शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
5
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
6
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
7
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
9
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
10
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
11
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
12
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
13
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
14
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
15
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
16
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
17
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
18
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
19
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
Daily Top 2Weekly Top 5

FBवरून जगप्रसिद्ध झाला 'रंगीला'; तुम्ही पाहिलात का त्याचा तोरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 06:05 IST

पाल, साप, सरडे हे तसे दुर्लक्षितच. त्यांच्या अभ्यासकांनाही प्रतिष्ठा मिळत नाही. तथापि गेल्या काही वर्षांपासून रंगीत गळ्याच्या सरड्याला  चांगलीच प्रसिद्धी मिळते आहे.  हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत  या सरड्याचा वावर असला तरी  महाराष्ट्रातही त्याचा अधिवास मोठय़ा प्रमाणात आहे.  या सरड्याचे विभ्रम टिपण्यासाठी सध्या रसिकांची भ्रमंती सुरू झाली आहे.

ठळक मुद्देया सरड्याला ‘फॅन थ्रोटेड’ अथवा ‘रंगीत गळ्याचा’ हे विशेषण लागण्याचे कारण म्हणजे ‘नर’ सरड्याचा गळा अन् त्या गळ्याचा रंग. नर आणि मादी सारखेच दिसत असले तरी विणीच्या काळात (एप्रिल-मे) नराच्या गळ्याला सुंदर, आकर्षक रंगाची छोटीशी पिशवी दिसू लागते.

