शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

‘हिप्पो रोलर’  आणि  ‘लाइफ स्ट्रॉ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 06:00 IST

पाण्याच्या शोधात असलेले आणि त्यासाठी  वणवण फिरत असलेले लाखो लोक हे चित्र जगाच्या कुठल्याही भागात नवीन नाही. पाणी हा खरं तर आपल्या आयुष्याचा जीवनावश्यक घटक. पण अशा समस्यांवरही  डिझाइन या क्षेत्राचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यातूनच तयार झाल्या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी. ‘हिप्पो रोलर’ आणि ‘लाइफ स्ट्रॉ’! जगातल्या गरीब आणि आदिवासी जनतेसाठी या गोष्टी अक्षरश: देवदूत ठरल्या. लोकांचे कष्ट तर त्यांनी कमी केलेच, पण दुषित पाण्यामुळे होणारे अनेक मृत्यूही थांबवले!

ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- हृषीकेश खेडकर‘जगातले बहुतांशी डिझायनर त्यांचे सगळे प्रयत्न जगातल्या फक्त दहा टक्के जनतेसाठी प्रॉडक्ट आणि सेवा विकसित करण्यात खर्च करतात. डिझाइन इतर 90 टक्के लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर या क्षेत्नात क्र ांती होणं गरजेचं आहे.’ डॉ. पॉल पोलॉक यांचे हे उद्गार. यात मांडलेल्या विचारावरून काही प्रश्न तुमच्या डोक्यात सहज डोकवायला लागले असतील. यात जगाची परिस्थिती, आर्थिक विषमता, डिझाइन या विषयाबद्दल असलेलं ज्ञान, त्याची जागरूकता, डिझाइनरची व्यावसायिक जबाबदारी इत्यादी अनेक पैलू या विचारांमध्ये असतील. या सगळ्यात थोडं विचारमंथन केलं तर लक्षात येईल की, डिझाइन या विषयाकडे आपण क्वचितच इतक्या जाणीवपूर्वक अंगानी पाहिलं असेल. बहुतेक वेळेला आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असलेल्या अनेक गोष्टी आपण कायम गृहीत धरल्या; पण डिझाइन हे जगाला भेडसावणार्‍या काही प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी साधन म्हणून वापरता येईल का? असे प्रयत्न आत्तापर्यंत कोणी केले आहेत का? या दिशेने जर आपण विचार केला, तर त्याचं उत्तर हो असं आहे. अन्न, आरोग्य, निवारा, स्वच्छ पाणी, ऊर्जा, शिक्षण, दळणवळण अशा एक ना अनेक क्षेत्नात आज जगभर काय परिस्थिती आहे याची वेगळी ओळख करून देणं हा या लेखाचा हेतू नाही. आपल्या सगळ्यांनाच याची माहिती आहे आणि कदाचित जाणीवही. मागच्या लेखात आपण ज्ञानार्जनाच्या क्षेत्नात भरीव मदत केलेल्या ‘ओएलपीसी’ची गोष्ट बघितली; आज पाण्याच्या प्रश्नासंदर्भात डिझाइनच्या दुनियेत काय घडलं ते बघूयात. डिझाइनची गोष्ट सांगताना मला एका गोष्टीचं कायम अप्रूप वाटतं, की गरज माणसाला कशी प्रेरणा देते आणि निर्मितीक्षम बनवते. आता हेच बघा ना, प्याटी पेटझर आणि जोहान जोंकेर हे दोघे दक्षिण आफ्रिकेत लहानाचे मोठे झालेले अभियंते. शहरापासून दूर खेड्यात वाढलेल्या या दोघांनी घरासाठी दुर्गम भागातून पिण्याचे पाणी आणताना होणारे कष्ट जवळून बघितले. कुठेतरी अपार कष्टांची ही संवेदना मनात जागृत ठेवून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर या दोघांनी काहीतरी उपाय योजायचं ठरवलं. सुरुवातीला एक चाकी हातगाडी बनवण्याचा विचार झाला. ने-आण करायला सोप्या असणार्‍या या हातगाडीला पुढे एक चाक आणि मागे दोन पाय अशी रचना करण्याचं ठरलं आणि छोटा पाण्याचा टँकर या हातगाडीवर कायमस्वरूपी जोडून दिला की काम फत्ते ! हे करत असताना लक्षात आलं की या गाडीसाठी लागणार्‍या चाकाची किंमत बरीच जास्त आहे, शिवाय दुर्गम भागात चाकाला काही झालं तर ते आणखीन मनस्ताप वाढवणारं ठरेल आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे पाणी जमिनीपासून जितकं उंच तितकं गुरुत्वाकर्षणामुळे हेंदकाळणार्‍या पाण्याचं वजन जास्त जाणवणार आणि ने-आण करणं अधिक जिकिरीचं होणार. 

