उद्या करू... अजून जरा तयार करून काम सुरू करू... अशा अनेक सबबी आपल्याकडे असतात. कामं पुढे ढकलताना आपण स्वतःलाच अशा अनेक सबबी देतो. त्या क्षणी त्या पटण्यासारख्या वाटतात, पण प्रत्यक्षात तो फक्त 'गैरसमज' असतो. त्यातून खरं तर नुकसानच होतं. चला पाहूया असेच गैरसमज अन् त्यावरील उपाय...
जास्त तयारी करण्यासाठी वेळ घालवणं गैरसमज : अजून संशोधन/नियोजन केल्याने काम उत्तम होईल.नुकसान : अखंड तयारीत वेळ जातो, पण काम सुरूच होत नाही.उपाय : तयारीला वेळेची मर्यादा ठेवा. कृतीशिवाय प्रगती नाही.
कामं सारखी सारखी बदलत राहणंगैरसमज : छोटी-छोटी कामं पूर्ण केल्याने प्रगती होत आहे.नुकसान : महत्त्वाची आणि कठीण कामं सतत मागे पडतात.उपाय : सर्वात जड वाटणारं काम आधी करा.
परिपूर्णतेच्या प्रतीक्षेत थांबून राहणंगैरसमज : परिपूर्णतेने काम केल्यास यश निश्चित मिळेल.नुकसान : परिपूर्ण क्षण कधीच येत नाही; वेळ वाया जातो.उपाय : सुरुवात करा, सुधारणा नंतर करता येईल.
उत्पादनक्षमतेच्या भ्रमात राहणं गैरसमज : सतत व्यग्र राहिल्याने खरी प्रगती होत आहे.नुकसान : महत्त्वाची कामं बाजूला राहतात.उपाय : व्यग्रतेपेक्षा परिणाम मोजा.
फक्त इतरांना मदत करत राहणंगैरसमज : इतरांना मदत म्हणजे समाधान व प्रगती दोन्ही होतील.नुकसान : स्वतःचं महत्त्वाचं काम अधांतरी राहतं.उपाय : स्वतःचं काम पूर्ण केल्यानंतरच इतरांना मदत करा.
चुका होण्याच्या भीतीमुळे विलंबगैरसमज : वेळ घेतल्याने चुका टळतील.नुकसान : भीतीमुळे कृती थांबते, संधी हातून जाते.उपाय : ठाम डेडलाइन ठेवा. चूक झाली तरी ती शिकवते.
जुन्या कामावर वारंवार परतणंगैरसमज : सुधारणा केल्याने काम अजून चांगलं होईल.नुकसान : नवं काम सुरूच होत नाही.उपाय : पूर्ण झालं की पुढे जा. खरी वाढ नव्या आव्हानांत आहे.