ग्लोबल योगा‘योग’

By admin | Published: June 21, 2015 01:18 PM2015-06-21T13:18:15+5:302015-06-21T13:18:15+5:30

भौतिक सुखाच्या चढाओढीतला ग्लोबल योगा‘योग’...योगमार्गावर मोदींपेक्षाही वेगाने पळणा-या ‘ग्लोबल योगा सुपर पॉवर्स’

Global Yoga 'Yoga' | ग्लोबल योगा‘योग’

ग्लोबल योगा‘योग’

Next

राहुल रनाळकर

भौतिक सुखाच्या चढाओढीतला ग्लोबल योगा‘योग’...योगमार्गावर मोदींपेक्षाही वेगाने पळणा-या ‘ग्लोबल योगा सुपर पॉवर्स’

------------------
निरोगी शरीर आणि निरोगी मन राखण्यासाठीचा सवरेत्तम पर्याय म्हणजे योगमार्ग. सध्या योग विषयाचा जगभर प्रचंड बोलबाला आहे, याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे बदलत्या जीवनशैलीत अंतर्भूत असलेला (असह्य) ताण! आणि त्यापासून मुक्तीसाठी चाललेली प्रत्येकाची धडपड! योगाचा जागतिक पातळीवर स्वीकार होण्याचे प्रमुख कारण (मोदींच्या हिंदुत्वाच्या अजेंडय़ाचे) राजकीय नाही. ते आहे व्यक्तिगत गरजेतून आलेले!
196क् नंतर गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षामध्ये जगाला भौतिक ध्यासाने ग्रासले आणि आर्थिक संपन्नतेबरोबर मानसिक ताणतणावांचा भार वाढत गेला. त्याच काळात जगभरात पर्यायी जीवनशैलीचा शोध चालू व्हावा, हा काही योगायोग नव्हे. माणसांना आपणच ओढवून घेतलेल्या ताणातून मुक्तीची आस या काळाने लावली आणि पर्याय वापरात येऊ लागले. योगसाधना ही त्या पर्यायांच्या अग्रस्थानी असल्याचे दिसते. महर्षी महेश योगी, स्वामी विवेकानंद, तिरुमलाई कृष्णमाचार्य, आचार्य रजनीश, बीकेएस अय्यंगार यांनी अनेक वर्षापूर्वी योग सातासमुद्रापार पोहोचवला. तो मोठय़ा प्रमाणात स्वीकारलाही गेला. 
- आज जगभरात सर्वत्र योगाभ्यास पोचला असला, तरी  ‘योगा सुपर पॉवर’ म्हणून दोन देशांचा प्रामुख्याने उल्लेख होतो.
पहिली अर्थातच अमेरिका आणि गेल्या दहा वर्षात सुरुवात करून अमेरिकेला (आणि कदाचित भारतालाही) मागे टाकेल अशा वेगाने उदयाला येत असलेली नवी शक्ती : चीन!
 
अमेरिका
एकोणीसाव्या शतकात अमेरिकेत योगविद्येचे मूळ रोवण्याचे श्रेय स्वामी विवेकानंदांचे. 189क् मध्ये त्यांनी युरोप आणि अमेरिकेचा दौरा केला. त्यावेळच्या त्यांच्या प्रवचनांनी या दोन्ही खंडात भारतीय तत्त्वज्ञानाबरोबरच योगाभ्यासाबद्दलही उत्सुकता निर्माण केली.
  
विसाव्या शतकाचा मध्य हा अमेरिकेतील आधुनिक योगाभ्यासाचा प्रारंभ मानला जातो. स्वामी योगेंद्र आणि स्वामी कुवलयानंद हे या नव्या लाटेचे मुख्य प्रवर्तक. त्या काळात पश्चिमेकडले अभ्यासक स्वामी कुवलयानंदांच्या कैवल्यधामात प्रत्यक्ष साधनेसाठी येऊ लागले.
  
अमेरिकेत योग रुजत गेला तो एक व्यायामप्रकार म्हणून! 192क् च्या दशकात मात्र बाहेरून येणा:या स्थलांतरितांबद्दल अमेरिकेत वाढीला लागलेल्या रोषाची झळ योगप्रसाराला बसली. 
  
