शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

डेसिग्नेटेड सिनेटर

By admin | Updated: January 14, 2017 14:09 IST

१९६० च्या दशकात अणुयुद्धाचं सावट असताना अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो या भीतीनं अमेरिकन सरकारनं संकटकालीन तरतूद केली. बॉम्बहल्ला होऊन सारंच्या सारं सरकारच नष्ट झालं, तर अशा स्थितीत देशाचं नेतृत्व करण्यासाठी एका माणसाची नेमणूक केली जाते. त्याला ‘डेसिग्नेटेड सर्वायवर’ असं म्हणतात. हा सर्वसामान्य माणूस संकटकाळी थेट अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घेतो. ... सध्या अमेरिकेत अशाच एका ‘माणसा’ची चर्चा आहे, त्याबद्दल...

- निळू दामले

अमेरिकन राज्यघटनेत प्रेसिडेंटने देशाला उद्देशून ‘स्टेट आॅफ द युनियन’ भाषणं केव्हाही आणि कितीही करावीत अशी तरतूद आहे. उपाध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य, मंत्रिमंडळ अशी सगळी माणसं या भाषणाला हजर असतात. १९६० च्या दशकात जगावर अणुयुद्धाचं सावट पसरलं होतं तेव्हा अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो या भीतीनं अमेरिकन सरकारनं एक संकटकालीन तरतूद केली. ‘स्टेट आॅफ द युनियन’ भाषण चालू असताना समजा तिथं बॉम्बहल्ला झाला तर सारंच्या सारं सरकारच नष्ट होऊ शकतं. अशा स्थितीत देशाचं नेतृत्व करण्यासाठी एका माणसाची नेमणूक करून ठेवली जाते. भाषण आटोपेपर्यंतच एका माणसाला सुरक्षित ठिकाणी ठेवलं जातं. त्याला ‘डेसिग्नेटेड सर्वायवर’ असं म्हणतात. म्हणजे वाचण्यासाठीच नियुक्त केलेला माणूस. अध्यक्षासह नेतृत्वाची अख्खी फळीच नष्ट झाल्यानंतर हा माणूस अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतो. २१ जानेवारी २०१६ रोजी बराक ओबामा ‘स्टेट आॅफ द युनियन’ भाषण करायला गेले तेव्हा त्यांनी अँथनी फॉक्सला ‘डेसिग्नेटेड सर्वायवर’ नेमलं होतं.अमेरिकेवर अणुहल्ला झाला तर कोण माणसं वाचली पाहिजेत याचाही एक हिशेब अमेरिकेनं केला आहे. अध्यक्षाबरोबरच प्लंबर हा माणूस शिल्लक राहिला पाहिजे असं ठरलं आहे. कारण हल्ल्यानंतर जी काही माणसं उरतील त्यांना प्यायचं पाणी मिळालं पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था झाली पाहिजे.खरं म्हणजे ‘डेसिग्नेटेड सर्वायवर’ आणि प्लंबर या तरतुदी भारी नाट्यमय आहेत. यावर सिनेमा करावा असं आजवर कोणाला कसं सुचलं नाही याचं नवल वाटतं. टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात विशेष प्रसिद्ध असलेल्या एबीसी या अमेरिकेतल्या बलाढ्य संस्थेला मात्र हा विषय आवडला आणि ‘डेसिग्नेटेड सर्वायवर’ या विषयावर त्यांनी त्याच शीर्षकाची मालिका तयार केली. मालिकेचा एक सीझन झाला असून, पुढे आणखी काही सीझन होतील अशी अपेक्षा आहे. पहिला सीझन तुफान प्रेक्षकप्रिय ठरला आहे, त्याची ही गोष्ट!या मालिकेच्या कथानकात टॉम कर्कमन हा एक कमी महत्त्वाच्या खात्याचा मंत्री ‘डेसिग्नेटेड सर्वायवर’ म्हणून नेमला जातो. स्टेट आॅफ दि युनियन भाषण चालू असताना कर्कमन आपल्या घरात लाह्या खात टीव्हीवर भाषण ऐकत असतो. अचानक टीव्ही बंद पडतो. काय झालंय याची चौकशी करेपर्यंत गुप्तचर येतात आणि कर्कला व्हाइट हाउसमधे घेऊन जातात. घरच्या कपड्यात, लाह्यांची पुंगळी हातात असतानाच. सगळे मेलेले असतात आणि कर्कमन हा आता अमेरिकेचा अध्यक्ष झालेला असतो.- पुढे काय (काय) होतं, हा या मालिकेचा विषय.