शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

फायब्रॉइडस्च्या गाठी

By admin | Updated: August 20, 2014 13:13 IST

काही दुखणी, आजार, असतात छोटेसे, पण नुसतं नाव ऐकूनच पोटात भीतीचा गोळा येतो. बायका गर्भगळीत होतात..

- डॉ. गीता वडनप
 
सुनीतीनं आपल्या भिशी ग्रुपमधल्या मैत्रिणींबरोबर फोर्टीप्लस बॉडी चेकअप योजनेतून स्वत:ची तपासणी करून घेतली होती. तिचे रक्ताचे सर्व रिपोर्टस् नॉर्मल होते, पण पोटाच्या सोनोग्राफीमध्ये गर्भाशयावर एक छोटीशी फायब्रॉइडची गाठ दिसून आली होती. मूळच्या घाबरट स्वभावाच्या सुनीतीला काळजी वाटली. तिला या आजाराची खरंतर काहीच माहिती नव्हती पण गर्भाशयाला गाठ  म्हटल्यावर तिला आजारपणाच्या गांभीर्याची खात्रीच पटली.
खरंतर गर्भाशयाच्या अस्तरामध्ये निर्माण होणार्‍या या गाठी बर्‍याच वेळा निरुपयोगी, तर काही वेळेस जीवघेण्या ठरू शकतात. काहीही त्रास न पोहोचवणारी एखाददुसरी छोटीशी गाठ असेल तर नियमित काळानं त्या गाठीच्या वाढीकडे लक्ष ठेवून दुर्लक्ष करणं चालू शकतं, पण त्रास पोहोचवणार्‍या मोठय़ा फायब्रॉइडच्या गाठींच्याबाबतीत मात्र योग्य सल्ला आणि योग्य उपचारच लागतात.
 गर्भाशय हे तीन थरांचं बनलेलं असतं. सर्वात आतलं अस्तर म्हणजे अंतस्तर. हे ग्रंथीपेशींच्या पटलानं तयार झालेलं असतं. दर महिन्याला हेच अस्तर पाळीच्या रूपात शरीराबाहेर टाकलं जातं. गर्भाशयाच्या  मधलं अस्तर स्नायूपेशी आणि तंतूपेशी यांच्या मिश्रणानं बनलेलं असतं. तर गर्भाशयाच्या बाहेरच्या अस्तराला सिरमी पटल म्हणतात. गर्भाशयाच्या मधल्या अस्तरातल्या स्नायूपेशींची काही कारणामुळे जास्त वाढ झाल्यास त्याचं रूपांतर छोट्या छोट्या गाठीत होतं आणि त्यांनाच आपण तंतू स्नायू अबरुद म्हणजेच फायब्रॉइड असं म्हणतो.
 
तीन प्रकारचे फायब्रॉइडस
 
सबम्युकोसल फायब्रॉइड
या प्रकारच्या फायब्रॉइड गाठी गर्भाशयाच्या आतील पोकळीच्या दिशेनं वाढतात. या फायब्रॉइडमुळे गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, तसेच मासिक पाळीदरम्यान जास्त दिवस टिकून राहणारा अतिरक्तस्त्राव दिसून येतो.
 
सबसिरोसल फायब्रॉइड
या प्रकारच्या फायब्रॉइड गाठी गर्भाशयाच्या बाहेरील अस्तराच्या दिशेनं वाढतात. या फायब्रॉइडमुळे लघवीचा आणि बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो.
 
इन्ट्राम्युरल फायब्रॉइड
या प्रकारच्या फायब्रॉइड गाठी गर्भाशयाच्या मधल्या अस्तरामध्येच वाढतात. या फायब्रॉइडमुळे स्त्रीला मासिक पाळीतील अतिरक्तस्त्राव आणि वेदना जाणवू शकतात. या फायब्रॉइड गाठीमुळे गर्भाशयाचा आकार बदलू शकतो.
 
