शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
7
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
8
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
9
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
10
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
11
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
12
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
13
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
14
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
15
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
16
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
17
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
18
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
19
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
20
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

युद्धात ज्याच्याकडे दमदार टेक्नॉलॉजी तो ठरणार भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:53 IST

War News: युक्रेनने गेल्या रविवारी ऑपरेशन ‘स्पायडर वेब’ राबवून त्यांच्या ११७ ड्रोनद्वारे रशियाच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला चढवला, ज्यामध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर्सना लक्ष्य केले गेले.

- डॉ. सुखदेव उंदरेयुक्रेनने गेल्या रविवारी ऑपरेशन ‘स्पायडर वेब’ राबवून त्यांच्या ११७ ड्रोनद्वारे रशियाच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला चढवला, ज्यामध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर्सना लक्ष्य केले गेले. हा हल्ला रशियाच्या सुरक्षा व्यवस्थेचे अपयश आहे. हल्ल्यानंतर मुरमान्स्क, इरकुत्स्क, इवानोजो, रियाजान आणि अमूर या पाच लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी युक्रेनी ड्रोन हल्ले झाल्याची पुष्टी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केली. पण यापैकी केवळ मुरमान्स्क आणि इरकुत्स्कमध्येच विमानांचे नुकसान झाले असून इतर ठिकाणचे हल्ले हाणून पाडण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे. परंतु त्याचबरोबर रशिया या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावर वक्तव्य केले आहे. बदला घेणार असे पुतिन यांनीच आपल्याला टेलिफोनवर सांगितले असल्याचा ट्रम्प यांनी दावा केला आहे. तेव्हा रशिया-युक्रेन युद्ध अजून पुढच्या टोकाला जाणार असल्याचे संकेत मिळताहेत.   युक्रेनच्या या ऑपरेशन ‘स्पायडर वेब’ने परंपरागतच नव्हे तर आधुनिक युद्धाचीही परिभाषा बदलली आहे.

‘स्मार्ट शस्त्रांनीच’ होतील युद्धे युक्रेनच्या या ऑपरेशनने अल्प खर्चाने तयार केलेली ओपन सोर्स ड्रोन प्रणाली अरबों रुपये खर्च करून तयार केलेल्या सुरक्षा उपकरणांनादेखील नष्ट करू शकते  हे स्पष्ट केले. युक्रेनने या हल्ल्यासाठी ज्या ड्रोन्सचा वापर केला, त्याची बाह्यरचना हेलिकॉप्टरसारखी असून त्यांना ‘क्वॉड कॉप्टर’ म्हटले जाते. या पुढील काळात आता युद्धे ही ‘मिसाईल  टँकर’ नव्हे तर ‘स्मार्ट शस्त्रांनीच’ निर्णायक ठरतील हे वास्तव आहे.त्यामुळे देशांना आता शांतीच्या नव्हे तर युद्धाची नवी तंत्रे व नव्या वाटा चोखाळाव्या लागतील. 

फायबर ऑप्टिक ड्रोन : युद्धाचे धोकादायक अस्त्रसैनिकांना नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांना लवकर प्रतिसाद देणे आवश्यक आहे. सध्याचा असाच नवीन धोका म्हणजे फायबर ऑप्टिक ड्रोन. ड्रोनच्या तळाशी दहा किलोमीटरच्या केबलचा स्पूल बसवला जातो आणि त्या फिजिकल फायबर ऑप्टिक कॉर्डला पायलटच्या हातातील कंट्रोलरशी जोडले जाते.व्हिडीओ आणि कंट्रोल सिग्नल रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून नाही तर केबलद्वारे ड्रोनकडे पाठवले जातात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक इंटरसेप्टर्सने त्याला जॅम करता येत नाही. या युद्धात दोन्हीकडच्या सैन्यांनी त्यांच्या वाहनांवर इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली (वॉरफेअर) बसवल्या होत्या. त्या ड्रोन निष्क्रिय करू शकत होत्या. मात्र, फायबर ऑप्टिकड्रोनच्या आगमनाने ती सुरक्षा संपुष्टात आली आहे. 

भारताची ड्रोनसुरक्षा सज्जता कुठवर? काही दिवसांपूर्वी भारतीय वायुसेनाप्रमुख एयर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी संरक्षण खरेदी प्रकल्पांना होत असणाऱ्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली. भारताच्या ड्रोन मिशनमध्ये पहिल्यापेक्षा थोडी सुधारणा झाली असली तरी जगातील उच्च तंत्रज्ञातील स्पर्धेत मात्र भारत नाही, ह्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.

टॅग्स :warयुद्धrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया