शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 4:47 PM

प्रियांका चोप्रा, विराट कोहली, शाहरूख, सलमान. हे इन्स्टाग्रामवरचे सर्वात लोकप्रिय इन्फ्लुएन्सर्स. विराट क्रिकेटच्या मैदानावरचा स्टार असला तरी इन्स्टाग्रामवर पहिल्या क्रमांकावर आहे प्रियांका. इन्स्टाग्रामवर केवळ एक फोटो पोस्ट केला, तर प्रियांकाला मिळतात दोन कोटी, तर विराटला दीड कोटी रुपये! मॉडेल कायेली जेन्नर जगात पहिल्या क्रमांकावर असून, एका पोस्टसाठी ती तब्बल दहा कोटी रु पये घेते!  त्यांच्याशिवाय अनेक जण इथे आपलं भविष्य अजमावून पाहात असतात. त्यातून खरंच त्यांना कमाई होते की घाटा? करिअर उदयाला येतं की निराशेचा घोर अंधार? हे ऑनलाइन मार्केट नेमकं चालतं तरी कसं?.

ठळक मुद्देस्वप्नाळू तरुणांच्या आयुष्यावर सेलिब्रिटींचा प्रभाव पडतो तरी कसा?

- राहुल बनसोडे

विराट कोहली हा भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान आहे. अवघ्या 205 एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेगाने पहिल्या दहा हजार धावा बनविण्याचा मान त्याच्या खाती जमा आहे, याशिवाय अलीकडे भारतीय टीमला मिळणार्‍या यशाचे बरेचसे र्शेयही त्याला जाते. भारतीय क्रि केट टीमचा कप्तान असण्यासोबतच त्याची दुसरी ओळख आहे ती प्रसिद्ध सिनेतारका अनुष्का शर्मा हिचा पती असल्याची. विराट आणि अनुष्काच्या जोडीला एकत्रितरीत्या विरुष्का असे म्हटले जाते आणि त्यांच्या रोमान्सच्या बातम्या अधूनमधून माध्यमांमध्ये झळकत असतात. या दोन ओळखींपलीकडे विराट कोहलीची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे इन्स्टाग्रामवरच्या सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी तो एक आहे. विराटच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउण्टवर त्याचे सध्या चार कोटी चाळीस लाख फॉलोअर्स असून, या वर्षाअखेरीस तो आकडा पाच कोटी होण्याची शक्यता आहे. विराटची लोकप्रियता मोजायची झाल्यास ती फक्त किती लोक त्याला टीव्हीवर क्रिकेट सामना खेळताना पहातात एवढय़ापुरतीच र्मयादित नसून त्याचे फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत आणि त्यातले किती लोक त्याच्या पोस्टला लाइक करतात याचीही आहे. त्याच्या खेळाच्या चाहत्यांची संख्या सहज मोजता येत नसली तरी त्याच्या इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्सची संख्या आणि त्याने शेअर केलेल्या फोटोजवर येणार्‍या लाइक्सची संख्या सहज मोजता येते. विराट कोहली आपल्या फॉलोअर्सला जे काही सांगेल त्याला किती लोक गांभीर्याने घेतील यासंबंधी अंदाज इथे लावता येतो.एरव्ही विराट कोहलीची लोकप्रियता अशी संख्येने मोजायची गरजच काय, असा प्रश्न कुणालाही सहज पडू शकेल. पण विराटच्या प्रत्येक गोष्टींची लोकप्रियता नेमकी मोजणे ही बाजारपेठेची गरज आहे, अशी लोकप्रियता मोजल्यानंतर विराटमार्फत त्याच्या फॉलोअर्सला निरनिराळ्या वस्तू विकणे हीदेखील बाजारपेठेची गरजच आहे. अँडव्हर्टाइजच्या दुनियेत गंमतीने असे म्हटले जाते की, भारतात सुपरस्टार लोकांच्या अंतर्वस्रांवरही कंपन्यांचे