घर आवरण्याची जपानी पद्धत कोनमारी

By admin | Published: April 23, 2016 01:16 PM2016-04-23T13:16:18+5:302016-04-23T13:16:18+5:30

योग्य प्रकारे घर आवरणो, अडगळ काढून टाकणो अनेकांना जमत नाही. याचे कारण त्यातली भावनिक गुंतवणूक! घर कसे आवरायचे याचेच धडे जपानी लेखिका मारी कोन्दो देते. फोटो, पेनं, मासिके, कपडे, अंतर्वस्त्रे. अशा हजारो वस्तू मारी कोणत्याही मध्यमवर्गीय घरातून बाहेर काढते. काही वेळा तर हा ‘कचरा’ टनावारी असतो. घरातला मोकळा अवकाश जपून ठेवण्याची जपानी पारंपरिक पद्धत मारी कोन्दोमुळे आता जगभरात प्रसिद्ध झाली आहे.

The Japanese method of home cover Konamari | घर आवरण्याची जपानी पद्धत कोनमारी

घर आवरण्याची जपानी पद्धत कोनमारी

Next
>- शर्मिला फडके
 
जीवनशैलीसंदर्भात मिनिमलिझमची पाश्चात्त्य चळवळ अलीकडे सुरू  झालेली असली तरी एकंदरीत कला-संस्कृती आणि सामाजिक इतिहासात मिनिमलिस्ट या संकल्पनेची मुळं खोलवर गेलेली आहेत. विशेषत: जपानी, ङोन संस्कृतीमधे या मुळांचा मागोवा घेता येतो. ‘मिनिमारिसुतो’ हा शब्द जपानी संस्कृतीचा जुना वारसा. आर्ट, डिझाइन, लिटरेचरच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा. पारंपरिक जपानी घरे मिनिमारिसुतो संकल्पनेला मध्यवर्ती ठेवूनच बांधण्यात आलेली, म्हणजे एक खोली अनेक कारणांकरता वापरणं इत्यादि. 
अर्थात मध्यमवर्गीय भारतीय संस्कृतीमधे गेल्या काही वर्षांमधे काटकसर, वस्तूंचा पुनर्वापर या संकल्पना जशा कालबाह्य झाल्या तशाच काही दशकांपूर्वी सर्वसाधारण जपानी कुटुंबांमधे ‘मिनिमारिसुतो’ अडगळीत गेला. जपानच्या नव्या पिढीला जास्तीत जास्त वस्तू खरेदी करण्याचे वेड लागले आणि घरात त्या साठवून ठेवायचेही. 
मात्र आता गेली काही वर्षे जपानमधे पुन्हा   ‘कमीत कमी वस्तू जवळ बाळगणो, अडगळमुक्त जीवनशैली, शून्य कचरा निर्मिती’ अशा अर्थाने ‘मिनिमारिसुतो’ संकल्पनेचे पुनरु ज्जीवन झाले. जपानी माध्यमांमधून आता सातत्याने मिनिमारिसुतो जीवनशैलीवर कार्यक्र म होतात. ‘अडगळीवाचून जगणो’ हा आनंदनिधानाकडे जाण्याचा मार्ग असल्याचे जपानी लोकांना पुन्हा पटवणो हा माध्यमांचा प्रमुख उद्देश आहे आणि तो हळूहळू यशस्वी होत आहे. 
लोकांच्या बदललेल्या दृष्टिकोनाला कारणीभूत ठरले आहे मारी कोन्दो या जपानी लेखिकेने 2क्14 साली लिहिलेले ‘द लाइफचेन्जिन्ग मॅजिक ऑफ टायडिंग अप - द जापनिज आर्ट ऑफ डीक्लटरिंग अॅण्ड ऑर्गनायझिंग’ हे पुस्तक. अलीकडेच याच मालिकेतले दुसरे पुस्तक आले आहे- ‘स्पार्कजॉय’. मारी कोन्दोच्या या दोन्ही पुस्तकांच्या अॅमेझॉनवर वीस लाखांहून जास्त प्रती विकल्या गेल्या. आणि त्या जास्तीत जास्त जपानी लोकांनीच विकत घेतल्या आहेत. मारी कोन्दोच्या मते तिने आपल्या पुस्तकांमधून नवीन काहीच सांगितलेले नाही. फक्त ‘घर आवरण्याच्या’ पारंपरिक जपानी व्यवस्थेचे ज्याला ‘कोनमारी पद्धत’ असे नाव आहे तिचे पुनरुज्जीवन केले. 
घर आवरणो, नको असलेल्या वस्तू फेकून देणो, कपडे, वस्तू, पुस्तकांची व्यवस्था. घरातला मोकळा अवकाश जपून ठेवणो, अडगळ दूर करणो याकरता जपानमधे वापरली जाणारी पारंपरिक कोनमारी पद्धत मारी कोन्दोमुळे आता जगभरात प्रसिद्ध झाली आहे. घर आवरणो ही संकल्पना जपानमधल्या जुन्या घरांमधून पुष्परचना आणि पाककृतींप्रमाणो पिढय़ान्पिढ्य़ा जपलेली कला. मात्र अलीकडच्या अनेक वर्षांमधे जपानी विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातल्या लहान मुलांवर घर आवरण्याचे हे ‘कोनमारी’ संस्कारच झाले नसल्याने हळूहळू ती पद्धत विस्मरणात गेली, कालबाह्य झाली. 
जपानी मिनिमलिझम म्हणजे घराच्या मुख्य दिवाणखान्यात, लिव्हिंग रूममधे काहीही सामान नसणो. जास्तीत जास्त मोकळा अवकाश हे प्रमुख सूत्र. घरांमधे भिंती घालून वेगवेगळ्या खोल्यांमधे त्याचे विभाजन करणो म्हणजे मुक्त अवकाशाला प्रतिरोध असे मानले जाते. वीस-तीस वर्षांपूर्वी जपानी घरांमधे फक्त तातामी चटया अंथरलेल्या असत. त्यांच्यावरच बसणो, झोपणो, आरामात पसरणो सहज शक्य असे. मात्र आधुनिक, नव्या जपानी घरांमधे हार्डवुडची जमीन असते. त्यावर सोफा, खुच्र्या, रग्ज इत्यादिंशिवाय बसणो, झोपणो शक्य होत नसल्याने नव्या पिढीला केवळ तातामीचा वापर नव्याने करणो आव्हानात्मक वाटते. 
