शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सृजनशीलतेचा विकास मातृभाषेतूनच --इमरै बंग्घा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:49 IST

भारतातील संस्कृती ही जगभरासाठी मोठा कुतूहलतेचा विषय आहे. साहित्य, संगीत, सिनेमा हा तर नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. प्रत्येक देशाला राष्टÑभाषा असलीच पाहिजे, असा आग्रह आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील प्रा. इमरै बंग्घा धरतात. त्यांच्याशी झालेल्या संवादाचा सारांश...

ठळक मुद्देभारतातील शिक्षणाची भाषा ही राष्ट्रभाषेत होण्याची गरजजग बदलतंय, या लाटेवर स्वार होत करिअर घडवावे

-डॉ. प्रकाश मुंजभारतातील संस्कृती ही जगभरासाठी मोठा कुतूहलतेचा विषय आहे. साहित्य, संगीत, सिनेमा हा तर नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. प्रत्येक देशाला राष्टभाषा असलीच पाहिजे, असा आग्रह आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील प्रा. इमरै बंग्घा धरतात. त्यांच्याशी झालेल्या संवादाचा सारांश...भारतीय संस्कृती ही नेहमीच जगासाठी कुतूहलतेचा विषय आहे. तसेच येथील साहित्य, संगीत, सिनेमा यांचे जगभरात नेहमीच कौतुकच झाले आहे. आता तर भारताने ‘ग्लोबल योग’ ही नवसंकल्पना देत उत्तम आरोग्य आणि मन:शांतीसाठी ‘योग’शिवाय तरणोपाय नाही, अशी जणू जगाला शिकवणच दिली आहे. यामुळे भारत हा नेहमीच जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे, असे आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक  डॉ. इमरै बंग्घा सांगतात.

प्रा. बंग्घा यांच्या मते, प्रत्येक देशाला राष्ट्रभाषा ही असलीच पाहिजे. मातृभाषेतच खऱ्या अर्थाने व्यक्तीचा भावनिक, सामाजिक, सृजनशीलतेचा विकास होत असल्याचे सांगितले. यामुळे प्रत्येक देशातील शिक्षणाचे माध्यम हे त्या-त्या देशाची राष्ट्रभाषा असले पाहिजे. विदेशी भाषा हा एक नाममात्र विषय म्हणून शिकविला गेला पाहिजे. एक संपर्काचे साधन म्हणून विदेशी भाषेकडे पाहण्याची गरज असल्याचे त्यांचे मत आहे. भारतातील शिक्षणाची भाषा ही राष्ट्रभाषेत होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

प्रा. बंग्घा यांनी भारतातील अनेक दिग्गज नेत्यांना इंग्लिश येत नसल्याचा उल्लेख करीत अल्पशिक्षित व्यापारी अस्खलित इंग्लिश बोलून आंतरराष्ट्रीय व्यापार करीत असल्याचे नमूद केले.प्रा. बंग्घा यांनी एकूणच जगातील शिक्षणक्षेत्रातील वाटचालीबाबत चिंता व्यक्त करीत आजचे शिक्षण हे नोकºया देण्यास समर्थ नाहीच; पण त्यातून तयार होणारी पिढी ही ज्ञानप्रवण अथवा रोजगार तत्काळ मिळावा यासाठी सक्षम नसल्याचे सांगितले. आता जगातील सर्वच देशांमध्ये ज्ञानशतक, ज्ञानसमाज बनविणे हे शिक्षण व्यवस्थेसमोरील मुख्य आव्हान असल्याचे सांगितले. जग बदलतंय, या लाटेवर स्वार होत करिअर घडवावे लागेल, असे आवाहन प्रा. बंग्घा यांनी केले.

डॉ. इमरै बंग्घासहयोगी प्राध्यापक, आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी इंग्लंड, हंगेरियन, हिंदी, उर्दू भाषेचे अभ्यासक, मराठीचे उत्तम ज्ञान, कोलकाता येथून हिंदी विषयात पीएच.डी. पूर्ण केली. विशेष म्हणजे विविध संप्रदाय, मठांना भेटी देत पांडूलिपीचा अभ्यास केला. अनेक पुस्तके लिहिली. आज भारतीय साहित्याच्या महत्तीवर अधिकारवाणीने देश-विदेशात व्याख्याने देत आहेत. शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागात डॉ. पद्मा पाटील यांच्या प्रयत्नाने त्यांचे व्याख्यान झाले. यानिमित्त जगात भारताचे स्थान, साहित्य, संस्कृती आदी विषयांवर त्यांनी ठाम मते मांडली.

(लेखक ‘लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीमध्ये उपसंपादक आहेत.)