शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

चित्र-छावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 6:02 AM

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे  ताडोबा अभयारण्यातील ईराई रिट्रीट येथे  नुकताच एक आर्टिस्ट कॅम्प संपन्न झाला.  या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या  विविध कलावंतांच्या कलाकृतीचे प्रदर्शन  नागपूरच्या जवाहर आर्ट गॅलरीत  13 ऑक्टरोबरपर्यंत सुरू आहे.  त्या रमणीय अनुभवाच्या  चित्र-दर्शनाचा हा उत्तरार्ध.

ठळक मुद्देचित्रकारांच्या तीन पिढय़ांचं संमेलन..

- साधना बहुळकर

ताडोबाजवळच्या ईराई रिट्रिटमधला आर्टिस्ट कॅम्प.भारतातील वीस नामवंत चित्रकार सहभागी होते. सर्वात ज्येष्ठ होत्या दिल्लीच्या शहात्तर वर्षीय शोभा ब्रुटा, तर सर्वात लहान होती मुंबईची एकतीस वर्षांची स्वीता राय. म्हणजेच  चित्रकारांच्या तीन पिढय़ांचं संमेलन हे ! ही मंडळी पॅरिस, गोहत्ती, दिल्ली, पाटणा, बडोदा, हैदराबाद, पुणे, मुंबई, अशा ठिकाणांहून आमंत्रित होते. या प्रत्येकाचा आविष्कार पाहणे हा एक नितांतसुंदर असा अनुभव होता. कॅम्पचं देखणे आवार, आवाराजवळील गावठाण, ताडोबा परिसर अशा फेरफटक्यातील काही दृश्ये, अनुभव; काहींच्या चित्रात परावर्तित झाले, तर काहींची चित्रनिर्मिती ही कॅम्प आधीच्या त्यांच्या निर्मितीशी संलग्न, अथवा त्यांच्या सध्याच्या संकल्पनेचा विस्तार होता. चित्रकारांच्या व्यक्तिगत जीवनाशी निगडित अनुभव, तथा सामाजिक संदर्भ, क्वचित जागतिकही संदर्भ असणारे प्रतिसाद या चित्रांमध्ये दिसले.चित्रकारांच्या निर्मितीच्या प्रेरणा किंवा त्यांच्या ऊर्जेला साद घालणारे घटक आणि प्रत्यक्ष निर्मिती ही प्रक्रिया गुंतागुंतीची असते. त्याला अनेक पदर असतात. दृक जाणिवांचा केलेला आविष्कार हे त्याचे मुख्य सूत्र. याची कोणती गणिते, समीकरणे नाहीत. 1 ऑक्टोबरच्या दुपारी चित्रकारांची चित्र काढण्यासाठीची जमवाजमव सुरू झाली. एका  प्रशस्त कॅरिडॉरमध्ये तीन-चार जणींनी आपले इझल्स लावले. काही चित्रकारांनी आपल्या प्रशस्त कॉटेजेसच्या व राहुट्यांच्या मोकळ्या जागेत कामाला सुरुवात केली. एकीने स्विमिंगपुलच्या बाजूला असणारी शेड तिच्या कामासाठी निवडली. ठिकठिकाणी इझल्स, कॅनव्हासेस व रंगांचा पसारा विराजमान झाला. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या ईराई रिट्रिटला लाभलेले चित्रकारांच्या छावणीचे स्वरूप विलोभनीय होते.विनोद शर्मा हे या कॅम्पचे क्यूरेटर. व्यक्तिमत्त्व दिलखुलास. त्यांचे कला शिक्षण  बडोद्यातील. अनेक वर्षे दिल्लीत होते. आता मुंबईत स्थायिक. देश-परदेशात आर्टिस्ट कॅम्प आयोजित करतात. त्यांच्या चित्रात  डोंगर-दरी, विहरणारे ढग, धुक्याची दाट दुलई, जलाशय असे घटक स्वप्नील वाटतील अशा पद्धतीने येतात. अविचल जडत्व असणारे पहाड आणि गतिमान, क्षणभंगुर धुके, ढग या विरोधाभासाचा मेळ त्यांच्या चित्रात दिसला.