शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

भान ते सुटलं, की संपलंच सगळं!

By admin | Updated: April 9, 2016 14:56 IST

प्रत्युषाच्या बाबतीत जे घडलं ते खरंच खूप दुर्दैवी आहे. तिच्या निमित्ताने पुन्हा तीच चर्चा नव्याने सुरू झाली आहे. पण हे फक्त ग्लॅमरच्याच क्षेत्रत घडतंय असं आहे का?

 
अमृता खानविलकर 
 
प्रत्युषाच्या बाबतीत जे घडलं ते खरंच खूप दुर्दैवी आहे. तिच्या निमित्ताने पुन्हा तीच चर्चा नव्याने सुरू झाली आहे. पण हे फक्त ग्लॅमरच्याच क्षेत्रत घडतंय असं आहे का? 
- मला वाटतं, नाही. 
आयटीपासून कॉर्पोरेटर्पयत आणि बॅँकिंगपासून मॅनेजमेण्टर्पयत सगळ्याच क्षेत्रत कामाची अतिरेकी प्रेशर्स आहेत, स्पर्धा आहे, करिअरमध्ये तगून राहण्याची धडपड आहे. आमच्या क्षेत्रला ग्लॅमर असल्याने या गोष्टींची चर्चा जास्त होते इतकाच फरक.
 सिनेमा, टेलिव्हिजनच्या ग्लॅमरस दुनियेत काम करणारे आम्ही रोज निरनिराळ्या ताणांना सामोरे जात असतो. कामाचा, काम मिळवण्याचा, टिकून राहण्याचा विलक्षण ताण सदैव सर्वावर असतो.
- त्या ताणावर मात करण्याचा एकच उपाय आहे : तुमच्या प्रेमाची, जिवाची माणसं. ती बरोबर असली तरच आणि तेव्हाच स्थिर आणि शांतपणो काम करता येतं या क्षेत्रत. काम संपवून घरी गेल्यावर मला समजून घेणारी, माङयावर निव्र्याज प्रेम करणारी माझी माणसं आहेत ही भावनाच तगून राहण्याचं बळ देते. 
मी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढले. मध्यमवर्गीय संस्कारांच्या भक्कम पायामुळेच मला ताण हाताळायला मदत होते असं नक्की वाटतं. तुम्ही कितीही पैसा मिळवा, कोणाही बरोबर काम करा किंवा करू नका, तुमचे संस्कारच तुम्हाला कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळ देत असतात. 
‘नटरंग’ हीट झाला. त्यातल्या ‘वाजले की बारा’ या लावणीने मला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. पण या यशानंतर तब्बल दोन र्वष माङया हातात सिनेमे नव्हते. तो काळ माङयासाठीही स्ट्रगलचाच होता. पण मी माङो प्रयत्न प्रामाणिकपणो करत राहिले. काम नाही म्हणून अस्वस्थ होऊन वाट्टेल ते मिळवण्याची धडपड तुम्हाला कुठेच घेऊन जात नाही. उलट अशावेळी स्वत:वर आणि स्वत:च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवून प्रयत्न करावे लागतात. याच काळात कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असते. 
इथेच नेमकी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. एका यशाने बदललेली जीवनशैली टिकवण्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार होतात. काम नाहीये, हाताशी कालच्याइतका पैसा नाहीये तरीही श्रीमंती दाखवण्याचा खोटा सोस सुटत नाही हा मूर्खपणा आहे. ‘शोशा’च्या पलीकडे खरं जगणं असतं. त्या शोशासाठी कर्जबाजारी होण्यापेक्षा शांत बसावं. पण दुर्दैवाने ते अनेकांना जमत नाही.
या क्षेत्रत काम करताना आणखी एक भान सतत जागं ठेवावं लागतं- कुठलाही प्रसंग किंवा घटना असो, करिअरमधला कुठलाही टप्पा असो नाहीतर कुठलीही व्यक्ती, आपण त्याच्यासाठी जीव द्यावा इतकं महत्त्वाचं काहीच नसतं!
ग्लॅमर जगतात स्पर्धा असणारच आहे. असुरक्षिततेची भावना निर्माण होणारच असते. या सगळ्या गोष्टी हाताळता याव्या लागतात. यासाठी तुम्ही या क्षेत्रत का आला आहात, तुमचा फोकस काय आहे हे स्पष्टच पाहिजे. 
या क्षेत्रत येण्यासाठी/आल्यामुळे जे कुणी घराशी संबंध तोडतात किंवा असं तोडणं अपरिहार्यच होऊन बसतं, त्यांची अवस्था फार नाजूक होते; हे मी पाहिलं आहे.
या क्षेत्रतल्या आम्ही ता:यांचा दुसरा शत्रू थोडा मॉडर्न आहे : सोशल नेटवर्किंग! 
- आमच्या जगतातले बहुतेक सगळे सोशल मीडियावर असतात आणि सतत स्वत:चे अपडेट्स देत असतात. मी आत्ता कुठे आहे, कुणाबरोबर आहे, काय करते/खाते/पिते/बोलते आहे, कुठला ड्रेस घातलाय..
यातूनही ताण निर्माण होतो आहे, जो चटकन दिसत नाही. ‘नच बलिये’ जिंकल्यानंतर मी आणि हेमांशू आम्हा दोघांचे फोटो फेसबुक नाहीतर ट्विटरवर का टाकत नाही, यावरून शंकाकुशंकांचं केवढं वादळ उसळलं होतं.. अनेकांनी तर आमचं नातं संपलं इथवरचे निष्कर्ष काढले आणि परस्पर जाहीरही करून टाकले. 
- मी सोशल मीडियावर माङया जोडीदाराबरोबरचा एकत्र फोटो टाकते की नाही यावरून माङया नात्याचं स्टेटस ठरणार आहे का? 
- नेमकं असंच होतं आहे. त्या ‘आभासी’ जगातलं आपल्या आयुष्याचं चित्र ‘परफेक्ट’ असलं-दिसलं पाहिजे, या वेडय़ा हट्टापायी येणारा ताण प्रचंड मोठा असतो. पण अनेकदा आमच्या क्षेत्रतल्या अनेकांना हे समजत नाही. तिथे पोस्ट होणा:या पाटर्य़ाचे फोटो, कपडे, डेस्टिनेशनचे फोटो यातूनही असुरक्षित होणारे कितीतरी असतात.
मला वाटतं या सगळ्यावर एकच उपाय आहे : तुमचा फोकस. तो स्वच्छ हवा. मी या क्षेत्रत माङया कलेच्या प्रेमापोटी आले आहे. मी जे काही करते, मग ते माझं काम असो नाहीतर माझं नटणं असो, ते मी माङयासाठी करते. इतर कुणाहीसाठी नाही.. असं ठरवता आणि तसं जगता येणं हा एक उत्तम मार्ग आहे, एवढं मला समजलं आहे आत्तार्पयत!
 स्वत:साठी जगायला शिकलं पाहिजे. नाती जपली पाहिजेत. त्यांना वेळ दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताण असणारच हे गृहीत धरून तो कसा हाताळायचा याची काही योजना मनात तयार हवी. तसं वागायला स्वत:ला शिकवायला हवं.
कुठेही जा, कितीही यश मिळवा, अपयशाला सामोरे जा, आपण कुठून आलो आहोत हे विसरून चालत नाही. तीच आपली ताकद असते.