शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची शिकवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 07:31 IST

- धनंजय जोशीकाही वर्षांपूर्वी एका मोठ्या कंपनीत काम करत होतो. माझ्या हाताखाली सात-आठ लोकं काम करत होते. आमचं काम चांगलं चाललं होतं, आमच्या कामामुळे कंपनीला फायदापण होत होता.आता अमेरिकेमध्ये (भारतातपण असलं पाहिजे !) तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किती फायदा मिळाला यापेक्षा तुमचे काम करणारे लोकं किती सुखी आहेत किंबहुना त्यांना त्यांचा बॉस ...

- धनंजय जोशीकाही वर्षांपूर्वी एका मोठ्या कंपनीत काम करत होतो. माझ्या हाताखाली सात-आठ लोकं काम करत होते. आमचं काम चांगलं चाललं होतं, आमच्या कामामुळे कंपनीला फायदापण होत होता.आता अमेरिकेमध्ये (भारतातपण असलं पाहिजे !) तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किती फायदा मिळाला यापेक्षा तुमचे काम करणारे लोकं किती सुखी आहेत किंबहुना त्यांना त्यांचा बॉस किती ‘आवडतो’ याबद्दल बरंच महत्त्व दिलं जातं.त्यासाठी ३६० डिग्रीत सर्व्हे करतात, म्हणजे तुमच्याभोवतीच्या सर्वांबद्दल त्यांना ऐकायचं असतं!असो! म्हणजे माझ्या हाताखाली काम करणाºया लोकांचं काय मत होतं?आणखी गंमत म्हणजे त्यांना त्यांचं मत तुमच्या ‘बॉस’ला प्रत्यक्ष समोरासमोर द्यावं लागतं!माझ्या हाताखाली एक मुलगी काम करायची. सुलभा नाव तिचं!आमची मीटिंग! मी म्हणालो, सो सुलभा, आय अ‍ॅम रेडी! व्हॉट डू यू वॉण्ट टू से?सुलभा म्हणाली, ‘धनंजय, यू आर अ ग्रेट पर्सन बट अ टेरिबल मॅनेजर !’मी थक्कच झालो.म्हणालो, व्हाय, सुलभा?ती म्हणाली, ‘तू आम्हाला कधीच आमच्या ‘चुका’ सांगत नाहीस. तू फक्त म्हणतोस की हे वेगळं करायला पाहिजे म्हणून! म्हणजे आम्ही चुकलो की नाही? आमचा त्यामध्ये दोष काय? इतर मॅनेजरनी आमचा पगार कमी केला आणि तू वाढवून दिलास!’मी तिला म्हणालो, सुलभा मला कोणात ‘चूक’ दिसतच नाही. फक्त आपण काय करावं ते दिसतं! माझे झेन गुरु मला नेहमी सांगायचे, ‘डोण्ट चेक’ म्हणजे दुसºयांच्या चुकांकडे लक्ष देऊ नको! त्यामुळे ‘चूक’ हा शब्द निसटला असं म्हणायला हरकत नाही.मला आठवतं, ‘एक कप आपल्या हातातून पडला आणि फुटला... ती एक चूक की ‘केवळ एक फुटलेला कप’?एक नवीन ध्यान साधना मनात आली!एक दिवस ठरवावा!सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याबरोबर एक कागद ठेवावा. प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये ‘हे असं का?’ आणि ‘कसं कळत नाही त्याला?’ असे विचार आले की त्याची नोंद करावी. मोजावेत! त्या प्रत्येक विचारांसाठी आपण तासभर तरी ध्यान करावं असा निश्चय करावा! आणि वेळ न घालवता चालायला लागावं! सान सा निम म्हणायचे, ‘ट्राय, ट्राय, ट्राय, ट्राय, फॉर टेन थाउसण्ड इयर्स!’ही दहा हजार वर्षे कशी जमली?त्याचं उत्तर इथेच कुठेतरी!

 joshi5647@gmail.com