शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

फेकिंग, सोशल मीडियामुळे लोकशाहीतील लोकसहभाग वाढतो तसा असत्याचाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 07:06 IST

लोकशाहीत व्यक्त होण्याची संधी मिळते तशी खोट्यालाही. सोशल मीडियामुळे लोकशाहीतील लोकसहभाग वाढतो तसा असत्याचाही ! लोकशाहीला आवश्यक अशी लोकचर्चा होऊ शकते तसा सत्य-असत्याचा गलबलाही वाढू शकतो.

ठळक मुद्देतुम्ही सर्व जणांना काही काळ फसवू शकता. काही जणांना सर्वकाळ फसवू शकता.

- विश्राम ढोले

सोशल मीडियामुळे लोकांना

लोकशाहीत व्यक्त होण्याची संधी मिळते तशी खोट्यालाही.सोशल मीडियामुळे लोकशाहीतीललोकसहभाग वाढतोतसा असत्याचाही !लोकशाहीला आवश्यक अशीलोकचर्चा होऊ शकते तसासत्य-असत्याचा गलबलाहीवाढू शकतो.माहितीचे आदानप्रदान जसे होऊ शकते तसा खºयाखोट्या माहितीचा लोंढाही येऊन आदळू शकतो.म्हणूनच सोशल मीडियाहे लोकशाहीसाठी निरपवाद असे उत्तम साधन ठरू शकत नाही.