लेखिका मारी कोन्दो वयाच्या पाचव्या वर्षापासून जपानच्या पारंपरिक कोनमारी पद्धतीने घर आवरण्यात तरबेज झाली त्याचे कारण तिचे आजी आजोबा. मारी कोन्दोचे लहानसे घर अत्यंत सुंदर आणि टापटिपीचे म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. शेजारीपाजारी घर आवरण्याकरता मारी कोन्दोचा सल्ला ती अगदी लहान वयाची असल्यापासून घेत. घराच्या सौंदर्यरचनेपेक्षा घराची सुव्यवस्था राखणो जास्त महत्त्वाचे हे तिचे तत्त्व. कोन्दोच्या मते लोकांना योग्य प्रकारे घर आवरणो जमत नाही कारण त्यांना घरातली अडगळ काढून टाकणो जमत नाही. घरातल्या वस्तूंमधे त्यांची फार मोठी भावनिक गुंतवणूक असते. फोटो, पेनं, मासिके, पुस्तके, कात्रणो, कपडे, अंतर्वस्त्रे, मेकअपचे सामान, भांडी, काचवस्तू अशा किमान लाखभर वस्तू मारी कोन्दो कोणत्याही मध्यमवर्गीय घरातून बाहेर काढते. काही वेळा तर हा ‘कचरा’ टनावारी असतो. 
लोकांच्या घरातल्या अतिरिक्त वस्तूंची अडगळ बाहेर काढून, अवजड फर्निचर काढून टाकून रुग्णालयात दाखल होण्याची वेळ अनेकदा तिच्यावर येते. एखादी फुलदाणीही घरातून बाहेर टाकायला नाखूश असणारे लोक  मारी कोन्दोचं का ऐकतात? मारी कोन्दोच्या मते ती लोकांना हे पटवून देऊ शकते की, या वस्तू तुमच्या घरात अडगळीत पडून राहिल्याने गुदमरतात, मृतावस्थेत जगत असतात, इतर कोणा गरजू व्यक्तीच्या घरी त्या ‘जिवंत’ राहू शकतात. थोडक्यात मारी कोन्दो अडगळीच्या वस्तूंना नवीन जीवन बहाल करते. लोकांच्या घरातून बाहेर काढलेल्या अडगळीला योग्य घरे मिळवून देण्याचे काम मारी कोन्दो वैयक्तिक जबाबदारीने करते. त्याकरता ती गराज सेल आयोजित करते. जुन्या बाजारांमधे खेपा घालते, चॅरिटी शो, प्रदर्शने भरवते. मात्र अगदीच तुटक्या वस्तू असल्याशिवाय ती कोणत्याही जुन्या अडगळीतल्या वस्तू डम्पिंग ग्राउंडवर टाकत नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने ते योग्य नाही असे ती मानते. 
निसर्गाशी एकात्मता साधायची तर अवकाश शक्य तितके मोकळे असायला हवे. मारी कोन्दो ‘घर कसे आवरायचे’ याचे प्रशिक्षण वर्गही घेते. तिच्या वर्गात नाव नोंदवायला तीन महिन्यांचा वेटिंग पिरीयड असतो! कोनमारी पद्धतीने घर आवरल्यावर ते पुन्हा कधीही विस्कटणार नाही, त्यात अनावश्यक वस्तू साठणारच नाहीत याची मारी कोन्दो हमी देते. 
तिच्या मते नुसते घर कसे आवरायचे हे सांगितल्याने लोकांची आयुष्य नाटय़पूर्ण बदलत नाहीत. घर कसे आवरायचे हे फक्त एक तंत्र नसते. ती कला आहे. प्रत्येक वस्तूची एक जागा असते, तिथेच ती ठेवल्याने त्या वस्तूचा सन्मान होतो. वस्तू आवरून, योग्य जागी ठेवण्याची पद्धत तिने इतक्या सोप्या त:हेने विकसित केली आहे की घरातले सहा वर्षांचे मूलसुद्धा यात तरबेज होते. घर किंवा तुमची कामाची जागा तुम्ही स्वत: आवरली तरच ती नीट राहू शकते यावर तिचा विश्वास आहे. इतर कोणालाही, नोकर, एजन्सीजची माणसे यांच्याकडून हे काम करवून घेतले तर त्याचा उपयोग नाही. कारण ते पुन्हा पुन्हा विस्कळीत होत राहते, वस्तू साठून राहतात आणि यात तुमची प्रचंड ऊर्जा, वेळ, पैसा फुकट जात राहतो. ‘मी जन्मजात आळशी आहे’ किंवा ‘मला पसाराच आवडतो’, ‘मला वेळ मिळत नाही’ अशी विधाने ही स्वत:मधल्या कमतरतेवर पांघरूण घालणारी असतात, असे म्हणत मारी त्यांना काहीही महत्त्व देत नाही. पिढीजात पाककृती किंवा स्वयंपाकाची कौशल्ये जशी एका पिढीकडून दुस:या पिढीकडे हस्तांतरित होतात तसेच हे जपानी घर आवरण्याचे कोनमारी तंत्र. मात्र नव्या पिढीला आता ते अशा त:हेने शिकवावे लागते याची कोन्दोला खंत वाटते. ‘स्पार्कजॉय’ या आपल्या दुस:या  पुस्तकामधे तिने भर दिला ङोन संकल्पनेवर. ही संकल्पना मुळातच साधेपणावर आधारित असल्याने मिनिमलिझमला त्यात खूपच महत्त्व आहे. जगण्याचा आनंद आणि मुक्तपणा हा साधेपणातून, नैसर्गिकपणातून येतो. याबद्दल अधिक माहिती पुढच्या लेखात.
 