अधिराज्य असते. शाहरूख-सलमान खान, आणि विराट कोहलीच्या बाबतीत हे तंतोतंत खरे आहे. ‘लक्स कोजी’ ह्या अंतर्वस्रांच्या ब्रँड अँम्बॅसडरशिवाय विराट कोहली ‘वन-एट’ या ब्रँडचा मालक असून, त्या कंपनीमार्फत एनर्जी ड्रिंक, बाटलीबंद पाणी, सुगंधी फवारे, लहान मुलांचे कपडे  विकले जातात, इतकेच काय रेस्टॉरंट्सही चालवली जातात. क्रि केटपटूने आपल्या लोकप्रियतेचा वापर करून पैसा कमाविण्याचे तंत्न सुनील गावस्कर यांनी सुरू केले, सचिन तेंडुलकर याने ते शंभर पावले पुढे नेले आणि आज या तंत्नाचा वापर करून विराट कोहली कोट्यवधी रुपये कमावतो आहे.‘हॉपर एच-क्यू’  ह्या सोशल मीडिया मार्केटिंग कंपनीने अलीकडे केलेल्या एका सर्वेक्षणानुसार इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून सर्वात जास्त पैसे कमाविणार्‍या लोकांमध्ये विराट कोहली याचे नाव तेविसाव्या क्रमांकावर येते. आपल्या पोस्टमध्ये एखाद्या उत्पादनाची जाहिरात करायची असल्यास विराट दोन लाख डॉलर्स म्हणजे जवळ जवळ दीड कोटी रुपये घेतो. अवघ्या एकाच फोटोतून इतके पैसे कमाविणार्‍या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये प्रियांका चोप्रा ही विराटपेक्षाही एक पायरी सरस आहे. ती एका पोस्टचे दोन कोटी रुपये घेते. ह्या यादीत सर्वात वरचा क्रमांक कायेली जेन्नर नावाच्या मॉडेलचा असून, ती एका पोस्टसाठी दहा कोटी रु पये घेते. एरव्ही दिवसातून दोन वेळा व्हॉट्सअँपवर डीपी बदलणार्‍या लोकांसाठी हा आकडा नक्कीच चक्रावणारा वाटू शकेल. इन्स्टाग्रामवर अँक्टिव्ह असणर्‍या तरुणांना मात्न याबद्दल बरेच काही माहिती असण्याची शक्यता आहे. विराट कोहली, प्रियांका चोप्रा आणि कायेली जेन्नर हे इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर असून, स्वप्नाळू तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत. विराट किंवा प्रियांका काय खातात, काय पितात, कुठे फिरायला जातात याची इत्थंभूत माहिती त्यांच्या फॉलोअर्सकडे असते, अधूनमधून कित्येकांना स्वप्नातसुद्धा हे लोक दिसतात, म्हणजे या दोघांचा त्यांच्या फॉलोअर्सच्या आयुष्यावर किती प्रभाव आहे हे सहज लक्षात येते. आपल्या आवडत्या स्टारने आपल्याला एखादे उत्पादन विकत घ्यायला सांगितले तर ते नक्कीच चांगले असणार असा त्यांचे फॉलोअर्स समज करून घेतात, शिवाय अशा ब्रँडच्या वस्तू विकत घेतल्यानंतर आपण एखाद्या स्टारचे किती मोठे फॅन आहोत ते मिरविण्याची संधी फॉलोअर्सला अवचितच मिळते. याशिवाय आपल्या आवडत्या स्टार्सने सांगितलेल्या गोष्टी विकत घेतल्यानंतर काही फॉलोअर्सला आत्मिक समाधानही मिळते, तो स्टार एखादी गोष्ट अँडव्हर्टाइज करीत असताना जणू काही आपल्याशी व्यक्तिगत संवादच साधतो आहे असे त्याच्या अनेक फॉलोअर्सला वाटते. या मानसिक स्थितीचे मानसशास्रज्ञांनी  इरोटोमेनिया  असे वर्गिकरण केले असून, या स्थितीत निरनिराळ्या माध्यमांतून आपला आवडता स्टार आपल्याशी संवाद साधत असल्याचा भ्रम काहींना होतो. इन्स्टाग्राम सेलिब्रिटीशिवाय विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा यांचे