तुम्ही सर्व जणांना काही काळ फसवू शकता. काही जणांना सर्वकाळ फसवू शकता. पण तुम्ही सर्व जणांना सर्व काळ फसवू शकत नाही’, असे अब्राहम लिंकनचे एक विधान आहे. सत्याची चाड असणा-याला कोणालाही या विधानामुळे बरे वाटेलही. पण हे बरे वाटणे तसे मर्यादितच ठरते. कारण सर्वांना आणि सर्व काळ फसवता येत नसले तरी त्याच्या आधी कोणाकोणाला आणि कसे कसे फसवता येऊ शकते याच्या शक्यताही या विधानातून ध्वनित होतात. म्हणूनच सत्याची चाड नसणाºयांनाही या विधानात अनेक संधी दिसू शकतात. आपल्याला आवडो न् आवडो, राजकारणामध्ये, विशेषत: जनमतावर आधारित राजकारणामध्ये तर या शक्यतांना त्यांचे एक स्थान असतेच.जनमतावर प्रभाव टाकण्यासाठी खोटेनाटे पसरविणे हा काही आत्ताचा उद्योग आहे असे नाही. वर्षानुवर्षे हा उद्योग सुरू आहे. जर्मनीत नाझींचा प्रपोगंडा हे त्याचे एक ठळक उदाहरण. त्याला इतकी विषारी फळे आली की एरवी सुबुद्ध वगैरे वाटणारा अख्खा जर्मन समाज आर्यन वंशाचे श्रेष्ठत्व, सुप्रजननशास्त्र, ज्यूंचे देशद्रोहीपण वगैरे अनेक भूलथापांना बळी पडला आणि लाखो ज्युंवरील अत्याचाराचा समर्थक किंवा मूक साक्षीदार बनत गेला.भूलथापा बनविणे तसे अवघड नसते. त्या पसरविणे आणि लोकांचा त्यावर विश्वास बसण्यासाठी उपयुक्त नेपथ्य हा या फसवणूक नाट्यातील सर्वात अवघड भाग असतो. त्याकामी उपयोगी येतात ती प्रसारमाध्यमे. कमीत कमी श्रमामध्ये लाखो लोकांपर्यंत एकाचवेळी पोहचण्याची क्षमता प्रसारमाध्यमांमध्ये असते. शिवाय, त्यांना एक किमान स्वीकृतीही असते. त्यामुळे सर्व लोकांना काही काळ किंवा काही लोकांना सर्व काळ फसविण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर होण्याचे प्रकारही राजकारणामध्ये अनेकदा घडले आहेत. नाझींच्या काळात त्यासाठी वृत्तपत्रे आणि रेडिओचा मोठा वापर झाला होता. नंतर माध्यमे जशी बदलत गेली तसे या फसवणूकनाट्याचे प्रयोगही बदलत गेले. पण त्यांचा उद्देश तोच राहिला : सर्वांना काही काळ किंवा काही जणांना सर्व काळ फसविणे!सोशल मीडियाने किंवा व्यापक पातळीवर इंटरनेटने या फसवणूक नाट्याला आज एक अभूतपूर्व परिमाण मिळवून दिले आहे. खोट्याचे प्रकार, त्याची निर्मिती, त्याचा प्रसार आणि त्यावरून उलटसुलट चर्चा घडवून आणण्याची क्षमता या साºया पातळ्यांवर सोशल मीडियाने अल्पावधीत जे साध्य केले ते प्रसारमाध्यमांच्या तुलनेत फार मोठे आहे. खºया माहितीचा अपभ्रंश करणे, माहिती अतिरंजित करणे, संदर्भ तोडून माहिती सादर करणे, थोड्या खºयामध्ये भरपूर खोट्याचे बेमालून मिश्रण करणे आणि धादांत खोटी माहिती देणे असे खोट्याचे काही प्रकार सांगता येतात. सोशल मीडियामध्ये या साºयांचा सुकाळ असतो. विशेषत: इतर माध्यमांच्या तुलनेत धादांत खोटी माहिती पसरविण्याचे प्रकार जरा जास्तच असतात.- अशी खोटी माहिती एखाद्या बातमीसारखी पसरविण्याच्या या प्रक्रियेला एक नाव आहे - फेक न्यूज. गेल्या काही वर्षांमध्ये हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जातोय. ट्रम्प महाशयांनी अमेरिकी मीडियाच्या बाबत हे शब्द वापरण्याआधीही आपल्याकडे सोशल मीडियावर हा शब्द जरा वेगळ्या प्रकारे आणि संदर्भात लोकप्रिय झाला होता. २०१४च्या निवडणुकीच्या आसपास सोशल मीडियावर जे दोन शब्द अफाट लोकप्रिय झाले होते त्यातील एक होता पप्पू आणि दुसरा होता फेकू. राहुल गांधींना बालिश आणि अपरिपक्व ठरविण्यासाठी पप्पू शब्द वापरला गेला आणि त्याचे उत्तर म्हणून मोदींना थापाडे ठरविण्यासाठी फेकू शब्द आला. इंग्रजीतला फेक (ऋं‘ी) आणि बोली हिंदीतील फेंकना म्हणजे थापा मारणे या दोन्ही शब्दाचा गंमतीदार मिलाफ या शब्दात झाला आहे. तिथे फेकू शब्द जरी मोदी या व्यक्तीविषयी आला असला तरी फेकिंग किंवा फेंकना हे सोशल मीडियाचेच स्वभाववैशिष्ट्य आहे.अफवा असो किंवा फेक न्यूज, त्याचा खरा डंख असतो तो त्याच्या प्रसरण क्षमतेत. सोशल मीडिया खोट्याला किंवा फेक न्यूजला नेमकी हीच प्रसरणक्षमता अफाट प्रमाणावर प्राप्त करून देतो. सोशल मीडियाची मूळ प्रणालीच गोष्टी व्हायरल होण्याला प्रोत्साहन देण्यासाठी बनवलेली असते. तुमचे एक साधे लाइक, एक शेअर, एक व्ह्यू, एक कमेण्ट, एक फॉर्वर्ड, एक फॉलो, एक रिट्विट गोष्टी व्हायरल होण्यात मदत करीत असतात. आणि या साºया गोष्टी तर सोशल मीडियासाठी श्वास घेण्याइतक्या सामान्य. त्यामुळे चांगल्या असो वा वाईट, खºया असो वा खोट्या गोष्टी पसरत जातात. त्यात सोशल मीडियाच्या वापरात जर तुम्ही थोडे प्रो असाल म्हणजे इतरांपेक्षा कुशल आणि धंदेवाईक असाल तर पसरण्याचा वेग आणि व्याप्तीही वाढत जाते. सध्या सोशल मीडियावर आणि मीडियामागे अशा प्रो लोकांचा खूप सुळसुळाट झालाय. आजकाल सोशल मीडियावर काही व्हायरल झाले की ते लगेच वर्तमानपत्रे आणि टीव्हीसारख्या प्रसारमाध्यमांमध्येही येते. जणूकाही या माध्यमांसाठी सोशल मीडियावरील व्हायरल हे एक अपरिहार्य बीटच झाले आहे. साहजिकच व्हायरलची व्याप्ती अजूनच वाढते. या सगळ्यांच्या साह्याने हलकेसे खोटे ते धादांत खोटे या संपूर्ण खोटेपट्ट्यातील अनेक प्रकारची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होऊ पाहतेय. आणि त्यात राजकारणाशी संबंधित खोट्यांचे प्रमाण सर्वाधिक. फेक न्यूजचे प्रमाण आणि त्याच्या परिणामांचे गांभीर्य इतके वाढले आहे की, गेल्या दोन तीन वर्षांपासून या फेक न्यूज उघड करणाºया नव्या साइटस् येऊ लागल्या आहेत. शिवाय दुसºयांना फेक म्हणणा-या साइट्सचे राजकीय उद्देश काय, सत्याचे निकष काय हे प्रश्नही तसे उरतातच.सोशल मीडियाने भरलेल्या आणि भारलेल्या आजच्या काळात खोट्यांच्या लाटांवर लाटा मात्र येत राहणार हे नक्की. त्या उजवीकडून जशा येतील तशाच डावीकडूनही. त्या जशा संकुचितांकडून येतील तशाच उदारमतवाद्यांकडूनही. राजकीय भूमिका कोणती हे तसे गैरलागू आहे. जनमतावर प्रभाव टाकण्याची गरज जसजशी तातडीची, अल्पकालीन आणि अल्पावधीची होत जाईल तसतसे खोट्यासाठीची जमीन अधिक सुपीक होत जाईल. समाजमन जसजसे असुरक्षित आणि एवढ्या तेवढ्याने दुखावले जाईल तसतशी खोट्याच्या पिकासाठीची नांगरणी सोपी होत जाईल. अशा सुपीक आणि नांगरणी झालेल्या जमिनीत अंतराअंतरावर खोट्याची पेरणी करण्यासाठी सोशल मीडियासारखे उत्तम शस्त्र नाही.म्हणूनच सोशल मीडियामुळे फक्त लोकांना लोकशाहीत व्यक्त होण्याची संधी जशी मिळते तशी खोट्यालाही. जसे सोशल मीडियामुळे लोकशाहीतील लोकसहभाग वाढतो तसा असत्याचाही. जसे सोशल मीडियामुळे लोकशाहीला आवश्यक अशी लोकचर्चा होऊ शकते तसा सत्य-असत्याचा गलबलाही वाढू शकतो. माहितीचे आदानप्रदान जसे होऊ शकते तसा खºयाखोट्या माहितीचा लोंढाही येऊन आदळू शकतो. म्हणूनच सोशल मीडिया हे लोकशाहीसाठी निरपवाद असे उत्तम साधन ठरू शकत नाही. त्याचेही धोके आहेतच. ते फक्त त्याच्या मानवी वापरातच नव्हे तर त्यांच्या अंगभूत वैशिष्ट्यातही दडलेले आहेत.‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही नाही मानले बहुमता’असा तुकारामांचा अभंग आहे. पण आजच्या व्यवहारात सत्य असत्याचा सोशल मीडिया ग्वाही होत असताना बहुमत नाकारणे तेवढे सोपे राहिले नाही. लोकशाहीसाठी तर नाहीच नाही.

