शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
5
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
6
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
7
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
9
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
10
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
11
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
12
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
13
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
14
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
15
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
16
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
17
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
18
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
19
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
20
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!

इथेच आता विठ्ठल, शंकर.

By admin | Updated: August 8, 2015 13:28 IST

अमेरिकेत लोकांचा (गैर)समज आहे. हातात जपमाळ घेऊन हरी-हरी करत बसायची वेळ आली की लोक चालले फ्लोरिडाला!. तिथे हवा चांगली, थंडी नाही, राहणी साधी-स्वस्त आणि परवडणारी. धावपळ नाही, संथ दिनक्रम. थंडीच्या दिवसात वॉशिंग्टनसारख्या ठिकाणी बर्फाचे ढिगारे उपसायला राहणार कशाला लोक तिथे?

-दिलीप वि. चित्रे
 
खूप खूप वर्षापूर्वी न्यू जर्सी राज्यात भरलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात लहान मुलांनी गायलेल्या स्वागतगीतासाठी मी लिहिले होते, ‘‘इथेच आता विठ्ठल-शंकर, इथेच हो घन:श्याम!’’ अमेरिकेत जन्मलेल्या आणि इथेच वाढणार असलेल्या या मुलांची जन्मभूमी हीच; त्याप्रमाणे कर्मभूमीही हीच असणार असा त्याचा मथितार्थ.
आम्ही निवृत्त झाल्यानंतर वॉशिंग्टनच्या थंड हवेतून जेव्हा फ्लोरिडा राज्यातल्या छान गरम हवेत स्थलांतरित व्हायचं ठरवलं तेव्हा आमच्या अनेक मित्रंनी विनोदानं मला हिणवलं की, ‘‘तुमचे तिथेच आता विठ्ठल-शंकर! बरं का!’’
पण त्यांचं तरी काय चुकलं? कारण सर्वसाधारणपणो इथे लोकांचा असा एक (गैर)समज आहे की, हातात जपमाळ घेऊन हरी-हरी करत बसायची वेळ आली की लोक चालले फ्लोरिडाला. कारण थंडी नाही, हवा सतत चांगली, जीवनमान, राहणी साधी-स्वस्त आणि परवडणारी अशी. धावपळ नाही. संथ चाललेला दिनक्रम वगैरे. मग वॉशिंग्टनसारख्या ठिकाणी थंडीच्या दिवसांत बर्फाचे ढिगारे उपसायला राहणार कशाला लोक इकडे? शिवाय म्हटलंही जातं 'FLORIDA IS A GOD'S WAITING ROOM' म्हणून! ‘लागले नेत्र रे पैलतीरी’ असं झालं की कसचं काय नि कसचं काय!
