शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

विकृतीचा थरकाप उडवणारा जिन्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 06:34 IST

आयुष्यात अनपेक्षितपणे काही गोष्टी समोर येतात. वाटा बदलतात. या वाटाच मग कायमच्या सोबती होतात.

_अशोक राणे

घर से चले थे हम खुशी की तलाश मेंगम राह पर खडे थे वहीं साथ हो लिए..

राजेंद्र कृष्ण यांच्या या ओळी मला कायम आवडत आलेल्या आहेत. अवघं जगण्याचं वास्तव, त्यातलं तत्त्वज्ञान या दोन ओळीत सामावलेलं आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव अगदी ठरवून जाणतेपणाने अगदी सुखाच्याच शोधात निघतो असं नाही. परंतु जसजशी  तो वाट चालू लागतो तसतश्या अनेकानेक अनपेक्षित गोष्टी अवचितपणे समोर येतात आणि मग कुणाला हव्यात की नकोत याची चिकित्सा न करता सोबत करत राहतात. त्यांचं कोण काय करतं त्यानुसार प्रत्येकाच्या कथा घडतात..

..जिन्पाची कथा अशीच घडली. तिबेटच्या  पठारी प्रदेशात मालाची ने-आण करणारा तो एक ड्रायव्हर. जगातलं सर्वात उंच आणि मोठ्ठं पठार म्हणून ओळखल्या जाणा-या केकिस्कली पठारावरून तो चालला आहे. कसलाच ठामपणे अंदाज करता येणार नाही असा क्षणाक्षणाला आपलं रंगरूप बदलणारा हा बिकट भौगोलिक परिसर आणि धुक्यातून, बर्फाच्या वादळातून वाट काढत चाललेला जिन्पा. आसपास ना गावं ना रहदारी. आपल्या छोट्या मुलीची आठवण काढत हळवा झालेला बाप याचं वर्णन असलेलं लोकगीत ट्रकमधल्या टेपवर वाजतंय. जिन्पाचा हा प्रवास हजारो वर्ष चालू असल्यासारखा चालला आहे. सुरुवातच या प्रवासाने होते आणि वाटेत काही घडणार आहे का, की हे असंच सुरू राहणार आहे, असं वाटावं असा हा प्रवास प्रेक्षकांना केवळ पाहूनच थकवणारा आहे. आणि अचानक धाडकन कसला तरी आवाज होतो. जिन्पा गाडी थांबवतो, तर एक भलंमोठं मेंढरू गाडीखाली आलेलं असतं. तो चहूकडे पाहतो. त्या मेंढराचा कुणी मालक येईल म्हणून वाट पाहतो. कुणीच येत नाही. मेंढरू पुढच्या सीटवर ठेवून निघतो. अधूनमधून त्या धडाकडे पाहताना त्याला अपराधी वाटत राहतं. मेंढराच्या धडातून ठिबकणार्‍या रक्तापेक्षा त्याचे उघडे डोळे बघवत नाहीत. रोजचं ठरलेलं काम एका सवयीनं करताना जो निर्विकारपणा जिन्पात असतो तो आता कुठे दिसत नाही....अचानक त्याला धुक्यात पुढे चालणारा एक माणूस दिसतो. हा ट्रक धीमा करीत त्याला गाठतो.

कुठे जायचंय? सोडू का?   

वाटसरू त्याचं ठिकाण सांगतो. त्या वाटेवर सोडतो.