कर्कमन अचानक अध्यक्षच झाल्यावर त्याचं सारं जीवनच बदलतं. कर्कमन गरगरतो. बाथरूममधे जाऊन ओकतो. आरशासमोर उभं राहून म्हणतो की हे काही आपल्याला जमण्यासारखं नाही. परंतु त्याचा इलाजही नसतो. जबाबदारी आलेली असते आणि काहीही करून ती त्याला पेलायचीच असते. कॉँग्रेसची इमारत उद्ध्वस्त झालेली असते. ढिगारे दूर करून माणसं, प्रेतं बाहेर काढण्याची खटपट असंख्य कर्मचारी रात्रंदिवस करत असतात. राजधानीत पुन्हा हल्ला होण्याचीही शक्यता असल्यानं त्याजागी जाणं धोक्याचं असतं. कर्कमन सुरक्षारक्षकांचा सल्ला धुडकावून उद्ध्वस्त जागी पोचतात, तिथं काम करणाऱ्यांना धीर देतात, त्यांचे आभार मानतात. व्हाइट हाउस, राष्ट्राध्यक्षाची कामाची पद्धत, सीआयए आणि एफबीआय, लष्कर, अण्वस्त्रांचं भांडार इत्यादिंबाबत त्याला ओे का ठो माहीत नसतं. लष्करप्रमुख येऊन काही तरी सांगतो, सीआयएचा माणूस काही तरी सांगतो. ते मानायचं की नाही? न मानायचं कारण काय आणि मानायचंही कारण काय?लष्करप्रमुख शेंडी लावायचा प्रयत्न करतो. कर्कमन त्याला हाकलून लावतो. हा पहिला मोठ्ठा निर्णय. तिथून कर्कमन सुटतो. एकेक अडचण येत राहते. अमेरिकेतले पुढारी, राजकीय पक्ष, राज्यांचे गव्हर्नर कर्कमनला अध्यक्ष मानायलाच तयार नसतात कारण तो निवडून आलेला नसतो, नियुक्त असतो. ते त्याला छळतात. न डगमगता कर्कमन एकेक निर्णय घेत जातो, निवडणुका घ्यायचं ठरवतो.स्टेट आॅफ द युनियन भाषणाच्या वेळी झालेला हल्ला कोणी केलाय ते गुलदस्त्यातच असतं. मालिका दहाव्या भागापर्यंत पोचते तेव्हा हळूहळू प्रेक्षकांना कळलेलं असतं की संसदेचा एक वाचलेला सदस्य मॅक्लीशच हल्ल्यात गुंतलेला आहे. मॅक्लीशनं काय काय केलेलं असतं आणि त्याचा डाव कसा हुडकून काढला जातो याची चुटपुट लावून पहिला सीझन संपलाय. कीफर सदरलँड या नटानं कर्कमनची भूमिका केलीय. तसा एक साधा माणूस एक कणखर राष्ट्रपती कसा होत जातो ते सदरलँडनं छान दाखवलंय.मालिकेत व्हाइट हाउस दिसतं. प्रेसिडेंट व्हाइट हाउसमधे कसा वावरतो, त्याचं खासगी जीवन कसं असतं, अमेरिकेतल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रेसिडेंट कसा वावरतो याची कल्पना या मालिकेत येते. व्हाइट हाउसमधे शिरताना हा कर्कमन एक साधा माणूस असतो. त्याच्यावर त्याची पत्नी, मुलं, नातेवाईक, त्याचे सहकारी इत्यादि लोकांचा प्रभाव असतो. त्याचं कार्यक्षेत्र, अनुभवक्षेत्र, कसब इत्यादि साऱ्या गोष्टी मर्यादित असतात. आणि एके दिवशी तो माणूस राष्ट्राध्यक्ष होतो. हा बदल कसा घडतो? राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आधीचा माणूस शिल्लक न राहता नवा माणूस होतो का? की मुळातलाच माणूस फक्त एका नव्या रूपात काम करतो?कर्कमन अगदी साधा माणूस असतो, त्याच्या क्षमताही मर्यादित असतात. पण कामाच्या ओझ्याखाली तो बदलतो. पूर्ण बदलतो. एक कार्यक्षम अधिकारी होतो... हा या उत्कंठावर्धक मालिकेचा प्रवास!- या मालिकेची अमेरिकेत खूप चर्चा झाली.तसं म्हटलं, तर हे कल्पित वास्तवापासून दूर खरं; पण त्याचे काही धागे वास्तवातही दिसतातच.बराक ओबामांना राजकारणाचा अनुभव नव्हता. त्यांनी वकिली, सामाजिक कार्य केलं होतं, पण राजकारण नव्हे. त्यांचा पिंड अकॅडमिक. विचारवंताचा. ते उत्तम लिहित असत. अध्यक्षपदाची निवडणुक लढायची ठरवली तेव्हा त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की निवडणुकीसाठी लागणारे पैसे तू कुठून आणणार?ओबामा म्हणाले की दोन पुस्तकं लिहिणार आहे. त्यातून पैसे मिळतील. पत्नी हसली. पुस्तकातून कितीसे पैसे मिळणार? आणि तेही तितके मिळणार याची खात्री काय? ओबामा म्हणजे कोणी नोबेलवाले लेखक नव्हते. फार तर पाच दहा लाख डॉलर मिळाले असते. अपुरेच!