या सगळ्या अडथळ्यांवर नामी उपाय म्हणून पाणी चाकात ठेवून मग त्याची ने-आण करायची अशी शक्कल लढवली गेली आणि 1991 साली ‘अँक्वा रोलर’चा जन्म झाला. पुढे जाऊन या डिझाइनची ओळख आफ्रिकन रहावी यासाठी त्याचा आकार, जाड अशी त्याची त्वचा (पृष्ठभाग) आणि पाण्याशी असलेला त्याचा संबंध या एकत्रित कारणांनी ‘अँक्वा रोलर’ हे नाव बदलून ‘हिप्पो रोलर’ असं नाव ठेवण्यात आलं; हे नाव आजदेखील सर्व प्रचलित आहे. हिप्पो रोलरया हिप्पोची क्षमता म्हणाल तर यात 90 लिटर पाणी मावतं, म्हणजे साधारण रोजच्या बादलीपेक्षा पाच पट जास्त. कमी घनता; पण जास्त कार्यक्षमता असणार्‍या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या या हिप्पोचं वजन तर कमी आहेच त्यातही जमिनीला खेटून घरंगळत लोटत नेल्यामुळे फारशी शक्ती लागत नाही. याला लोटण्यासाठी आणि खेचण्यासाठी देण्यात आलेलं धातूचे हॅण्डल अत्यंत उपयुक्त असून, ओबड-धोबड वाटांवरदेखील सहज मार्गक्रमण करता येईल याची विशेष काळजी घेतली आहे. असा हा रंगीबेरंगी आफ्रिकन हिप्पो तुम्हाला भारतात कुठल्या माळरानावर दिसला तर आश्चर्य वाटायला नको. ‘लाईफ स्ट्रॉ’पाण्याच्या शोधातली डिझाइनची दुसरी गोष्ट आहे स्वित्झर्लंड देशातल्या लॉसने शहरातील. वेस्टरगार्ड फ्रांडसें नावाचा सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा साधनांची निर्मिती करणारा एक उद्योग या शहरात आहे. 1996 साली कार्टर सेंटर नावाच्या एका बिगर सरकारी संस्थेने वेस्टरगार्ड फ्रांडसेंकडे अशुद्ध पाण्यावाटे पसरणार्‍या गयाना-वर्म नामक रोगावर नियंत्नण मिळवण्यासाठी पाण्याचे गाळण बनवण्याची मोठी कामगिरी सोपवली. या क्षेत्नात काम करण्याचा आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून वेस्टरगार्ड कंपनीने सुरुवातीला एक अत्यंत कमी किमतीत बनवता येईल असे जैविक फायबर वापरून कापडाचे गाळण तयार केले. कालांतराने या गाळण्याचे रूप बदलून त्याला एका छोट्या पाइपमध्ये बनवण्यात आले आणि खरोखर त्याच्या उपयुक्ततेप्रमाणे त्याचे नाव ‘लाईफ स्ट्रॉ’ असे ठेवण्यात आले. 22 सेंमी लांबीच्या या स्ट्रॉमध्ये अनेकविध जैविक फायबरचा उपयोग पाण्यातील भौतिक अशुद्धता काढून टाकण्यासाठी केला गेला. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार पाण्यातील 99.99 टक्के अतिसूक्ष्म भौतिक कण या स्ट्रॉमुळे काढता येतात. गढूळ पाण्याचे स्रोत असलेल्या विकसनशील देशातील अनेक भागात हा लाइफ स्ट्रॉ उपयुक्त ठरला. लाइफ स्ट्रॉच्या सुधारित आवृत्तीत अद्ययावत सुधारणा करून पाण्यातील रसायने आणि अवजड क्षार काढण्याचीदेखील हमी देण्यात आली. टायफॉइड, कॉलरा, डायरिया अशा पाण्यातून जन्माला येणार्‍या अनेक रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लाइफ स्ट्रॉ हा इक्वाडोर, हैती, रवांडा, थायलंड, पाकिस्तान अशा अनेक देशांमध्ये भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात जरूर वापरला जातो. पाण्याच्या शोधात निघालेल्या अशा लाखो लोकांसाठी डिझाइनच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले गेले आणि आजही केले जातायेत. पॉल पोलॉकला अपेक्षित असलेल्या क्र ांतीला कुठेतरी सुरुवात झाली आहे हे नक्की !

hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)