शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

हँडीमेन किरकोळ काम भरपूर दाम --- अमेरिकन सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:06 IST

अमेरिकेत सटरफटर कामे करणाऱ्यांना हँडीमेन म्हणतात. ते गौरवर्णीय अमेरिकन असतात. घरातली दुरुस्ती, सुतार काम, रंगरंगोटी, प्लम्बिंग, बागकाम आदी किरकोळ कामे ते करतात. त्यांना अमेरिकेत प्रचंड मागणी असते; मात्र, ते वेळेत उपलब्ध होतील याची शाश्वती नसते.

ठळक मुद्देएकजण बंगल्यामागील कट्ट्याचे काम महिन्यापूर्वी करून गेला; पण उर्वरित पैसे घ्यायलाही आला नाही.

- किरण कर्नाड, डेटन, न्यू जर्सी

अमेरिकेत सटरफटर कामे करणाऱ्यांना हँडीमेन म्हणतात. ते गौरवर्णीय अमेरिकन असतात.घरातली दुरुस्ती, सुतार काम, रंगरंगोटी, प्लम्बिंग, बागकाम आदी किरकोळ कामे ते करतात. त्यांना अमेरिकेत प्रचंड मागणी असते; मात्र, ते वेळेत उपलब्ध होतील याची शाश्वती नसते.अमेरिकेत बहुतेक सर्व गोष्टी ताबडतोब आणि चुटकीसरशी किंवा एखादी शीळ घातल्यावर लगेच मिळतील; पण दुर्दैवाने दैनंदिन अत्यावश्यक गोष्टींना हँडीमेन मिळत नाहीत. अनेक वेळा छोट्या-छोट्या कामांसाठी भरपूर पैसे मात्र मोजावे लागतात. इथे कारागीर, फिटर, लोहार, सुतार, इलेक्ट्रेशियन, बागकामवाला, एअरकंडिशनवाला, प्लंबर, स्वयंपाकघरातील किरकोळ काम करणारा हरकाम्या आणि मुख्य म्हणजे घरकाम करणारी मोलकरीण यांच्या सेवा अतिशय महाग असतात.

या अत्यावश्यक कारागिरांना इथे अमेरिकेत हँडीमन वा हँडीवूमन म्हणतात. हँडीमॅन म्हणजे स्वत:मधील कौशल्य दाखवून दैनंदिन काम करणारा पुरुष वा स्त्री कामगार.! थोडक्यात काय... सटरफटर स्वयंरोजगार काम करणारा माणूस.! इथे सटरफटर कामासाठी माणूस मिळणे अत्यंत दुरापास्त, पण अवघड असते. एखाद्याचे नशीब असल्यासच असे अनेक हँडीमेन आॅनलाईन मिळूनही जातात; पण तत्काळ कामावर येतील असे नाही, इतके ते व्यावसायिक असतात. स्वत:बरोबर छोटी-मोठी यंत्रणा, ड्रिलिंग मशिन्स, अत्याधुनिक शस्रे आणि आयुधे घेऊन येतात अन् झटपट काम संपवितात. हँडीमेनना अमेरिकेत भरपूर मागणी असते. त्यांना कोणत्या इंजिनिअरिग्ांच्या पदवीची गरज नसते. अनुभव पुरेसा आहे. अनुभवाचे प्रमाणपत्र मात्र हवे.

हे सर्व हँडीमेन सतत कामात असतात. ते सोबत स्वत:ची भली मोठी कार घेऊन येतात. अनेकवेळा मोठे काम असल्यास ते एकापेक्षा अधिक वाहने घेऊन येतात. त्यात अत्याधुनिक व अद्ययावत यंत्रसामग्री असते. थर्माकोलचा मोठा आईसबॉक्सही असतो. यात शीतपेयाच्या बाटल्याही असतात. काम करताना या पेयांचे सेवन तो करीत असतो. गाडीत अद्ययावत यंत्रसामग्री असल्याने मनुष्यबळही जास्त लागत नाही.

दोन किंवा तीन हँडीमेन पुरेसे असतात. सध्या समरमुळे प्रत्येकाच्या बंगल्यासमोरील अंगणात फरशी बसविण्याचे काम जोरात चालू असल्याने इथे आम्ही राहात असलेल्या ‘यारो सर्कल'मध्ये अनेक ठिकाणी हँडीमनच्या गाड्या दिसतात. खरे सांगायचे म्हणजे अमेरिकेत भिकारी सोडल्यास इतर सर्व स्वत:च्या कारनेच प्रवास करतात.

कामाला आलेल्या हँडीमेनने घातलेल्या पँट वा शर्टला अनेक मोठ्या आकाराचे खिसे असतात. खिशाला वा कमरेला बाहेर पक्कड, चिमटे, करवती लटकवलेल्या असतात. पुरुषांपेक्षा महिला हँडीवुमेन तशा अधिक. शारीरिक काम नसल्याने अधिक टापटीप व आकर्षक असतात. हे हँडीमेन वा वुमेन गौरवर्णीय असल्याने आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि पेहरावाबरोबरच गॉगल लावून आल्याने ‘कोणी साहेब आहे की हँडीमेन’ हे कळत नाही.

हँडीमेनच्या स्वभावाबद्दल लिहायचे झाल्यास ते अत्यंत सौम्य स्वभाव, विनयशील व मुख्य म्हणजे कामाला प्रामाणिक असतात. एखाद्याला फसविणे त्यांच्या तत्त्वातच बसत नाही. परवा आमच्याकडे आलेला हँडीमेन साथीदारासह खाली तळघरात गेला. यावेळी तो एकटाच काम करीत होता. आम्ही दोघेच (समीर, अनुजा आॅफिसला आणि केवा शाळेत गेल्याने) घरात होतो. माझे या हँडीमेनकडे बारीक लक्ष होते; पण इतरत्र व आजूबाजूला पसरलेल्या मौल्यवान वस्तूंना त्याने दृष्टीक्षेप राहूदे, हातही लावला नाही. यातील एकजण बंगल्यामागील कट्ट्याचे काम महिन्यापूर्वी करून गेला; पण उर्वरित पैसे घ्यायलाही आला नाही.

अनेक हँडीमेननी एकत्र येऊन स्वत:ची कंपनीही काढली आहे. सध्या त्यांचा कामाचा तासाचा दर कमीत कमी साठ ते पासष्ट डॉलर्स इतका आहे. दोन ते तीन घरांमध्ये काम केल्याने त्याला भारतीय चलनात सरासरी केवळ दिवसाकाठी १३ ते १४ हजार रुपये मिळतात.

टॅग्स :Americaअमेरिकाjobनोकरी