ओबामांनी दोन उत्तम पुस्तकं खरोखरच लिहिली. त्यातून त्यांना बरे पैसेही मिळाले. पण शेवटी त्यांना निवडणूक निधीसाठी लोकांकडं जावंच लागलं. पुस्तकं आणि विचार हीच काय ती ओबामांची ताकद होती. एवढ्या तुटपुंज्या ताकदीवर आणि जेमतेम एक टर्मच्या सेनेटच्या अनुभवावर ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले होते. बघता बघता एका अकॅडमिक-विचारवंताचा एक प्रभावी राष्ट्राध्यक्ष झाला. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळाचं मोजमाप स्वतंत्रपणानं करावं लागेल. कोणी म्हणेल ते अयशस्वी ठरले. पण राष्ट्राध्यक्ष या नात्यानं त्यांनी काही कार्यक्र म विचारपूर्वक मांडले, सरकार व्यवस्थित सांभाळलं, कठीण परिस्थितीतून अमेरिकेचं तारू बाहेर काढलं.. या गोष्टी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची लायकी सिद्ध करतात. ओबामांचं हे रूपांतर कशामुळं घडलं? अनुभवी, सज्जन, अभ्यासू माणसं त्यांनी मदतीला घेतली म्हणून! संकुचित राजकारण, व्यक्तिगत स्वार्थ या गोष्टींना त्यांच्याकडं थारा नसल्यानं त्यांचे सहकारीही वळणावर राहिले.ओबामांच्या आधी जॉर्ज बुश २००२ ते २००८ राष्ट्राध्यक्ष होते. बुश एक टर्म टेक्ससचे गव्हर्नर होते. त्यापलीकडे त्यांना कोणत्याही पदाचा किवा राजकीय कार्याचा अनुभव नव्हता. केवळ त्यांचे वडील राष्ट्राध्यक्ष होते या बळावर ते राजकारणात उतरले.वडिलांनी बळेबळे मुलाला राजकारणात उतरवलं. जॉर्ज बुश यांना खरं म्हणजे कशातलंच काही कळत नव्हतं. वडिलांचे काँटॅक्ट्स, पैसे वगैरे गृहीत धरून ते शर्यतीत उतरले. जगात कुठले देश कुठे आहेत हेही बुशना माहीत नव्हतं. अर्थशास्त्राची जाण नव्हती. अगदी शे पन्नास मतांनी, लफडी करून बुश राष्ट्राध्यक्ष झाले, अल गोर हरले. स्वत:च्या क्षमतेबद्दल घोर गैरसमज असलेला माणूस राष्ट्राध्यक्ष झाला. त्यांनी चेनी, रम्सफेल्ड, कार्ड अशी महत्त्वाकांक्षी माणसं स्वत:भोवती गोळा केली. या माणसांचे पूर्वग्रह होते. यांना त्यांचे जुने सूड उगवायचे होते. ही माणसं अहंमन्य आणि गुन्हेगारी वृत्तीची होती. बुश यांना त्यांच्याच इच्छेवरून चेनी, रम्सफेल्ड इत्यादि लोकांनी इराकच्या युद्धात लोटलं. सद्दामकडं महाघातक अस्त्रं आहेत याचा कोणताही पुरावा अमेरिकेकडं नव्हता. सद्दाम अल कायदाच्या बाजूचा नव्हता. तरीही अमेरिकेनं इराकवर आक्र मण केलं. इराकमध्ये विनाकारण माणसं मारली जात होती, अमेरिकन सैनिकही विनाकारण मरत होते. सारं चुकीचं चाललंय असं इराकमधले अमेरिकन लष्करी अधिकारी वारंवार सांगत होते. बुश त्यातलं काहीही ऐकत नव्हते.जवळ जवळ ‘डेसिग्नेटेड सर्वायवर’मधल्या कर्कलँडसारखाच व्हाइट हाउसला नवखा असलेला माणूस राष्ट्राध्यक्ष झाला. पण नंतरच्या काळात त्याच्या सभोवताली असलेल्या लोकांच्या नादानं तो माणूस सुधारला तर नाहीच, पण अधिक ढ आणि गुन्हेगारासारखा झाला.डोनल्ड ट्रम्प हे राजकारणाचा किंवा सार्वजनिक जीवनाचा कोणताही अनुभव नसलेले गृहस्थ व्हाइट हाउसमध्ये पोचत आहेत. त्यांना बिझनेसचा अनुभव आहे, तोही आश्वासक नाही. त्यांनी कर भरलेला नाही. अनेक पुरवठादारांना लागू असलेले पैसेही दिलेले नाहीत. न्यू यॉर्कमधल्या सार्वजनिक संस्था आणि कोर्टांना ट्रम्पनी दमदाटी केली आहे. त्यांनी एक फ्रॉड युनिव्हर्सिटी चालवली होती.त्यांच्या घरातली माणसं एकूणात यथातथाच आहेत. त्यांच्या भोवती गोळा होणारी माणसं आर्थिक व्यवहार, कॉर्पोरेट व्यवहारातली आहेत. वाट पाहूया.(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

damlenilkanth@gmail.com