तोह आप बदल सकते हैं न मैं, हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं. जिनकी डोर उपरवाले की उंगलियों में बंधी हैं ! कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है ! हा, हा, हा.’

- म्हणून मरणाचा विचार न करता, मन प्रसन्न ठेवण्यासाठी भरपूर सिनेमे, वेबसीरिज,माहितीपट पाहिले. कॉमेडी शोज, स्टॅंड अप कॉमेडी बघून सतत स्वतःचं मनोरंजन करत होतो. महत्वाचं म्हणजे यात कुणाचा व्यत्यय नव्हता. नाही तर आपलं ‘आवाज कमी कर, पाण्याची टाकी भरली का बघ, दळण घेऊन ये...’ हेच चालू असतं.

या १५ दिवसांत बातम्या, सोशल मीडिया, वर्तमानपत्र सर्वांना कात्री लावली. पूर्णवेळ आराम एके आराम फक्त एवढंच केलं. कधी कधी तर आरामानेच थकवा येईल असं वाटायचं.

सुरुवातीचे ४-५ दिवस जरा कठीण गेले. अशक्तपणा आणि ताप असल्याकारणाने चक्कर आल्यासारखं वाटायचं. औषधं भरपूर असल्यामुळे खाती घेतली, की काही वेळातच झोप यायची. पण नंतर हळूहळू बरं वाटायला लागलं .

वाफ घ्या, योगा करा, प्राणायाम करा, गरम पाणी प्या... घरचे दिवसभर ह्या गोष्टींचा भडीमार करायचे. परंतु यातल्या कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ दिला नाही. सर्व काही योग्य प्रमाणात ठेवलं. आणि खरं सांगू का? अशक्तपणामुळे एवढं गळून गेल्यासारखं वाटायचं की बसायची इच्छा होत नव्हती. योगा, प्राणायाम वगैरे ते तर दूरच राहिले. दुसऱ्याला सांगायला बरं वाटतं की हे कर ते कर, आपल्यावर वेळ आली की कळतं सगळं.

- याउलट माझ्याकडे माऊथ ऑर्गन होता तर बसल्या बसल्या मी तो वाजवायचो त्यामुळे दीर्घ श्वसनाचा व्यायाम कदाचित नकळत झाला असेल. अनावश्यक सिटीस्कॅन केला नाही. डॉक्टरांनी सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न केला.

माझ्या आईला पाककलेची खूप हौस. रोज नवीन काही तरी खायला द्यायची पण काही चव नव्हती तोंडाला. रोज फलाहार असायचा. जेवणात अंडी, पालेभाज्या, पराठे, शेवग्याचं वरण असे जिन्नस खात होतो. रात्री हळदीचं दूध !

संध्याकाळ झाली की कॉफीचा कप घेऊन गच्चीवर थंड हवेत एक तास येरझरा मारणे, निवडक मित्रांसोबत फोनवर गप्पा मारणे हा माझा दिनक्रम ठरलेला होता. शाहरुख खान, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचे टॉक शोज, मुलाखती पहिल्या. यूट्यूबवर शिमला, मनाली, कोकणाची travel vlogs बघितले. एकंदरीत हा काळ मी जगलो असे म्हणायला काही हरकत नाही.

बघता बघता १५ दिवसांचा वनवास कधी संपला कळला देखील नाही. या दिवसांत एक जाणवलं की एकांतात माणसाची productivity वाढते. स्वतःला वेळ देता आला. काही प्रश्नांची उत्तरं नकळत मिळाली. या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला कुठे तरी हरवून बसलो आहोत. या दिवसात स्वतःसोबत घालवलेला वेळ कायम माझ्या स्मरणात राहील. आणि हो, सकारात्मक राहण्याकरिता बाह्य घटकांची काहीही गरज नसते. आपल्या स्वतःला ते सहज शक्य आहे फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची. शेवटी १ मे महाराष्ट्र दिनी माझा गृहप्रवेश झाला. जाता जाता इतकंच सांगतो, " अगर end में सबकुछ ठीक ना हो, तो picture अभी बाकी है मेरे दोस्त".

abhishekdhatrak000@gmail.com