194क्च्या दशकात हॉलिवूडमधल्या कलाकारांमध्ये फिटनेससाठी योगाभ्यासाची क्रेझ आली आणि अमेरिकेत प्रथमच योगाच्या वाटय़ाला  ‘सेलिब्रिटी एंडोर्समेण्ट’चे भाग्य आले. यामुळे योगाभ्यासाचा सामाजिक स्वीकार फार झपाटय़ाने वाढला. 
  
ज्याला अमेरिकेत ‘सेकण्ड योगा बूम’ म्हणतात त्याचे प्रणोते ठरले डीन ऑर्निश. स्वामी सच्चिदानंदांचे शिष्यत्व स्वीकारलेल्या ऑर्निश यांनी योगाभ्यासाभोवती असलेली धार्मिक/सांस्कृतिक प्रभावळ दूर करून योगासनांना शारीरिक (विशेषत: हृदयाच्या) स्वास्थ्याशी थेट जोडले.
  
भारतीय मूळ असलेले योगगुरू बिक्रम चौधरी यांच्यावर अमेरिकेत सहा महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. अजूनही अधूनमधून हा वाद अमेरिकेत उफाळून येत असतो. बिक्रम चौधरी यांनी अमेरिकेत बिक्रम योगा पसरवला. त्यांचे अनेक योग स्टुडिओ अमेरिकेत आहेत. सेलिब्रिटी योगगुरू म्हणूनही त्यांची ख्याती आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर ते म्हणाले होते, ‘‘माङयावर महिला प्रेम करतात, लैंगिक सुखासाठी मला त्यांच्यावर हल्ला करण्याची वा जबरदस्ती करण्याची गरजच नाही.’’ 69 वर्षीय बिक्रम चौधरी हे जगभरातील 22क् देशांतील 72क् योग स्कूलशी जोडले गेलेले आहेत. 
  
कॅलिफोर्नियातील शाळांमध्ये अष्टांग योग शिकवण्यात येऊ नये, अशी मागणी करत काही पालक कोर्टात पोहोचले. योग विषय शाळांमध्ये शिकवणो हे असंवैधानिक असल्याचे या पालकांचे म्हणणो होते. पण कॅलिफोर्निया कोर्टाने ही याचिका निकाली काढत योग विषय धार्मिक नसून तो शरीर आणि मनाला जोडणा:या प्रक्रियेचा अभ्यास असल्याचे नमूद केले. 
  
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत व्हिक्टर कॅरियॉन हे लहान मुलांमध्ये उद्भवणा:या मानसिक आजारांवर आणि खास करून तणावांवर गेल्या 15 वर्षापासून संशोधन करीत आहेत. योगविषयक संशोधनानंतर काही विद्याथ्र्यावर योगथेरपी केल्यानंतर ते अधिक समंजस आणि प्रतिसाद देणारे बनल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
  
2012 साली झालेल्या एका पाहणीनुसार अमेरिकेत अठरा वर्षावरील दोन कोटींपेक्षा जास्त नागरिक नियमित योगाभ्यास करतात, असे जाहीर झाले. यापैकी 45 टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न 75 हजार डॉलरहून अधिक आहे. योगा जनरेशन नावाची संकल्पनाही अमेरिकेत रुळू पाहत आहे. या पाहणी अहवालानंतर वाढत्या ‘योगा मार्केट’वर व्यावसायिक कंपन्यांचे लक्ष केंद्रित झाले.
  
योगासनांसाठी लागणारे कपडे, चटया, संगीताच्या सीडीज आदि साहित्याची बाजारपेठ अमेरिकेत प्रतिदिन वाढत असून, सध्या ही उलाढाल सुमारे 1क्.7  बिलियन डॉलर्सच्या घरात पोचली आहे.
 
चीन
चीनमध्ये ताई-चीसारख्या त्यांच्या पारंपरिक पद्धती योगाभ्यासाच्या जवळच्या असल्यातरी भारतीय योगशास्त्रचे मूळ रोवले गेले ते एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी. 
  
रॉबीन वेक्स्लर आणि मिमी क्युओ या अमेरिकेतून परतलेल्या दोन स्त्रियांनी बीजिंगच्या गर्दीतल्या एका गल्लीत 2क्क्4 साली ‘योगा यार्ड’ या नावाने पहिला अभ्यासवर्ग सुरू केला.
  
