शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी

By admin | Updated: November 8, 2015 19:12 IST

परवा भांडारकर रोडवरच्या पवार क्वार्टर्सचा फोटो काढला, तेव्हा त्या क्वार्टर्स शब्दावरनं फार मागे गेलो.

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
परवा भांडारकर रोडवरच्या पवार क्वार्टर्सचा फोटो काढला, तेव्हा त्या क्वार्टर्स शब्दावरनं फार मागे गेलो.
अगदी लहानपणी राहायचो सोमवार पेठेत, वाडय़ात.
सदाशिव नारायण शनवारातली वाडासंस्कृती वेगळी आणि ही सोमवारातली, पुण्याच्या पूर्व भागातली वेगळी.
तसंच चाळसंस्कृतीचं. पुण्यातल्या चाळी आणि मुंबईतल्या चाळीत मोठा फरक. पुण्यातल्या आणि मुंबईतल्या जगण्यातच फरक ना! मुंबईत वाडासंस्कृती नाहीच!
सोमवारातल्या वाडय़ातनं स्वारगेटला आलो राहायला, पोलीस कॉलनीत. तांत्रिक नाव पोलीस कॉन्स्टेबलरी क्वार्टर्स की असं काहीतरी होतं. काहीजण पोलीस क्वार्टर्स म्हणत. खरी ओळख : पोलीस लाइन!
पोलीस लाइनीची संस्कृती युनिक म्हणावी अशी!
स्वारगेटची ही पोलीस लाइन फार मोठी. तीन मजली, चार मजली, एकमजली अशा पुष्कळ इमारती.
तिथल्या दिवाळीच्या दिवसांची आठवण येते.
कॉलनीत शांतता कधीच नाही. कशी असणार! चार मजल्यांच्या एका बिल्डिंगमधे प्रत्येक मजल्यावर दोनदोन खोल्यांची अठरा; अशी एकूण बहात्तर बि:हाडं! अशा दहाबारा इमारती! जणू एक लहान गावच!
सगळे खाकी वर्दीवाले! रात्रंदिवस डय़ूटय़ांवर जाणारे-येणारे.  
बहुजनांची संख्या जास्त. हिंदू धर्मातल्या यच्चयावत जाती. काही मुस्लीम, काही ािश्चन. हिंदूंमधे ब्राrाणांची दोनतीनच घरं. घरातल्या बायाबापडय़ा अशिक्षित. 
पुरुषांचं शिक्षण पोलिसात भरती होण्याएवढं जेमतेम. सगळ्या घरात हीच परिस्थिती. आर्थिक परिस्थिती हातातोंडाची गाठ पडेल इतपत. जगण्याची घनघोर लढाई. नृत्य, नाटय़, चित्रकला, लेखन-वाचन, फिल्म गायन वगैरेंचे संस्कार? कलेला पोषक वातावरण? लांबूनही जानपहचान नाही. (शास्त्रीय संगीत वगैरे तर बातच विसरा.) आया संसाराच्या रामरगाडय़ात, बाप मंडळी डय़ूटीवर अठरा तास. मोठी भावंडं खेळ, अभ्यास आणि आईला घरकामात मदत करण्यात. कुणी, कधी आणि कसे संस्कार करावेत मुलांवर कलेचे वगैरे! मुलं चुकीचं वागत नाहीयेत ना एवढं बघितलं म्हणजे पुरतं असावं. मुद्दाम वेगळे संस्कार म्हणून करणं वगैरे कुछ नही. आईबाप नीट वागले की ते सगळं आपोआप नीट होत असणार बहुतेक.
दिवाळी. बहुसंख्य पुरुष डय़ूटीवर. सतत कोलाहल. माणसं येतायत, जातायत, बोलतायत, भांडतायत. रेडिओ, मुलं, वृद्ध, बायाबापडय़ा, पुरुष, लाऊडस्पीकर, नळ, भांडी, कोंबडय़ा, बक:या. शेजारी भांडय़ांचा कारखाना, कबुतरांची एक ढाबळ.