दीपक शिंदे मूळच यवतमाळचे. कला शिक्षण व वास्तव्य मुंबईत. गेली वीस  वर्षे ते  निसर्ग आणि मानव यांच्या सह-अस्तित्वाच्या शक्यता रंगरेषांच्या द्वारे, अमूर्तवादी शैलीतून आजमावित आहेत. नानाविध रंग छटांचे थर देत, काही तांत्रिक कौशल्याने आशयाला अनुरूप असा एक सचेतन पृष्ठभाग ते तयार करतात. त्यातून प्राणी, जलचर यांचे आकार स्पष्ट, अस्पष्ट करीत दर्जेदार कलाकृती निर्माण करतात. कॅम्पमधील ‘कोएग्झिस्टन्स अँट नोव्हाज आर्क ’ आणि ‘कोएग्झिस्टन्स अँट द ओशन’ ही चित्रे त्यांच्या सध्याच्या संकल्पनेचे द्योतक आहेत.युसुफ हुसेन पाटण्याचे. बिहार संग्रहालयाचे संचालक. पूर्वीपासून त्यांना अमूर्त कलेतील अर्मयादता आव्हान देणारी वाटते. पूर्वीच्या काही लघुचित्रांवर सहीच्या जागी ‘चित्रलिखा है..’ असे लिहून मग चित्रकाराचे नाव असे, हे त्यांच्या पाहण्यात आले. त्यातली ‘चित्र लिहिणे’ ही कल्पना त्यांना भावली. त्यातून समांतर आखलेल्या रेषांचा प्रवेश कॅनव्हासवर झाला. शोभा ब्रुटा, 76व्या वर्षीही उभे राहून चित्र काढणार्‍या शोभाताईंकडे बघत राहावे, असा त्यांचा वावर ! त्यांचा कलाप्रवास वास्तववादाकडून अमूर्तवादाकडे झाला. अलीकडे त्या रंग-आकारांच्या लिप्ताळ्यातून अलिप्त होऊन, भौमितिक आकारांकडे वळत, बिंदू या संकल्पनेशी एकाग्र झाल्या आहेत.रिनी धुमाळ बडोद्याच्या. त्यांच्या चित्रातील स्री प्रतिमा या ‘आदिशक्ती’चे रूप वाटते. त्यातही ठळक बाह्यरेषा असणारा ठसठशीत आकार, आशयाला पूरक अशा विविध रंगछटा, पोत यांचा संवेदनशीन वापर त्या करतात. लोककलेतील रांगडेपणा, गूढता यांची डूब दिल्याने ह्या स्री प्रतिमा शक्तिशाली, सर्मथ वाटतात. सुहास बहुळकर मुंबईचे. कला अभ्यासक, दृश्यकला कोशाचे संपादक, कलालेखन,  क्यूरेटर इत्यादी. महाराष्ट्राच्या गतकाळातील वास्तू व व्यक्ती वैशिष्ट्य आणि वर्तमान घडीच्या काही खुणा यांची सांगड हे त्यांच्या अनेक चित्रांचे वैशिष्ट्य येथेही दिसले. कॅम्पमध्ये काढलेल्या चित्रात तेथील परिसराची वैशिष्ट्ये आहेत. गावात फेरफटका मारताना  गावकर्‍यांच्या गप्पातून वाघाची चाहूल लागतच वातावरणात कशी तारांबळ होते ते त्यांना कळले. तोच अनुभव त्यांनी  कॅन्व्हासवर उतरवला.काहिनी आर्ते, र्मचण्ट. मुंबईच्या. त्यांनी स्वत:ची आधुनिक वास्तववादी शैली स्वत:च विकसित केली. सर्वसाधारणपणे बर्‍याच चित्रात त्या स्रीचा चेहरा/पूर्ण शरीराकृती व प्राणी-पक्षी वास्तवातील अन्य घटक यांच्या एकत्रिकरणातून चित्र साकार करतात. त्यांच्या चित्रात कॅम्प सभोवतीचा झाडाझुडपांच परिसर, तेथील वनरक्षकांची प्रतिमा, त्यामागे डोकावणारा बेडकाचा चेहरा यातून आकार व रंगाची वेगळी प्रतिमा सृष्टी उभी केलेली दिसली.