- प्रा. डॉ. सुधाकर कुर्‍हाडे

साप, विंचू, पाल, झुरळ हे जीव सर्वसामान्यांना खरं तर कधीच आपले अथवा आपलेसे करावे वाटत नाहीत. सापांबद्दल भीतीयुक्त आदर, चित्रपटांमधून केले गेलेले नाग-नागिणीचे अशास्रीय चित्रण आणि प्रदर्शन, त्यांच्याबद्दलच्या दंतकथा वगैरे. ‘विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर’ या शालेय जीवनातील मराठीच्या अभ्यासक्रमातील म्हणीमधून विंचवाची आणि आपली (शहरवासीयांत) पहिली ओळख. त्याची आकडीबाज नांगी, वेदनादायक डंख अन् कोकणात होणारे विंचू डंखामुळे मृत्यू ही आपली अन् विंचवाची भीतिदायक ओळख. यांच्या तुलनेत पाल आणि झुरळ हे आपलेच, म्हणजे घराघरांत आढळणारे. पाल आणि झुरळ नाही असं ‘घर’ क्वचितच असावं, एवढे ऋणानुबंध या जिवांशी.पाल, साप, सरडे हे तसे दुर्लक्षितच. सर्पमित्रांमुळे सापांना अन् सापांमुळे सर्पमित्रांनाही प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. अशी प्रतिष्ठा पाल, सरडे यांच्या अभ्यासकांना आजही मिळालेली दिसत नाही (एक-दोन अपवादवगळता). तथापि, ‘फेसबुक’सारख्या हुकमी प्रसारमाध्यमाने गेल्या दोन-तीन वर्षांपासून एका सरड्यासही प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. मार्च-एप्रिल सुरू झाला की हे महाशय ‘फेसबुक’वर अवतीर्ण होतात. हा सरडा म्हणजे ‘फॅन थ्रोटेड लिझार्ड’, अर्थात ‘रंगीत गळ्याचा सरडा.’महाराष्ट्राचं वर्णनच मुळी ‘दगड-धोंड्यांचा, राकट कणखर प्रदेश’ असा केला जातो. हाच या रंगीत गळ्याच्या सरड्याचा अधिवास आहे. महाराष्ट्रात सर्वत्र सर्वदूर (काही भागवगळता) हा सरडा दिसतोच. तसं पाहिलं तर घरातील पालीपेक्षाही आकाराने लहान असलेला हा सरडा. गवताळ माळराने, उघडे-बोडखे डोंगर, दगड-गोट्यांचा परिसर हाच याचा अधिवास.उन्हाळा सुरू झाला की अनेक निसर्ग छायाचित्रकार मंडळी याचा वेध घेण्यासाठी जवळपासच्या डोंगर-रांगांमध्ये सकाळ-सायंकाळ फिरू लागतात. या सरड्याचा वेध घ्यायला शोधक अन् तीक्ष्ण नजर लागते. कारण हे सरडे आपल्या परिसराशी एकरूप होऊन राहतात, तथापि एकदा का त्याच्या सवयी, खोड्या माहीत झाल्या की छायाचित्रकारासाठी ती पर्वणीच !मातकट-तपकिरी रंगाची पाठ, पाठीच्या मध्यावर म्हणजेच कण्यावर शंकरपाळ्यांच्या आकाराचे काळसर रंगाचे ठिपके, या शंकरपाळ्यांच्या मध्ये लहान काळसर ठिपके दिसून येतात. याच्या पोटाचा भाग फिकट पिवळसर रंगाचा असून, बारीक, निमुळती शेपटी बरीच लांब असते. सर्वच सरड्यांच्या शरीरावर लहान-मोठय़ा आकाराचे खवले आढळतात. डोक्यावरील खवले लहान; परंतु मध्यभागी कणा (कील) असतो. पाठीवरील खवले पोटावरील खवल्यांपेक्षा आकाराने मोठे/पसरट असतात, पाठीवरील खवले अधिक टोकदार, कठीण असल्याने स्वसंरक्षणासाठी त्यांचा उपयोग होतो. पुढील पायांपेक्षा मागील पाय लांब अन् मजबूत असल्याने अनेक वेळेस हा सरड6ा मागच्या दोन पायांवर उभा राहून परिसराची टेहाळणी करताना दिसतो. सर्व पायांवरही खवले असल्याने ‘सरडा’ खरखरीत असतो. या सरड्याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे याच्या प्रत्येक पायाला चारच बोटे असतात.या सरड्याला ‘फॅन थ्रोटेड’ अथवा ‘रंगीत गळ्याचा’ हे विशेषण लागण्याचे कारण म्हणजे ‘नर’ सरड्याचा गळा अन् त्या गळ्याचा रंग. नर आणि मादी सारखेच दिसत असले तरी विणीच्या काळात (एप्रिल-मे) नराच्या गळ्याला सुंदर, आकर्षक रंगाची छोटीशी पिशवी दिसू लागते. ही पिशवी चमकदार मोरपंखी निळा (चिंतामणी), काळा अन् लाल अशा तीन रंगात दिसून येते. अशी आकर्षक पिशवी मादीला नसते. विणीच्या काळात नर सरडा सकाळच्या वेळेस आपल्या लपण्याच्या जागेतून बाहेर येऊन, एखाद्या दगडावर वा उंच टेकाडावर जाऊन गळ्याची ही आकर्षक पिशवी फुगवून स्वत:चे अस्तित्व इतर जोडीदारांना दाखवून देतो. हे करीत असताना तो मादी जवळपास आहे का, याचाही अंदाज घेतो. मादी टप्प्यात असल्यास हा गळ्याचा आकर्षक पंखा जोरजोरात लहान मोठा फुगवून मादीला स्वत:कडे आकर्षित करतो. अर्थात यावेळी प्रतिस्पर्धीही असणारच. मग हे दोघे अगदी पहिलवानांसारखे दोन पायांवर उभे राहून एकमेकांना आव्हान देतात. क्वचितप्रसंगी त्यांच्यात द्वंद्वदेखील होते. नंतर विजेता मादीसोबत मीलन करतो. या सगळ्या कसरती, मुद्रा निसर्ग छायाचित्रकार मंडळी मोठय़ा तपश्चर्येप्रमाणे कॅमेराबद्ध करतात अन् फेसबुक या रंगीत गळ्याच्या सरड्यांच्या छायाचित्रांनी गजबजून जाते.