पोटापाण्याचे धंदे वेगळे आहेत, इन्स्टाग्राम नसले तरी ते त्यांच्या मुख्य धंद्यातून पैसे कमावूच शकतात आणि इतर जाहिरातींमध्येही काम करू शकतात. काहींसाठी मात्न इन्स्टाग्राम हाच पूर्णवेळचा पोटापाण्याचा धंदा आहे आणि पोटपाणीच काय; पण भरमसाठ पैसा कमाविण्याचेही साधन आहे. इतर कुठल्या माध्यमांना माहीत नसणारे; पण फक्त इन्स्टाग्रामवरच प्रचंड प्रसिद्ध असणार्‍या लोकांना इन्स्टाग्राम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असे म्हटले जाते. अशा इन्फ्लुएन्सर्ससाठी सायबर स्टार, की-ओपिनीयन लिडर, ऑनलाइन सेलिब्रिटी, ब्लॉगब्रेटी किंवा मायक्रो-सेलिब्रिटी अशी अनेक संबोधने वापरली जातात. या ऑनलाइन सेलिब्रिटींची इन्स्टाग्राम वापरण्याची सुरुवात सर्वसामान्य वापरकर्त्यांप्रमाणेच सुरू  होते. त्यांच्या जवळ असलेली उपजत कला अथवा मोठय़ा प्रयासाने शिकून मिळविलेले टॅलेंट किंवा शरीरसौंदर्य त्यांच्याकडे असते. याशिवाय नवनवीन तंत्नज्ञान, व्हिडीओ गेम्स, राजकारण, करमणूक इत्यादी विषयांमध्ये पॅशन असणार्‍या लोकांनाही इन्स्टाग्रामचे वापरकर्ते सेलिब्रिटी बनवू शकतात. काहींना अकाउण्ट उघडण्यापासूनच सेलिब्रिटी बनण्याचे ध्येय असते तर काहींच्या बाबतीत त्यांच्या पोस्ट मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे ते सेलिब्रिटी बनतात. अर्थात सेलिब्रिटी बनण्याचे ध्येय ठेवले तरी सगळेच लोक त्यात यशस्वी होतातच असे नाही, किंबहुना यात अयशस्वी लोकांचा आकडाच प्रचंड मोठा आहे. नशिबाने या ना त्या कारणाने तात्पुरत्या लोकप्रिय झालेल्या लोकांनाही नंतर आपला फॅनबेस टिकवता आला नाही तर ते स्पर्धेत मागे पडतात. लोकप्रियतेच्या स्पर्धेत टिकून रहाणे हे ऑनलाइन सेलिब्रिटींचे एकमेव ध्येय असते आणि ते त्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. अलीकडे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतात प्रत्येक सहापैकी एका तरुणाला ऑनलाइन सेलिब्रिटी बनण्याची आकांक्षा आहे त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. दुसर्‍या एका सर्वेक्षणानुसार भारतीय तरुणांतल्या पन्नास टक्के लोकसंख्येला एकविसाव्या शतकात नोकरी करण्यासाठी लागणारे कुठलेही ज्ञान नाही. याचाच अर्थ असा की त्यांना आयुष्यात कुठलाही जॉब करणे शक्य होणार नाही आणि तो मिळणारही नाही. भारतीय बेरोजगार तरुणांचा आणि ऑनलाइन सेलिब्रिटी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांचा लसावी काढायचा झाल्यास तो प्रचंड मोठा येऊ शकतो, असे असले तरी इन्स्टाग्रामचा वापर वा त्याच्या लोकप्रियतेत कुठलीही कमतरता आलेली नाही. एक ना एक दिवस आपणदेखील ऑनलाइन सेलिब्रिटी बनू आणि त्यानंतर जगातली सर्व सुखे आपल्या पायाशी लोळण घेतील अशा दिवास्वप्नात भारतातली एक मोठी तरुणाई जगते आहे, यांच्यातल्या अनेकांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही; पण सध्या मूलभूत ज्ञानाविषयीची तरुणांची अनास्था आणि आसपासची बेरोजगारीची परिस्थिती पहाता हे ऑनलाइन सेलिब्रिटी किमान खोटी का होईना; पण तरुणांना काहीतरी आशा देत असतात.