हळूहळू बीजिंग, शांघाय यांसारख्या महानगरांमध्ये छोटय़ाछोटय़ा प्रशिक्षण वर्गाची गजबजच सुरू झाली. पण हे सगळे प्रशिक्षक भारतातून आयात केलेल्या डीव्हीडीज् पाहून शिकलेले अर्धकच्चे गुरू होते.
  
मन:शांतीतून यश मिळवा, क्षमता ध्येयाकडे केंद्रित करा अशी आमिषे दाखवून सुरू झालेला हा ट्रेण्ड चीनच्या छुप्या ‘अमेरिकनायङोशन’चा आविष्कार होता. चीनने योगाभ्यासाकडे पाहिले ते अमेरिकेच्या चष्यातून! त्यामुळे आजही चीनमध्ये योगाभ्यासाच्या प्रचारार्थ ‘सुंदर दिसा, जे खाल ते पचवा, सुखाने शांत झोपा, ताणमुक्त व्हा’ अशी ‘योगा-बायप्रॉडक्ट’च अधिक करून विकली जातात.
  
देशाबाहेरून येणा:या नव्या कल्पनेकडे संशयाने पाहणा:या चिनी ‘व्यवस्थे’ने वाढत्या योग-संस्कृतीवरही आपली करडी नजर रोखली. चालू असलेल्या योग वर्गात अचानक येऊन उभ्या राहणा:या  सरकारी ‘निरीक्षकां’बद्दलचे अनुभव चीनमध्ये सर्वश्रुत आहेत. तरीही योगाभ्यासाचे प्रमाण वाढत गेले.
  
आधी निव्वळ श्रीमंतांचे ‘लाइफस्टाइल स्टेटमेण्ट’ असलेला योगाभ्यास आता मात्र प्रचंड तणावाखाली असलेल्या चिनी तरुणांचा आधार बनू लागला आहे. अवास्तव स्पर्धा, यशस्वी होण्याची सक्ती, उपभोगाची अतीव आसक्ती आणि न भागणारी भूक याला बळी पडलेली नवी पिढी मन:शांतीचा मार्ग म्हणून आता  ‘भारता’कडे नजर लावून असल्याचे अभ्यासक सांगतात.
  
  ‘भारतातून थेट आयात केलेला शुद्ध योगा’ अशी जाहिरात करून चीनमधल्या अनेक कंपन्यांनी आपापली दुकाने थाटली खरी; पण हिमालयातल्या योग आश्रमातून चीनमध्ये जाऊन ‘योगी योगा’ या नावाची योगा-चेन सुरू केलेल्या योगी मोहन यांच्यासारख्या प्रशिक्षकांना ‘तुम्ही योगाचे शिक्षण अमेरिकेतच घेतले आहे ना?’ असे प्रश्न विचारले गेले. चीनमधल्या योगविषयक सामाजिक धारणांवर अमेरिकेचा एवढा पगडा होता.
  
गेल्या पाच वर्षात हे चित्र बदलले असून, भारतातले अनेक योग प्रशिक्षक नियमाने चीनमध्ये जाऊ लागले आहेत. योगगुरू बी. के. अय्यंगार यांच्या चीनभेटीतली प्रवचने आणि प्रात्यक्षिकांमुळेही योग्शास्त्रच्या ‘शुद्ध भारतीय’ रूपाकडे चीनमधली नवी पिढी आकर्षिली गेली आहे.
  
सध्या चीनमध्ये ज्या वेगाने योगाभ्यासाचा प्रचार-प्रसार होतो आहे, ते पाहता हा देश अमेरिकेलाही येत्या काही वर्षात मागे टाकेल असे दिसते. चीनमधली या क्षेत्रतली वार्षिक उलाढाल आत्ताच सहा बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या घरात पोचली आहे.
  
भारताबरोबरच्या नव्याने जुळू पाहणा:या नात्यालाही या ‘योगा डिप्लोमसी’चा एक पदर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जोडला असल्याचे तज्ज्ञ मानतात. चीनच्या कनमिंग शहरात पहिले योगा कॉलेज सुरू झाले आहे. हे कॉलेज भारत आणि चीनच्या नव्या मैत्रीचा अध्याय असेल. 

 

Web Title: Global Yoga 'Yoga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.