गेल्यावर्षी तर एका सहल संयोजकाने पश्चिम महाराष्ट्रात या सरड्याच्या छायाचित्रणासाठी सहलीही आयोजित केल्या होत्या. याला पुष्टी म्हणून ‘या सरड्याच्या भोवताली 20-25 छायाचित्रकार मंडळी झोपून छायाचित्र काढतानाचे’ छायाचित्रही चर्चेचा विषय झाले होते. हा सोहळा मे-जूनपर्यंत सुरू असतो.मीलनानंतर मादी जमिनीमध्ये सुमारे सहा सेंटीमीटर खोलीचा एक लहान खड्डा तयार करून त्यात सुमारे 13 अंडी घालते. या अंड्यांवर पुढील पायाने माती लोटून हा खड्डा बुजवून पूर्ववत केला जातो, सर्वसाधारण 39 दिवसांच्या उबवणीकाळानंतर या अंड्यांमधून सरड्यांची पिल्ले बाहेर येतात. एका वर्षात मादी दोन-तीन वेळेस अंडी घालते. अंड्यांची संख्या, मादीचे वय, तापमान, पर्जन्यमान यावरही अवलंबून असल्याचे अभ्यासकांनी सिद्ध केले आहे.डॉ. दीपक, व्यास, वरद गिरी, मोहंमद असिफ, झांबरे, पाल, मधुसुमिता, देसाई, सोनी यांसारख्या अनेक अभ्यासकांनी गेली कित्येक वर्षे सरड्यांच्या प्रजननाचा, खाण्याच्या सवयींचा अभ्यास केला आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत या सरड्याचा विस्तार दिसून येत असल्याने, भारताच्या विविध भागात विविधांगाने याचा अभ्यास झाला आहे. आजवर (2016 पर्यंत) या सरड्याचा ‘सिटाना’ या प्रजातीचा समावेश होता. क्युविअर या संशोधकाने सर्वप्रथम 1829 साली या ‘सिटाना’ प्रजातीची विज्ञानास ओळख करून दिली. जेर्डान (1853) यांच्या मते ‘शैतान’ या शब्दावरून ‘सिटाना’ हा शब्द आला असावा.भारतात आढळणारे सर्वच ‘फॅन थ्रोटेड लिझार्ड’ 2016 पर्यंत ‘सिटाना’ प्रजातीमध्येच वर्गीकृत झालेले होते, तथापि वर उल्लेखित काही संशोधकांनी या सरड्याच्या गळ्याच्या रंगीत पिशवीचा (आकार, रंगसंगती, खवल्यांची रचना इ.) अभ्यास करून तद्वतच मायकोकाँड्रीयल जीन्स (ठऊ2)च्या रचनेचा आधार घेऊन ‘सरडा’ या नव्या प्रजातीचा शोध लावला. म्हणजेच आता भारतात ‘सिटाना’ आणि ‘सरडा’ या दोन प्रजातींचे फॅन थ्रोटोड लिझार्ड आढळतात हे शास्रीयदृष्ट्या निश्चित झाले आहे. ‘सिटाना’च्या पाठीवरील आणि मांड्यांवरील खवले हे ‘सरडा’ प्रजातीपेक्षा आकाराने मोठे असतात, हा एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. याशिवाय दोहोंमध्ये इतर अनेक फरक दिसून आले आहेत.हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत विस्तार असलेल्या या सरड्यांच्या खाद्यात, मुंगी, वाळवीसारखे कीटक, गोगलगायी, वनस्पतींच्या (गवताच्या) बियांचा समावेश असून, आठ ते नऊ तासांपर्यंत ते भक्ष्याच्या शोधार्थ माळावर फिरताना दिसतात. मीलनाच्या काळात त्यांचा (नराचा) स्वत:चा इलाका (परिसर) स्थापित करण्यासाठी ते गळ्याची रंगीत पिशवी फुगवून इतर प्रतिस्पर्धी नरांना आपल्या परिसरातून जाण्याची सूचना देतात. मादीला आकर्षित करण्यासाठी ते अगदी लहान झुडपांवर जाऊन या रंगीत पिशवीचे प्रदर्शन करतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातच ‘सिटाना’चे अस्तित्व जास्त प्रमाणात आढळून आल्याने याच्या संवर्धनाची जबाबदारीही आपलीच आहे. उजाड माळराने, डोंगर, गवताळ कुरणं हे विविध जिवांचे अधिवास असतातं.हा ‘रंगीला’ पहायला जाताना, त्याचे ‘प्री-वेडिंग शुट’ करताना त्याचा अधिवासही आपणच सांभाळायला/जपायला हवा.

(लेखक प्राणिशास्राचे प्राध्यापक आणि मानद वन्यजीव रक्षक आहेत.)

sudhakarkurhade@gmail.com