गाठी का होतात?
फायब्रॉइडच्या गाठी या कर्करोगाच्या गाठी निश्‍चितच नसतात किंवा या गाठींचे कर्करोगाच्या गाठीमध्ये कधीही रूपांतर होत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे.
फायब्रॉइडच्या गाठीमागे अनुवंशिकता असू शकते. आई, आजी यांना फायब्रॉइडचा त्रास झालेला असल्यास अर्थातच नात, मुलगी यांच्यातसुद्धा फायब्रॉइड्स तयार होण्याची शक्यता जास्त असते.
एका छोट्याशा स्नायू तंतू पेशीचं विभाजन होऊन अनेक पेशींनी तयार झालेल्या चिवट कडक बनलेल्या फायब्रॉइडच्या गाठी तयार होण्यामागे नक्की कारण काय असावं याचं अजूनही विशेष आकलन झालेलं नाही. स्त्री हार्मोन्सच्या प्रमाणातील बदलांवर या फायब्रॉइड गाठींची वाढ दिसून येते.
लग्न न केलेल्या, वंध्यत्वानं ग्रासलेल्या, एखादंच मूल असलेल्या स्त्रियांमध्ये फायब्रॉइड होण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं. म्हणजेच ज्या स्त्रियांमध्ये स्त्री बिजमिमोचनाची क्रिया विस्कळीत झालेली असते, इस्ट्रोजन या हार्मोनचा प्रभाव प्रोजेस्टेरॉन या हार्मोनपेक्षा जास्त असतो अशा स्त्रियांच्या गर्भाशयात  या गाठींची शक्यता जास्त असते.
विनात्रासाच्या गाठी
चार पैकी तीन स्त्रियांमध्ये गर्भाशयातील फायब्रॉइड गाठी दिसून येतात. काही प्रकारच्या फायब्रॉइडच्या गाठी विशेष त्रास पोहोचवत नसल्यानं त्या स्त्रीला आपल्याला असणार्‍या फायब्रॉइड गाठीची कल्पना नसते. या गाठी नेमक्या कोणत्या अस्तराजवळ आहेत?  किती आहेत?  आणि केवढय़ा आकाराच्या आहेत? यावर त्या स्त्रीला होणारा त्रास अवलंबून असतो. 
एखाददुसरी छोटीशी गाठ असेल तर काहीही त्रास होत नाही. पण काही वर्षांनी या गाठीच्या आकारात बर्‍यापैकी वाढ झाली किंवा अनेक गाठी वाढू लागल्यास काही लक्षणं दिसून येतात.
त्रासांच्या गाठीची लक्षणं
सर्वसामान्यपणे पाळीच्या तक्रारी जास्त आढळतात. अतिरक्तस्त्राव, पाळी लवकर येणं, अंगावरून जास्त दिवस जाणं, मासिक पाळीच्यावेळी ओटीपोटात आणि कंबरेत दुखणं.
गाठीचा आकार जसाजसा वाढत जातो, तसतसे ओटीपोटातील गर्भाशय पोटाच्या पोकळीत वाढू लागतं. या वाढीमुळे स्त्रीला पोटात जडपणा जाणवतो. 
काहीवेळेस मूत्राशय किंवा गुदद्वारावर भार पडल्यानं लघवी करताना त्रास होणं किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होणं संभवतं. तरुण स्त्रियांमध्ये मोजक्या ठिकाणी गाठी वाढल्यानं बीजवाहक नलिकांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो अथवा गाठींमुळे गर्भाशयाचं आतलं अस्तर परिपक्व न झाल्या कारणानं गर्भ रुजण्यास अडथळा येऊन वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते.
गाठींचं निदान
फायब्रॉइड गाठीची वाढ जास्त असल्यास पोटावरून तपासणी केल्यास त्या गाठी हाताला सहजपणे जाणवू शकतात. योनीमार्गातून तपासणी केल्यावर गर्भाशयाचा वाढलेला आकार, गाठींमुळे तयार झालेला खडबडीतपणा समजून येतो. अल्ट्रासोनोग्राफी ही चाचणी फायब्रॉइडचं निदान करण्यास अतिशय महत्त्वाची ठरते. एमआरआय, हिस्टेरोसाल्फिंगोग्राफीमुळे गाठीची स्थिती आणि आकार कळू शकतो.
शारीरिक त्रास न पोहोचवणार्‍या बहुतांश गर्भाशयातील फायब्रॉइडस्ना उपचाराची गरज नसते. स्त्रीला जाणवणार्‍या मासिक पाळीतील रक्तस्त्रावाकडे व्यवस्थित लक्ष ठेवल्यास आणि ठरावीक काळानं पोटाची सोनोग्राफी करण्याच्या सूचना दिल्या जातात.
गाठींवर उपचार 
बर्थकंट्रोल पिल्स (कुटुंबनियोजनासाठी वापरण्यात येणार्‍या गोळ्य़ा)मुळे मासिक पाळीतील रक्तस्त्रावाचं प्रमाण नियंत्रित करता येतं. तांबीप्रमाणे आकार असणार्‍या मिरीना या आययुडीमुळे पाळीतील रक्तसत्राव कमी करता येतो. फक्त फायब्रॉइडची गाठ मायोमेकटमी शस्त्रक्रियेनं काढून टाकली जाते.
 गाठींचं प्रमाण आणि आकार जास्त असल्यास गर्भाशयाची पिशवी हिस्टरेकरमी  शस्त्रक्रियेद्वारे काढली जाऊ शकते.