त्यातून पुन्हा आम्ही राहतो ते गाव ‘सन सिटी सेंटर’. एकंदर दहा हजार घरांमध्ये मिळून फक्त 1500 वस्ती असलेलं. ती वस्तीसुद्धा तरुणांची नाही. आमच्या या गावाची सरासरी वयोमर्यादा किती असेल अशी तुमची कल्पना? नाही सांगता येत? अहो फक्त 77 वर्षे. कारण ही आहे 55+ कम्युनिटी. 55 पेक्षा कमी वय असलेल्यांना इथे घर घेऊन स्वतंत्रपणो राहायला मज्जाव. हां, आता जर 75 वय असलेल्या व्यक्तीचा 40 वर्षाचा मुलगा असेल तर तो त्या घरात राहू शकतो, पण स्वतंत्रपणो नाही. तरुण वस्ती नाही, त्यामुळे धावपळ नाही. मोठय़ानं रेडिओ लावून भरधाव मोटारी चालवणं नाही. रस्त्यावर क्रिकेट खेळणं नाही. मुलं नाहीत म्हणून आजूबाजूला शाळा नाहीत, स्कूल बसेस नाहीत. मुलांची भांडणं-मारामा:या नाहीत. तुम्हाला आवडो न आवडो, पण सारं कसं शांत शांत. संध्याकाळी सहा वाजले की जेवणं आटोपून लोक बसलेच टीव्हीपुढे. रस्ते अगदी चिडीचूप. मला तर रात्री दहा-साडेदहा वाजल्याशिवाय घशाखाली घासच उतरत नाही. आता मीसुद्धा काय तरुण आहे काय? आणखी 25-27 वर्षात जन्मशताब्दी होईल की हो माझी! पण सवयीचा परिणाम. दुसरं काय?
पण तुमची जिद्द आणि जीवनाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन याचा वयाशी काहीच संबंध नसतो हेच खरं! आमच्या सन सिटी सेंटरमध्ये वयाशी, व्याधींशी झुंजणारे आणि कुठल्याही तक्रारी गात न जगणारे एकेक वीर मावळे पाहिले की थक्कच व्हायला होतं. वाटतं, येते कुठून एवढी ही ऊर्जा यांच्यात? तरुणांना लाजवेल असा उत्साह?
इथे राहायला आल्यावर आजूबाजूचं वातावरण पाहून मी व शोभानं एक नियम स्वत:वर लादून घेतला. तो म्हणजे, सकाळी लवकर उठायचं. उगाच बिछान्यात सूर्य उगवला तरी लोळत पडायचं नाही. पटकन चहा-ब्रेकफास्ट आटपून जवळच असलेल्या आमच्या क्लबमधल्या स्वीमिंगपूलमध्ये पोहायला एक दिवस, तर दुस:या दिवशी स्वीमिंगपूलला जोडूनच असलेल्या प्रचंड मोठय़ा जिम्नॅशियममध्ये व्यायामाला एक दिवस जायचं म्हणजे जायचंच.
बरं, स्वीमिंगपूल्स तरी किती? एक आऊटडोअर पूल, आऊटडोअर जकुझी इनडोअर पूल, इनडोअर जकूझी, वॉकिंग पूल, चार ते साडेचार फूट खोल पाणी असलेला. फक्त चालण्याचा व्यायाम करण्यासाठी असलेला, व्हील चेअरवर असलेल्यांना किंवा वॉकरचा आधार घेऊन चालणा:यांसाठी, पाण्यात उतरता यावं म्हणून एका बाजूला एक इलेक्ट्रिक प्लॅटफार्म. त्यावर बसून बटण दाबलं की व्हीलचेअर संथपणानं सरळ पाण्यात. पुन्हा बटण दाबलं की व्हीलचेअर पुन्हा वर. सोयी तरी केवढय़ा! पाण्यात सगळ्यांनी एकाच दिशेनं, म्हणजे 'Anti- Clock Wise' चालायचं. म्हणजे ट्राफिक जॅम नाही. हसत-खेळत, गप्पा मारत चाललेली जलक्रीडा. अशा स्वीमिंगपूलमध्ये मैत्री जमलेल्यांना मी ‘जल-मित्र’ म्हणतो.
एकदा तर गंमतच झाली. आम्ही पोहायला म्हणूृन गेलो; तर तिकडे जाम धमाल चाललेली. स्वीमिंगपूलच्या एका बाजूला लांब टेबलं मांडलेली. त्यावर पांढ:याशुभ्र चादरी घातलेल्या, वर फ्लॉवरप्लॉट्स, बाजूला कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या, कुकीज आणि काय काय! सगळी पार्टीची तयारी. मी आमच्या काही जलमित्रंना विचारलं, हा काय प्रकार आहे? तर त्यांनी सांगितलं, तो समोर सपासपा पोहतोय तो बॉब माहितेय नं तुला? त्याचा आज नव्वदावा वाढदिवस आहे, म्हणून ही तयारी. मी चक्रावूनच गेलो. म्हटलं, पण एवढय़ा सकाळी ही पार्टी?
‘मग काय करणार?’ ते म्हणाले, ‘खरं म्हणजे सगळ्यांनी बरोबर लंचला जाण्याचाच बेत ठरवला होता आम्ही. पण दुपारी त्याला ‘केमोथेरपीला’ जायचंय.’ हा मला आणखी एक धक्का. मग आम्हीसुद्धा सगळ्यांबरोबर लंचला जायचं ठरवलं.
