शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

आदर्श लग्नाचा गुजर पॅटर्न

By यदू जोशी | Updated: June 8, 2025 10:48 IST

Marriage: धुळे, नंदुरबार, जळगाव आणि बाजूच्या गुजरात अन् मध्य प्रदेशच्या एकेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेला गुजर समाज हा लग्नसमारंभ आदर्श कसा असला पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रामुख्याने कृषी व्यवसाय करणार्या या समाजात लग्नांमध्ये उधळपट्टीला पूर्णत: चाप लावण्यात आलेला आहे. हे एवढ्यातले नाही तर गेली चार दशके हा पॅटर्न या समाजाने स्वीकारला आहे.

- यदु जोशी (सहयाेगी संपादक) धुळे, नंदुरबार, जळगाव आणि बाजूच्या गुजरात अन् मध्य प्रदेशच्या एकेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेला गुजर समाज हा लग्नसमारंभ आदर्श कसा असला पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रामुख्याने कृषी व्यवसाय करणार्या या समाजात लग्नांमध्ये उधळपट्टीला पूर्णत: चाप लावण्यात आलेला आहे. हे एवढ्यातले नाही तर गेली चार दशके हा पॅटर्न या समाजाने स्वीकारला आहे. १९८० च्या दशकात या समाजाचे थोर नेते पी. के. अण्णा पाटील यांनी आपल्या समााजातील लग्नांमध्ये वारेमाप खर्च करण्याला आवर घालण्याचे ठरविले कारण त्यावेळी हुंड्यापायी मुलींचे बाप अक्षरश: मेटाकुटीला आलेले होते.  नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे समाजाच्या बैठकीत त्या संबंधीची आचारसंहिता पी. के. अण्णांनी ठरवून दिली. त्यानुसार आजही समाज चालतो आहे. पी. के. अण्णा हे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांचे निकटवर्ती होते, तीनवेळा आमदार राहिले आणि एसटी महामंडळाचे अध्यक्षही होते.

गुजर समाजाने आणखी एक वैशिष्ट्य जपले आहे, ते म्हणजे मुलाकडचे आणि मुलीकडचेही लग्नाच्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी त्यांच्या ऐपतीनुसार रोख देणग्या देतात. या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपली जाते. हुंड्याबाबत एक शब्दही कोणी तोंडून काढत नाही, काढू शकत नाही. जर कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्या बाबत काही बोललाच तर त्याला लगेच हटकून चूप केले जाते. हुंडा या समाजाने केव्हाच हद्दपार केला आहे. तसा प्रयत्न कोणी केलाच तर त्या कुटुंबाला बहिष्कृत करण्याची भूमिका घेतली जाते आणि नंतर त्या कुटुंबाशी सोयरिक न करण्याची भूमिका घेतली जाते.

मुलामुलींमध्ये कोणताही भेद न करता मुली या मुलांच्या बरोबरीने शिकल्याच पाहिजेत हा विचार गुजर समाजाने अमलात आणला आहे. परिणामत: आज मुली या मुलांपेक्षा अधिक शिकत्या होत आहेत. मुलींच्या शिक्षणाची मोठी चळवळ कोणताही गवगवा  न करता या समाजाने अव्याहत सुरू ठेवली आहे, प्रत्येकजण स्वत:पासून त्याची सुरुवात करतो. वैशाली हगवणे प्रकरणाने हुंड्यासाठी नवविवाहितांचा होणारा छळ या विषय ऐरणीवर आलेला असताना गुजर समाजाचा लग्नविषयक आदर्श सर्वांनीच स्वीकारण्याची गरज आहे.

डीजेचा दणदणाट, वरवधूला उचलून घेत केले जाणारे उथळपणाचे प्रदर्शन, नाचण्यागाण्यातील हिडीसपणा असे काहीही या समाजाच्या लग्नात बघायला मिळत नाही, त्यामुळे समारंभाचे पावित्र्य नेत्रसुखद असते.

बहुतेक समाजांमध्ये चारपाच तास चालणारे बुफे किंवा जेवणाच्या पंक्ती, आठ-दहा प्रकारच्या मिठाया, पाचसात भाज्या, चपात्यांचे पाचसात प्रकार, स्टार्टर्सचे वेगळे स्टॉल असा सगळा घमघमाट दिसतो. 

श्रीमंतीचे प्रदर्शन केले जाते. अमुकाच्या लग्नात होता त्यापेक्षा अधिकचा थाट माझ्याकडे असलाच पाहिजे अशी स्पर्धा लागते. बुफेंमध्ये अन्नाची नासाडी होताना आपण नेहमीच बघतो. 

गुजर समाजात किती साधे, सुटसुटीत आहे बघा, सकाळी लग्न लागले की फक्त दोनच पंक्ती बसतात. एकात लग्नाला आलेले पुरुष जेवायला बसतात, दुसरी पंगत फक्त महिलांची बसते.

दुपारी एकदीडला मंगल कार्यालय बंद केले जाते. २ वाजता तुम्ही गेलात तर तिथे लग्न होतं की नाही हेही कळणार नाही. जेवणात पदार्थांची रेलचेल वगैरे काहीच नसते. फक्त एकच मिठाई असते. 

टॅग्स :marriageलग्न