रात्री दीडदोन ते पहाटे चारसाडेचारपर्यंतच काय ती जरा शांतता असेल तेवढीच.
मुस्लीम आणि किरिस्ताव सोडले तर प्रत्येकाच्या घरासमोर पणत्या, आकाशकंदील आणि दारापुढे रांगोळी. प्रत्येकाच्या. एकाच वेळी शंभर आकाशदिव्यांचा उजेड. लखलखाट. आकाशकंदील काडय़ांचे, टिपिकल सोनेरी बॉर्डरचे, जिलेटिन पेपरवाले. ङिारमिळ्या, शेपटय़ा असलेले.
क्वचित एखादी चांदणी. कागदी फोल्डिंगच्या तर फारच कमी. कॉलनीची मात्र एक भलीमोठी चांदणी असायची केलेली. दोन बिल्डिंगच्या मधे दोरीला लटकवलेली.
कुणाकुणाकडे लाऊडस्पीकरवर चालू हिंदी पिक्चरमधली गाणी मोठय़ा आवाजात लावलेली. कुणाकडे उद्यापन, तर एखाद्याकडे सत्यनारायण. रेडिओ तर प्रत्येकाकडेच. बिनाका गीतमाला फेमस. आवाजाबद्दल तक्रार कुणाचीच नसायची. 
कपडय़ांची आवड प्रत्येकाची भिन्न. अर्थात दिवाळीत किंवा फार तर अजून एखाद्या सणाला फक्त नवे कपड़े! युनिफॉर्म सोडून वर्षाला दोन जोड 
मिळत. युनिफॉर्म तर अक्षरश: एक गांडीवर, एक दांडीवर. फार तर अजून एखादा जास्तीचा. (आता? फार मस्ती आली. केवढे कपडे घेतो आपण! 
बाप रे!)
पोलीस लायनीत फटाक्यांचं फार वेड. मुख्य आयटेम लक्ष्मी अॅटमबॉम्ब. बाण, लवंगीच्या माळा. चोकोनी अॅटमबॉम्ब तर पब्लिकच्या प्रचंड आवडीचा.
घरी, हातानं विणलेला दो:याच्या जाळीच्या रुमालानं झाकलेली फराळाची ताटं एकमेकांच्या घरी दिली जात. पदार्थ कॉमन असले तरी करण्याच्या पद्धतीत फरक असल्यानं नमुने खूप. चवी वेगवेगळ्या. फरक. चकल्या चिवडय़ांच्या कलरस्कीममधे फरक. ब्राrाणांच्या कलरस्कीम जरा फिकट. मराठय़ांच्या, माळ्यांच्या, कुणब्यांच्या जरा डार्क, कुणाकडून काय आलंय हे ओळखू यायचं. मुसलमानांकडचे लाडू जरा वेगळ्या स्वादाचे. इतरांपेक्षा अधिक गोड. महाजन आडनावाचं एक मुस्लीम घर चार खोल्या टाकून पलीकडेच होतं. आमच्या घरी हळदीकुंकवाला त्यातला भाभी यायच्या. हळद आणि कुंकू कपाळाला न लावता गळ्याला लावून घ्यायच्या.
ािश्चनांच्या मुस्लिमांच्या घरात प्रत्यक्ष सण नसला तरी फराळाचं सगळं व्हायचंच. लाडू, चकल्या, करंज्या, चिवडय़ाला कसला आलाय जातिधर्म.
अशी दिवाळी. पोलीस लायनीतली. सहज आठवली.
प्रत्येकाच्या घरासमोर पणत्या, 
आकाशकंदील आणि 
दारापुढे रांगोळी.
एकाच वेळी शंभर 
आकाशदिव्यांचा उजेड. 
लखलखाट. 
आकाशकंदील काडय़ांचे, 
सोनेरी बॉर्डरचे, 
जिलेटिन पेपरवाले. 
ङिारमिळ्या, शेपटय़ा असलेले.
क्वचित एखादी चांदणी. 
दिवाळीच्या दिवसांच्या 
अशा खास आठवणी..