संजीव सोनपिंपरे, मूळचे नागपूरचे आता मुंबईत. त्यांच्या दोन्ही चित्रे बघता जाणवले की  त्यांच्या भवतालाला त्यांचा सजग असा प्रतिसाद आहे. प्रत्येकाचे रोजचे धकाधकीचे जीवन, आजूबाजूचा कोलाहल, चरितार्थापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्याही क्लेशकारक घटना सतत आपल्यापर्यंत थडकत असतात. हे सर्व त्यांनी ‘पीस-प्रोसेस’ चित्रात अभिव्यक्त केले. ते करताना चित्ररचनेत वेगवेगळ्या पातळ्या निर्माण केल्या, हे या चित्राचे खास वेगळेपण.प्राजक्ता पालवे यांच्या चित्रात कॅम्पच्या स्विमिंग पूलमधील पाणी, भोवतीची झुडपे यांचे रंग, पोत हे सखोल निरीक्षण उमटलेले दिसले.मनीष पुष्कले, दिल्लीचे. त्यांची चित्रे अमूर्त शैलीतील आहेत. अत्यंत तरल अशा रंगछटा ते निर्माण करतात. ज्येष्ठ चित्रकार ब्रिंदा मिलर, तरुण चित्रकर्ती स्वीता राय यांची चित्रही अमूर्तशैलीतील आहेत. हैदराबादच्या लक्ष्मण येले यांनी साधा विषय घेऊन त्याला दृक आशयाच्या दृष्टीने समृद्ध केले आहे. उदा. एका पाठमोर्‍या व्यक्तीचा डिझाइन असणारा लालभडक शर्ट व रापलेले काळे हात, पायजमा हा त्यांचा चित्राचा विषय होऊ शकला. कॅम्पमधील चित्रात त्यांनी स्थानिक भजनी मंडळ चित्रित केले.पुण्याच्या एम. नारायणन यांच्या कलाकृतीत वास्तवाकडून प्रेरणा घेत अँब्स्ट्रॅक्शनकडे होणारी वाटचाल जाणवते. मुख्यत: त्यांनी अश्वांच्या जोमदार घोडदौडीतील जोम, आवेग, वेग कुंचल्यांच्या फटकार्‍यातून व्यक्त केला आहे. र्मयादित कलर पिगमेंटमध्येही त्यांनी कॅम्पमध्ये चांगल्या दर्जाची कलाकृती केली.आसामच्या वहिदा अहमदनी चारकोलमधील आपल्या चित्रात भारतीय हिंदू व मुस्लीम धर्मातील काही प्रतीकांचे एकत्रिकरण करून सलोखा, सहिष्णूता यांना आवाहन केले आहे.तेजिंदर सिंग यांचे चित्र हिमालयातील खोर्‍यात वसलेल्या खेड्याचे आहे. पॅलेट नाइफचा वापर आहे.आनंद पांचाल यांच्या कलाकृती नेहमीच्या शैलीत आहेत. कॅनव्हासला रंग लावून घेऊन त्यातून ते चित्राचा आशय विकसित करतात. ग्रामीण निरागस चेहरेपट्टी, शरीराकृतीत असणारा आकाराचा साधेपणा व रेखीवता, अल्हादायक रंगसंगती ही त्याची वैशिष्ट्ये येथील चित्रातही आहेत.पॅरिसला स्थायिक झालेल्या सुजाता बजाज या ख्यातनाम बजाज परिवारापैकी.  म. गांधींचे काही काळ वध्र्यात असणारे वास्तव्य आणि या मंडळींचे त्या प्रांतातील वास्तव्य यात एक भक्कम बंध आहे. मूळ मातीच्या ओढीमुळे सुजाता आत्मीयतने पॅरिसहून ताडोबापयर्ंत कॅम्पसाठी पोहचल्या. अमूर्त शैली आता भारतात चांगली रुजली असल्याचा आनंद त्यांनी आत्मीयतेने व्यक्त केला.कॅम्पच्या चौथ्या दिवशी संध्याकाळी रंग, कुंचल्यांच्या पसार्‍याची आवरासावर सुरू झाली. इझल्सवरचे कॅनव्हास उतरवून त्यांचे पॅकिंग सुरू झाले. आधीची व आत्ताची चित्रे  नागपूरला रवाना होऊन, लगेच जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत या संग्रहाचे उद्घाटन होऊन प्रदर्शन सुरू झाले आणि अनुभवाची एक वेगळी शिदोरी घेऊन चित्रकारांचा घरी जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू झाला.sadhanabahulkar@gmail.com(लेखिका ज्येष्ठ चित्रकार आहेत.)