वाटसरूला पुढच्या सीटवर जागा करून देण्यासाठी जिन्पा ते मेंढारचं धड मागच्या भागात टाकतो. रक्ताने माखलेली जागा टाळून हा बसतो. सहज चाळा म्हणून जिन्पा त्याला विचारतो, तिकडे कशासाठी चाललाय? नातेवाईक आहेत का? काही धंदा-व्यवसाय? तो काहीच बोलत नाही. मग हाही काही वेळ गप्प राहतो. थोड्या वेळाने विचारतो,नाव काय?- जिन्पा. काय ? ? ? माझंही नाव जिन्पाच आहे!  थोड्या वेळाने दुसरा जिन्पा मोजक्या शब्दात आपल्या प्रवासाचं प्रयोजन सांगतो. पंचवीस वर्षांनी त्याला त्याच्या वडलांच्या खुन्याचा शोध लागलाय आणि त्याचाच खून करायला तो निघालाय. पुढे दोन रस्ते येतात. ट्रक थांबतो. दुसरा जिन्पा उतरतो. आपली वाट धरतो. हा आपली वाट धरतो. रोजचंच काम. रोजचीच वाट. रोजचाच प्रवास. परंतु आता सगळं बदललं आहे. उतरून गेलेल्या जिन्पानं ट्रकवाल्या जिन्पाच्या अस्तित्वावर हळूहळू सावली धरायला सुरुवात केलीय. त्या जिन्पाचं ध्येय आता याची स्वस्थता घालवून बसतं. तो ठरल्या ठिकाणी जाऊन आपली ठरलेली कामं करून येतो. परंतु त्याची मन:स्थिती आता ढासळलेली आहे. त्या मेंढराच्या मृत्यूला आपण जबाबदार ठरलो ही अपराधी भावना प्रखर होते.

तो एका बौद्ध भिक्कूला गाठून या पापातून मुक्त करण्याची गळ घालतो. भिक्कू मंत्रतंत्र करीत त्याला दिलासा देतो. परंतु तो अस्वस्थच आहे. परतीच्या प्रवासात जिथे त्याने त्या जिन्पाला सोडलं होतं तिथे येऊन आपली वाट सोडून त्या गावाकडे वळतो. कारण त्याला सुडाने पेटलेल्या त्या जिन्पाला हिंसेपासून परावृत्त करायचं आहे. त्या गावात जिन्पाची चौकशी करत  फिरतो. एक-दोन  दिवसात तिथे खूनबीन झालाय का याचीही माहिती घेतो. त्या                दुस-या जिन्पाने सांगितलेल्या  काही तपशिलावरून तो ज्याचा खून करणार होता त्या माणसापर्यंत पोहचतो तर तो माणूस भिक्कू झालेला असतो. जिन्पाला उलगडा होतो की सुडाने पेटलेला जिन्पा आला आणि या देवमाणसाला पाहून तसाच परतला. परंतु त्या देवमाणसाला त्याच्या येण्याचं प्रयोजन कळलेलं असतं आणि आता तो इतक्या वर्षांनंतर पूर्वी केलेल्या अधम कृत्याच्या अपराधी भावाने पोखरलेला  असतो.

एका सरळ रेषेत जाणार्‍या जिन्पाचं आयुष्य काही काळापुरता येऊन गेलेल्या त्या दुस-या जिन्पामुळे अंतर्बाह्य बदलून जातं. त्याच्या ट्रकमध्ये वाजणारं ते लोकगीत, समोर काचेवर लोंबकळणारी बाहुली यात त्याचा न दिसलेला भूतकाळ आहे. ती बाहुली आपल्या लेकीची आहे असं तो त्या जिन्पाने विचारल्यावर सांगतो. तेवढंच. याच्या अल्याडपल्याडचा संदर्भ ओझरताही येत नाही. परंतु आपल्या एकसुरी आयुष्यातून तो काही तरी शोधतो आहे. काय ते त्यालाही माहीत नाही. आणि गाडीखाली आलेलं ते मेंढरू आणि तो दुसरा जिन्पा यामुळे त्याचा शोध नेमका होत जातो. त्याच्या अस्वस्थेला मोकळं करणारी वाट त्याला दिसू लागते.

रोड मूव्हिज प्रकारातला हा ‘जिन्पा’ पेमा त्सेडन या दिग्दर्शकाचा चित्रपट. पोहचण्याच्या ठिकाणापेक्षा प्रवासच महत्त्वाचा असतो कारण तोही एका विशिष्ट टप्प्यावर पोहचवतो आणि जगण्यातली यथार्थता जाणवून देतो. हे अधोरेखित करण्याचं काम रोड मूव्हिज करतात.   जिन्पाचा आरंभीचा प्रवास तसा रूक्ष वाटू शकतो. पण तसा तो वाटत नाही. ही आध्यात्मिक अवस्था आहे. ती संथ; पण प्रवाही आहे. 

