शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

‘एक तीळ सात जणांत वाटून खाणारी’ गेल ऑम्वेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 06:00 IST

गेल ऑम्वेट आणि मी बरीच वर्षं एकत्र काम केलं. त्यातूनच आमची मैत्री जुळली. कृतिशील विचारांचा पाठपुरावा करणारी ती एक जिद्दी स्त्री होती.

ठळक मुद्देआपल्या लेखनातून गेलने विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाकडे कसे पाहावे, याची दृष्टी दिली. अनेकांना तिनं संशोधनाकडं, अभ्यासाकडं वळवलं. त्यामुळं एक कृतिशील विचारवंत असंच तिला म्हणता येईल.

- विद्युत भागवत

गेल ऑम्वेट विद्यार्थी असताना पुण्यात आली. तेव्हापासून आमची ओळख. तिने अतिशय मेहनतीने शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा ध्यास धरला. त्यासाठी खूप परिश्रम घेतले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, राम बापट, तसेच युवक क्रांती दलातील विद्यार्थ्यांमध्ये मिसळून तिने पीएच.डी.चे काम पूर्ण केले. गेल ही एका समूहाच्या शोधात होती. वेगवेगळ्या प्रतिकारांमध्ये तिचा सहभाग होता.

अमेरिकेत तत्कालीन काळात झालेल्या विद्यार्थ्यांच्या बंडात तिने सहभाग घेतला होता. त्यानंतर भारतात आल्यावर ती हातात गिटार घेऊन क्रांतीची गाणी म्हणत असे. डाव्या विचारांवर तिची निष्ठा होती. परंतु, खुल्या अर्थव्यवस्थेनंतर ती बाजारपेठीय विचारांशी जुळली आणि शेतकरी संघटनेबरोबर काम करू लागली. दरम्यानच्या काळात समग्र महिला आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रपणे काम करू लागलो. गेल अतिशय साध्या, मेहनती, लोकांशी नाळ जुळवून काम करणारी व्यक्ती होती. काही मतभेदांमुळे मी समग्र महिला आघाडीतून बाहेर पडले. मात्र, तिने शरद जोशी यांच्याबरोबर काम सुरू ठेवले. महिलांना जमिनीचा अधिकार मिळावा, याबाबत गेल आणि मधू किश्वर यांनी काम केले. शेतकरी संघटनेपासून मी दूर गेल्यानंतरही आमची मैत्री तशीच राहिली. गेल एक अतिशय मनमिळाऊ सुंदर व्यक्तिमत्त्व होतं. ती सतत कृतिशील विचारांचा पाठपुरावा करणारी होती.

कासेगाव येथे ती नेहमी सर्वांबरोबर मिळून मिसळून राहिली. शेतकऱ्यांचे कष्टप्रद आयुष्य तिने स्वीकारले. ती पाटणकर यांच्या घरात राहिली. मुलगी प्राची हिला जन्म दिला. भारत पाटणकर यांचे वडील बाबूजी हे त्या काळात नव्या विचाराचे प्रतिनिधित्व करत होते. भारत पाटणकर यांच्याशी विवाह हा गेलचा फार मोठा निर्णय होता. भारत हे तिच्यापेक्षा वयाने लहान होते. अल्झायमर आजार झाल्यानंतर शेवटच्या काळात त्यांनी तिची सेवा केली. पाटणकर यांनी तिच्यासाठी विविध ठिकाणी प्रवास करून खऱ्या अर्थाने हेतूपूर्वक तिला जिवंत ठेवलं. भारतीय संस्कृतीमध्ये पती किती एकनिष्ठ असू शकतो हे भारत पाटणकर यांनी दाखवून दिलं. अमेरिकेसारख्या सुस्थित देशात कदाचित तिला घरात राहावे लागले असते. मात्र, आजारी असूनही ती अनेक ठिकाणी फिरली. हळूहळू स्मृती जात असतानाही कार्यरत राहिली. पाटणकर कुटुंबाने गेलसाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. तिला एकटे पडू दिले नाही. अमेरिकेसारख्या संपन्न देशात माणसं एकाकी होतात. परंतु, पाटणकर व निकम कुटुंबीयांनी एकत्रितपणे हात घट्ट धरून काम करत भारतीय कुटुंब व्यवस्थेचे आदर्शरूप दाखवले.

गेलची साहित्य संपदा खूप मोठी आहे. भारत पाटणकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर ती ‘शलाका पाटणकर’ झाली. तिनेसुध्दा हे परिवर्तन मनापासून स्वीकारले. भारत यांनी तिला लिहितं केलं. आपल्या लेखनातून तिने विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाकडे कसे पाहावे, याची दृष्टी दिली. अनेकांना तिनं संशोधनाकडं, अभ्यासाकडं वळवलं. त्यामुळं एक कृतिशील विचारवंत असंच तिला म्हणता येईल. अमेरिकेशी जोडली गेलेली नाळ तोडून तिनं भारताचं नागरिकत्व स्वीकारलं, हे खूप महत्त्वाचं वाटतं. अमेरिकेत विद्यार्थ्यांनी केलेल्या बंडाची ती स्वत: साक्षीदार होती. त्यामुळं क्रांतिकारी विचारांचा धागा घेऊनच ती भारतात आली होती.

वेगवेगळ्या विषयांवर आमच्यात नेहमी चर्चा होत असत. या चर्चांमध्ये गेल खुल्या अर्थव्यवस्थेबाबतच्या सर्व गोष्टी स्पष्ट करू शकत नसे. त्यामुळं नवं अर्थविषयक धोरण आणि जागतिकीकरण याबाबत आमच्यात नेहमी मतभेद होत होते. ‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा,’ हे सांगणारी गरिबांची आणि कष्टकऱ्यांची भारतीय संस्कृती आहे. गेलनं सुध्दा आयुष्यभर कष्ट करून एक मोठी उंची गाठली.

(माजी विभागप्रमुख, स्त्री अभ्यास केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

(शब्दांकन : राहुल शिंदे)