शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भटक्यांच्या वस्तीवर  ग्लोबल शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 06:05 IST

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षक  नारायण मंगलारम यांना प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय.

ठळक मुद्देज्या वस्तीवर शिक्षणाची केवळ पहिली किंवा दुसरी पिढी शिकते आहे अशा शाळांमध्ये हे जागतिक उपक्रम राबवले जातात. त्यामुळे त्याचे मूल्य अधिकच वाढते.

- हेरंब कुलकर्णी

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. यावर्षी राष्ट्रीय शिक्षण पुरस्कारासाठी देशातील फक्त 47 शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रात सरकारी आणि खासगी शाळेतून नारायण मंगलारम यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मंगलारम हे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. पुरस्कार संख्या कमी झाल्यापासून राष्ट्रीय शिक्षण पुरस्काराचे निकष अधिक वस्तुनिष्ठ व विविधांगी झाल्यामुळे हे पुरस्कार आता अगदी वेगळा उपक्रम असणार्‍या व्यक्तीलाच जात आहेत. नारायण मंगलारम यांचे वेगळेपण हे की, भटक्या-विमुक्तांच्या शिक्षणाची देशात व महाराष्ट्रात अतिशय दुरवस्था आहे. त्यातही गोपाळ जमातीतील शिक्षणाचे प्रमाण हे खूप कमी आहे. अशा भटक्या विमुक्त जातीतील गोपाळ समूहाच्या छोट्या 250 वस्तीवरील शाळेत विद्यार्थ्यांवर त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उपक्रम राबवले आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला व इतर सामाजिक उपक्रम त्यांनी या गरीब वस्तीचे पालक व विद्यार्थी यांना सोबत घेऊन केले. काय आहेत उपक्रम?1) कला समेकीत शिक्षण (आर्ट इंटिग्रेटेड लनिर्ंग)प्रत्येक विषय शिकवताना कलेचा माध्यम म्हणून वापर करत नाट्यीकरण, बाहुलीनाट्य, मुखवट्यांचा वापर, नृत्य, नाटिका, गायन यांच्या माध्यमातून आनंददायी पद्धतीने पाठय़घटक विद्यार्थ्यांपयर्ंत पोहोचवला जातो. दिल्लीच्या एनसीइआरटी पथकाने शाळेची पाहणी केली व देशातील 11 शाळेत या शाळेची निवड केली व प्रकल्प राबवला.2) युनेस्को स्कूल क्लबजगातील निवडक शाळेत असलेल्या युनेस्को स्कूल क्लबची स्थापना करून शाळेतील विद्यार्थ्यांत शाश्वत विकास मानकांची जाणीव व्हावी यासाठी विविध आंतरराष्ट्रीय दिन जसे आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस, पर्यावरण दिन, विज्ञान दिन, जागतिक पर्यटन दिन यासारखे उपक्रम साजरे केले जातात. हे उपक्रम मंगलारम आपल्या शाळेत राबवतात.3) परदेशी शाळांशी देवाणघेवाणग्लोबल किडलिंक प्रोजेक्ट अंतर्गत शाळेने रशिया, युक्रेन आणि अमेरिका या देशांच्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर शांततेचा संदेश देणार्‍या कागदी कबुतरांची देवाणघेवाण केली आहे. रशियामधल्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर पत्रमित्र उपक्रमांतर्गत पत्रांची देवाणघेवाण केली आहे. दक्षिण कोरियातील शाळेबरोबर सांस्कृतिक देवाणघेवाण अंतर्गत सांस्कृतिक बॉक्सची देवाणघेवाण केली. त्या अंतर्गत शाळेला दक्षिण कोरिया येथून त्यांची संस्कृती दाखवणारा बॉक्स आला.4) मायक्रोसॉफ्टच्या फ्लिपग्रिड या शैक्षणिक अँप वापराच्या स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवल्याबद्दल शाळेला अमेरिकेतून व्हॉइस पॉडच्या रूपात बक्षीस मिळाले.5) स्काइप इन द क्लासरूम या प्रयोगाच्या माध्यमातून शाळेने आतापयर्ंत 25 पेक्षा अधिक देशातील 200 पेक्षा जास्त शाळा व शिक्षकांबरोबर संवाद साधला आहे. यात पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, र्शीलंका, दक्षिण कोरिया, रशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, ग्रीस, इटली, पोतुर्गाल, अर्जेंटिना, मेक्सिको, ब्राझील, केनिया, दक्षिण आफ्रिका. इत्यादि सातही खंडांतील देश आहेत. यलॉस्टोन नॅशनल पार्क , सी साइड, पोर्तो आदी व्हच्यरुअल फिल्ड ट्रिपचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला आहे.6) पाकिस्तानमधील दोन शाळांशी या विद्यार्थ्यांनी संवाद साधला. भारत आणि पाकिस्तानच्या दोन शाळांमधील विद्यार्थी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतात हे खूप आश्वासक आहे.7) नासाच्या जुलै 2020मध्ये मंगळावर जाणार्‍या रोव्हरमध्ये एका छोट्याशा चिपवर शाळेचे नाव नोंदवून पाठवले आहे. नासाच्या मंगळयानाची माहिती सर्वसामान्य जनतेपयर्ंत पोहचवण्याचा हा एक उपक्रम होता. स्पेस फोर डी या एआर अँपचा वापर करून विद्यार्थ्यांना चांद्रयान 2च्या प्रक्षेपणाचा अनुभवही देण्यात आला. 8) गँलेक्टिक एक्सप्लोरर या एआर अँपचा वापर करून शाळेत ग्रहमाला अवतरली.9) सेंट्रल सफारी या एआर अँपचा वापर करून वर्गात चित्ता, हत्ती आणि गेंडा यासारखे प्राणी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.10) शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी इव्हीएम मशीन तयार करण्यात येते आणि त्या आधारे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया घेण्यात येते.उपक्रमामधील वेगळेपण तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण, जागतिक शांतता, मैत्री या मूल्यांवर आधारित परदेशी शाळांशी संवाद साधण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विश्व नागरिक भावना वाढीला लागते, त्याचबरोबर कलेचा प्रत्येक विषयात प्रभावी वापर केल्याने विद्यार्थ्यांची त्या त्या विषयातली गोडी जास्त वाढते, कलात्मक दृष्टिकोन विकसित होतो. तंत्रज्ञानाचा वापर वर्गात मनोरंजक पद्धतीने केला आहे. विशेष म्हणजे ज्या वस्तीवर शिक्षणाची केवळ पहिली किंवा दुसरी पिढी शिकते आहे अशा शाळांमध्ये हे जागतिक उपक्रम राबवले जातात. त्यामुळे त्याचे मूल्य अधिकच वाढते.

संधी आणि स्वप्नग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभेची कमतरता नाही, कमतरता असेल तर ती उपलब्ध साधनांची, त्यांना मिळणार्‍या संधीची. या विद्यार्थ्यांना संधी मिळाली तर ते अकल्पनीय अशी झेप घेऊ शकतात, आपली स्वप्ने पूर्ण करू शकतात. गरीब पालकांना शिक्षणाचे महत्त्व नसते असा अपप्रचार केला जातो; परंतु या वस्तीतील मजुरी करणारे भटके-विमुक्त शाळेला खूप मदत करतात, र्शमदान करतात व मुलांच्या शिक्षणासाठी खूप लक्ष घालतात यामुळे आमचा हुरूप वाढतो.- नारायण मंगलारम(‘अँक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र’चे राज्य सहसंयोजक)

herambkulkarni1971@gmail.com(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)