ऑनलाइन सेलिब्रिटी पैसे कसे कमावतात?ऑनलाइन सेलिब्रिटी आपल्या वॉलवर पेड प्रमोशन पोस्ट करू शकतात. मोठे सेलिब्रिटी कोट्यवधी रुपये कमावतात. चाळीस हजार ते एक लाख फॉलोइंग असणार्‍या सेलिब्रिटींना पाच ते दहा हजार रुपये प्रतिपोस्ट दिले जातात. साधारण एक लाख ते दहा लाख फॅन फॉलोइंग असणार्‍या सेलिब्रिटींसाठी हाच आकडा पन्नास हजार, एक लाख वा पाच लाखापर्यंतही जाऊ शकतो. ऑनलाइन सेलिब्रिटीज शक्यतो फॅशन, टेक्नॉलॉजी, व्हिडीओ गेम्स, राजकारण, मनोरंजनात्मक वस्तू आणि सेवांची जाहिरात करतात. याशिवाय विशेष फॅन फॉलोइंग नसणार्‍यांना कुठलाही वेगळा मोबदला न देता फक्त आपली वस्तू ट्रायल म्हणून मोफत दिली जाते. अशा मोफत वस्तू, सेवा, महागड्या हॉटेलात जेवण, क्वचित व्हॅकेशन स्पॉटवरती मोफत निवास आणि तिकीट याचाही यात समावेश असतो. इन्फ्लुएन्सर्स मार्फत जो ब्रँड अथवा जी वस्तू प्रमोट केली जाते आहे ती नामांकित कंपनीची असल्यास अँडव्हर्टाइजचे पैसे अँडव्हान्स दिले जातात वा प्रमोशनच्या वेळीच दिले जातात. प्रॉडक्ट नवीन असल्यास हे पैसे उशिराने मिळतात, क्वचित बुडतातही. ट्रायल प्रॉडक्ट्समध्ये कित्येकदा नवीन फॅशनचे कपडे, सौंदर्य प्रसाधने, मोफत डाउनलोड करता येतील असे गेम्स, कॅमेर्‍याच्या लेन्सेस, अँक्सेसरीज यांचा समावेश असतो.ऑनलाइन सेलिब्रिटी म्हणून करिअर करता येऊ शकते का?ऑनलाइन सेलिब्रिटी म्हणून करिअर निश्चितच करता येऊ शकते; परंतु ते लाइफटाइम करिअर असू शकत नाही. शिवाय आपले अकाउण्ट नावारूपाला येईपर्यंत बराच वेळ, र्शम आणि पैसा खर्च होऊ शकतो. वारंवार अपयशालाही सामोरे जावे लागू शकते. सेलिब्रिटी बनण्याची नुस्तीच स्वप्ने कोट्यवधी लोक पहातात; पण त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणारे काही लाखच असू शकतील, त्यातही काही हजार लोकांनाच त्यात यश येऊ शकते. सेलिब्रिटी असले तरीही आपल्या फॉलोअर्सला आकर्षित करण्यासाठी दरवेळी नवनवे प्रयोग आणि युक्त्या लढवाव्या लागतात आणि त्यासाठी सतत विचार करावा लागतो, शूटिंगही करत रहावे लागते. हे काम तसे दमवणारे असले तरी तेच तुमचे पॅशनही असेल तर त्यातली मेहनत फारशी जाणवत नाही. ऑनलाइन पैसे कमावण्यासाठी इंटरनेटवर असंख्य स्वयंघोषित गुरू असून, ते निरनिराळ्या पद्धतीने तरु णांना भुलवून इन्स्टंट पैसे कमाविण्याचे मार्ग दाखविण्याची आश्वासने देतात, मात्र यात बहुतांश लोकांची फसवणूकच झाली आहे. पैसे कमावण्याऐवजी गमावण्याचीच वेळ अनेकांवर आली आहे.मॉडेलिंग वा अभिनयात करिअर;इन्स्टाग्रामचा उपयोग होतो?