कोणतीही अतिशयोक्ती न करता मारी कोन्दो ठामपणो सांगते की, घर आवरल्यावर त्या घरातल्या लोकांच्या आयुष्यातही नाटय़पूर्ण फरक पडलेला आहे. त्यांची अनेक वर्षे खोळंबलेली कामे पार पडतात, आयुष्यभर जपलेली स्वप्ने पूर्ण होतात, नोकरी-व्यवसायात यश मिळतं, नातेसंबंध सुधारतात, लोकांची आयुष्य जास्त आनंदपूर्ण बनतात. आणि  हे फक्त त्यांच्या आजूबाजूचा अवकाश मोकळा केल्याने शक्य होतं. घरातली कोंदट हवा मोकळी होऊन तिथे ताज्या, स्वच्छ हवेचा वावर होतो. अशा मोकळ्या, खुल्या, अडगळविरहित अवकाशात त्यांना विचार करायला, लक्ष केंद्रित करायला, नव्या कल्पना सुचायला वाव मिळतो. ते तणावमुक्त होतात. त्यांची कार्यशक्ती वाढते. घर आवरल्याने विस्कळीत विचारही आवरले जातात, भूतकाळ मागे टाकून वर्तमानावर लक्ष केंद्रित व्हायला मदत होते. आयुष्यात काय गरजेचे आहे, काय हवे, काय नको हे नीट कळायला लागते.
 
 
(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत)
sharmilaphadke@gmail.com 

Web Title: The Japanese method of home cover Konamari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.