याच्या अगदी उलट दिशेचा म्हणावा असा अमेरिकन चित्रपट ग्रेटा. नील जॉर्डन या आयरिश दिग्दर्शकाची कथानायिका ग्रेटा ही सायकोपाथ आहे. ही गोष्ट घडते न्यू यॉर्कमध्ये. मेट्रोमध्ये आपली पर्स विसरायची. ती घेऊन कुणी तरी शोधत येईल आणि मग आपला खेळ सुरू करता येईल असा तिचा मनसुबा आहे. तिच्या तावडीत सापडलेली पहिलीच मुलगी आहे प्रसान्से मॅकक्युलन. आपल्या मैत्रिणीबरोबर राहणारी ही मुलगी एका रेस्तराँमध्ये नोकरी करते आहे. तिला बेवारस पर्स सापडते. त्यात असलेल्या व्हिजिटिंग कार्डावरून ती ग्रेटाचं घर गाठते. ग्रेटा तिचे पुन्हा पुन्हा आभार मानते. तिची मुलगी दुसर्‍या कुठल्या तरी शहरात राहते. एकटीनं जगणं असह्य होतं, असं तिच्या बोलण्यातून येतं. आईच्या वयाच्या या बाईविषयी पोरीला सहानुभूती वाटते. परंतु एका र्मयादेनंतर ती स्वत:ला अलिप्त ठेवते. परंतु आता ग्रेटा तिची पाठ सोडत नाही. भूताटकीच्या चित्रपटात धाडकन कुणी तरी समोर येतं आणि तसंच पाहता पाहता नाहीसं होतं अशी ग्रेटा येत-जात राहते. प्रसान्सेचं जगणंच बेजार करून टाकते. आरंभी तिला वाटतं की ग्रेटा एका अपरिहार्यतेतून तिच्याशी नातं जोडू पाहते. परंतु लवकरच तिच्या लक्षात येतं की तिनं आता बळजबरीच सुरू केलीय. ती खूनशी होत चाललीय. एकदा काय तो तिचा पिच्छा सोडवावा म्हणून ती ग्रेटाच्या घरी जाते. यावेळी ग्रेटा तिला परत पाठवत नाही. तर बाजूच्या खोलीत कायमची डांबून ठेवते. तिचा छळ करते. आणि शांत चित्ताने पियानो वाजवित राहते. प्रसान्सेची मैत्रीण एरिका ग्रेटाचा डाव तिच्यावर उलटवीत प्रसान्सेची सुटका करते.

हा चित्रपट म्हणजे विकृतीचा अतिशय भीतिदायक, गारठून टाकणारा खेळ. त्याला ट्रीटमेण्ट एका जबरदस्त थ्रीलरची. रहस्यपटांचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे आल्फ्रेड हिचकॉक यांनी म्हणून ठेवलंय, माणसाला घाबरवून घ्यायला आवडतं आणि म्हणूनच अशाप्रकारचे चित्रपट बनतात. नील जॉर्डनसारखा प्रथितयश दिग्दर्शकदेखील या जॉनरच्या प्रेमात पडतो आणि त्याच्यासारखा कुशल, प्रतिभावान दिग्दर्शक खुर्चीत खेळवून ठेवणारा असा चित्रपट करतो.

त्याच्या मदतीला जर मग इझाबेला हुबर्टसारखी नामवंत आणि तितकीच ताकदवान अभिनेत्री असेल तर मग सोने पे सुहागाच म्हणायचं. या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या समोर तेवढय़ाच ताकदीने उभ राहणं हे काही सोपं काम नाही. पण प्रसान्सेच्या भूमिकेतल्या क्लोए ग्रेस मोरेत्झ तोडीस तोड काम केलंय. हॉरर - थ्रीलर जॉनरमधला हा चित्रपट पाहताना विकृतीचा थरकाप उडवणारा अनुभव हा चित्रपट देतो हे नाकारता येत नाही. 

आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाची हीच मोठी देन असते. एकाच व्यासपीठावर तिथे माणसाच्या अवघ्या भवतालाला वेढून राहिलेल्या असंख्य गोष्टी पहायला मिळतात. कुठे एक जिन्पा असतो तो हिंसेपासून कुणाला तरी दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरीकडे एक ग्रेटा असते ती विकृतीचा खुनशी खेळ मांडते.    

(समाप्त)

(लेखक ख्यातनाम चित्रपट समीक्षक आहेत)

ashma1895@gmail.com