शारीरिक सौंदर्य आणि अभिनयक्षमता असल्यास सुरुवातीच्या काळात इन्स्टाग्राममध्ये आपले कौशल्य दाखविण्यासाठी बराचसा उपयोग होतो. पण इथेही स्पर्धा खूपच तगडी आहे. इन्स्टाग्रामच्या तीस टक्क्याहून अधिक पोस्ट कधीही पाहिल्या जात नाहीत, उरलेल्या पोस्ट्सलाही फारसा प्रतिसाद असतोच असे नाही. या स्पर्धेतून पुढे सरकून लोकप्रिय होता आल्यास अगोदर इन्स्टाग्रामपुरत्याच जाहिराती व पेड प्रमोशन्समध्ये काम मिळू शकते. तेही लोकप्रिय झाल्यास एखादा फॅशन शो वा शॉर्टफिल्ममध्ये काम मिळू शकते; पण त्यात सुरुवातीचा मोबदला अतिशय कमी असतो. याशिवाय इन्स्टाग्रामवरती मॉडेलिंग करणार्‍यांकडून अंगप्रदर्शनासाठी वा इतर फेव्हर्ससाठी बर्‍याचवेळा दबाव टाकला जातो. काहींना याची पूर्वकल्पना असल्याने ते स्वेच्छेने वा नाइलाजाने हे वास्तव स्वीकारतात. प्रत्येकालाच हे शक्य होते असे नाही; ज्यामुळे इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.इन्स्टाग्रामचे मार्केटजगभरात इन्स्टाग्रामवर ऐंशी लाखाहून जास्त बिजनेस अकाउण्ट्स आहेत. रिटेलिंग क्षेत्नातल्या ऐंशी टक्के कंपन्यांचे इन्स्टाग्रामवर अकाउण्ट आहे; ज्यात थेट ऑनलाइन शॉपिंगही करता येते. इन्स्टाग्रामवर केल्या जाणार्‍या जाहिरातींची एकूण उलाढाल सात अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे. ऑनलाइन सेलिब्रिटींपैकी ऐंशी टक्के इन्फ्लुएन्सर्सची प्रथम पसंती इन्स्टाग्रामला आहे; जे निरनिराळ्या जाहिरातींच्या तीन कोटींपेक्षा जास्त पोस्ट्स दरवर्षी करतात. कितीतरी महागडी हॉटेल्स ही इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना सोयीची आणि आकर्षक वाटतील अशी वास्तुरचना आणि अन्नपदार्थ उपलब्ध करून देतात. क्वचित काही हॉटेल्स आणि कार्यक्रम हे फक्त इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्ससाठीच राखीव असतात. अनेक मोबाइल कंपन्यांनी आपल्या हॅण्डसेटच्या फ्रंट कॅमेर्‍याचे तंत्नज्ञान इन्स्टाग्रामच्या हिशेबाने अपडेट केले असून, काही महागड्या डीएसएलआर कॅमेर्‍याध्येही त्वरित इन्स्टाग्राम अपलोडची सोय उपलब्ध असते. इन्स्टाग्रामवर असणार्‍या विविध बिजनेसमध्ये सौंदर्यप्रसाधने आणि फॅशनेबल कपडे यांचा क्र मांक सगळ्यात वरचा आहे. जगभरात फक्त त्वचेसाठी आज पंचवीस हजारांहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. केसांसाठी, दातांसाठी आणि नखांसाठीदेखील हजारो उत्पादने उपलब्ध आहेत. जगभरातली उच्च दर्जाची फॅशन इंडस्ट्री ही जवळजवळ इन्स्टाग्रामच्या अनुकूलतेनुसार काम करीत असून, असे फॅशन ब्रँड दर पाच दिवसांनी आपली नवी स्टाइल बाजारात आणीत असतात. इन्स्टाग्रामवरचा कुठलाही फॅशन ट्रेण्ड अवघ्या एका आठवड्यात कालबाह्य होतो, कितीतरी इन्फ्लुएन्सर्स इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एकदा वापरलेले कपडे पुन्हा कधीही वापरीत नाही. rahulbaba@gmail.com(लेखक समाजमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)