इथे कोणाला स्वस्थ बसताच येणार नाही. ‘कंटाळा’ शब्दच नाही. त्याची केव्हाच हकालपट्टी झालेली. ‘या वसाहतीत कंटाळ्याला मज्जाव आहे’ (BORING DOES NOT LIVE HERE
हे ब्रीदवाक्य. 'THIS COMMONITY IS FOR THE PEOPLE YONG AT HEART'हे दुसरं.
एकंदर 200 पेक्षा जास्त वेगवेगळे क्लब्स आहेत इथे. एवढे कसले म्हणता? यादी द्यायची म्हटलं तर जागा पुरणार नाही एवढे. सुतारकामापासून वूडवर्किग लाकडाची खेळणी-मूर्ती बनवणं, कुंभाराच्या चाकापासून ते शिवणकाम, भरतकाम, पेंटिंग्ज, पत्ते, ब्रीज खेळणं, डान्सचे तर कितीतरी प्रकार. बॉल डान्स, लाइन डान्स, खालसा डान्स, झुंबा डान्स (मी त्याला झोंबाझोंबी डान्स म्हणतो) असे कितीतरी. फोटोग्राफी पाहिली की विश्वासच बसत नाही की सगळी कला इथल्या वृद्ध-तरुणांची आहे म्हणून. स्टेण्ड ग्लास (रंगीत काचांचे तुकडे शिश्याच्या रसानं जोडून केलेली चित्रं, शेल क्राफ्टिंग (शिंपले जोडून केलेल्या कलाकृती), सिरॅमिक्स, लॉपिडरी (चांदीचे, मोत्यांचे, मण्यांचे अत्यंत सुंदर दागिने बनवणं, क्विल्ट्स (कापडाचे तुकडे जोडून तयार केलेल्या डिझाइन्सच्या रजया) असं कितीतरी.
याशिवाय मैदानी खेळ आहेतच की. त्यात टेनिस, बॅडमिंग्टन! रायफल बोर्ड लॉन बोलिंग सारखे खेळही. फ्लोरिडातल्या उन्हाची पर्वा न करता इथले सगळेच रहिवासी आपापल्या आवडीच्या गोष्टीचा आनंद लुटताहेत; असं थक्क करणारं चित्र! शुक्रवार-शनिवार असला की धावले सगळे ‘गराज सेल’च्या जाहिराती बघून तिकडे. कोणा एकटय़ा दुकटय़ाचं घर बदललं किंवा वरचं बोलावणं येऊन घर रिकामं झालं की रिअल इस्टेट एजंटनं इस्टेट सेल लावलाच. यांची घरं आतून बघितली तर अचंबितच होतो आपण. अगदी व्यवस्थित, नीटनेटकी ठेवलेली. घरातल्या वस्तू, गालिचे, भिंतीवरची त्यांच्या उच्च अभिरुचीची साक्ष देणारी पेंटिंग्ज, फर्निचर सगळंच मग किमतीच्या चिठ्ठय़ा लावूृन तुमच्यापुढे उभं. वसाहतीतल्या लोकांच्या मग सकाळपासूनच घरापुढे रांगा लागलेल्या. आपल्या ट्रकमधे, व्हॅनमधे, अगदी गोल्फकार्टमधेसुद्धा भरताहेत विकत घेतलेलं सामान! मला गंमत वाटते ती फर्निचर किंवा भांडीकुंडी किंवा चायना सेट्स विकत घेणा:या लोकांची नाही, तर हातोडय़ा, स्क्रू ड्रायव्हर्स इथपासून ते मोठमोठय़ा करवती, कु:हाडी, शिडय़ा, इलेक्ट्रिकच्या सर्कयुलर सॉज आणि अन्य कितीतरी मोठमोठी हत्त्यारं, अवजारं विकत घेणा:या म्हाता:या तरुणांची. मला दोन प्रश्न पडतात. त्यातला पहिला म्हणजे ही हत्त्यारं, अवजारं या घरात राहणा:या व्यक्तीकडे मुळात होतीच कशासाठी? अन् दुसरा म्हणजे ही विकत घेणारी व्यक्ती यांचं पुढे काय करणार?
या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता नकळतपणो आपल्याच अंगात एक चैतन्याचा स्फुलिंग शिरतो आणि आपल्या जीवनाचा प्रवासही तारुण्याच्या दिशेनं व्हायला लागतो, तेव्हा मनात येतं- ‘‘इथेच आता विठ्ठल, शंकर!’’
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह,  ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगीतिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम / संस्थांचे संपादक, 
संयोजक, संघटक)
dilip_chitre@hotmail.com