उत्स्फूर्त संवाद क्रांती वगैरे वाटण्याच्या टप्प्यातूनसोशल मीडिया आता बाहेर आला आहे.आता जगभरच्या तज्ज्ञांना नवी काळजी वाटते आहे:‘सोशल मीडिया राजकीय प्रक्रि येच्याकेंद्रस्थानी सरकू लागला आहे का?’

लाइकशाहीराजकीय भान संकुचित करणारी समाजमाध्यमे लोकशाहीचे नवेमारेकरी आहेत काय?

‘सत्योत्तर काळ’१. इंटरनेटवरील अनामिकता आणि सोशल मीडियावरील भ्रमनामिकता - म्हणजे खोटे नाव धारण करण्याची मुभा - खोटेपणाला हातभारच लावते.२. त्यामुळे खोट्याची निर्मिती, प्रसारण, त्यातील खोटे उघड होण्याची शक्यता आणि खोट्यावरून होणारी उलटसुलट चर्चा या सा-या पातळीवर सोशल मीडिया हा मानवी इतिहासातील एक फार मोठा टप्पा मानावा लागेल.३. ही सारी प्रक्रि या इतकी सोपी, इतकी दैनंदिन आणि इतकी वेगवान यापूर्वीच्या मानवी इतिहासात कधीही झाली नव्हती. म्हणूनच असेल कदाचित सध्याच्या या काळाचे वर्णन ‘सत्योत्तर काळ’ किंवा ‘पोस्टट्रूथ एरा’ असे केले जाऊ लागले आहे.४. जगण्याच्या अनेक क्षेत्रात विशेषत: राजकीय क्षेत्रात सत्य किंवा वस्तुनिष्ठ माहितीची प्रतिष्ठा वेगाने कमी होत जाणे ही या सत्योत्तर काळाची खरी ओळख.५. सोशल मीडियाची त्यातील भूमिका अतिशय कळीची.