शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

डेनिम जीन्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 06:00 IST

फॅशनच्या दुनियेत कोणतीच गोष्ट  फार काळ टिकून राहत नाही. याला एक अपवाद आहे, तो म्हणजे डेनिम जीन्स. फॅशनच्या या क्षणभंगूर दुनियेत  ही जीन्स 150 वर्षांहून अधिक काळ टिकून आहे . कामगारांसाठी मजबूत, टिकाऊ आणि मळखाऊ पॅण्ट तयार करण्याच्या र्मयादित हेतूने खरेतर या पॅण्टची निर्मिती करण्यात आली, पण बंडखोरी, महिला हक्क, स्त्नी-पुरु ष समानता,  लैंगिक स्वातंत्र्याचे प्रतीक. अशा अनेक रूपांत  या जीन्सने जगावर आपला ठसा उमटवला!

ठळक मुद्देमानवी संस्कृतीचा इतिहास सामावलेले कापड!

 - स्नेहल जोशी

‘‘पुरानी जीन्स, और गिटार,मुहल्ले की वो छत, और मेरे यार’’ एखाद्या वेळेला कपाट आवरताना जुनी जीन्स सापडते आणि मन आठवणीत गुंतत जातं. ती जीन्स घालून केलेले प्रवास, ट्रेक, कॉलेजचे दिवस आणि बरंच काही. जीन्सवर पडलेले डाग, वापरल्याच्या खुणा. सगळा भूतकाळ जागा करतात. नाही का? खरंच, आपल्या वॉर्ड-रोबमध्ये जीन्स किंवा डेनिम पॅण्ट नसल्याचं कधी आठवतंय का? फॅशनच्या या क्षणभंगूर दुनियेत जीन्स मात्न 150 वर्षांहून अधिक काळ टिकून आहे आणि यापुढेही ती लोकप्रिय राहणार यात काही वादच नाही. याच जीन्सच्या इतिहासात आपण आज डोकावणार आहोत.जीन्स हा पॅण्टचा प्रकार आहे तर डेनिम हे कापड. ही दोन्ही नावं गावांच्या नावांवरून पडली आहेत. या सगळ्याची सुरु वात मात्न भारतात झाली आहे बरं का. आपल्याकडे शेकडो वर्षांपासून कापसाच्या सुतापासून जाड आणि मजबूत कापड बनवलं जात असे. हे विणताना मजबुतीसाठी तान्याखाली अतिरिक्त बाना वापरला जात असे. या कापडाला डंगरी असं नाव बहुधा इंग्रजांनी दिलं. भारतात निळीची लागवड भरपूर असल्यानी डंगरी कापड निळं असे. शिवाय निळं कापड मळखाऊ असल्याने कामगारांच्या गणवेशाला अधिकच उपयुक्त. युरोपात हे कापड पोहोचलं आणि त्यावरून प्रेरणा घेऊन फ्रान्समध्ये नीम्स या शहरात तसंच मजबूत कापड विणण्याचं कार्य सुरू झालं. निळीत रंगवलेला ताना आणि दर 2 ते 3 धाग्यांखालून जाणारा लोकरीचा अतिरिक्त बाना या पद्धतीने कापड तयार होऊ लागलं. नीम्सचं मजबूत कापड म्हणजेच ‘‘सर्ज-डे-नीम्स’’ हे डेनिम म्हणून प्रसिद्ध झालं. यात फक्त ताना रंगवलेला असल्याने एक बाजू निळी आणि दुसरी पांढरी दिसते. डेनिम आणि डंगरीचा वापर करून इटलीतील जिनोआ शहरात पॅण्ट शिवल्या जायच्या म्हणून पॅण्टचं नाव जीन्स पडलं.पण या जीन्सची निर्मिती फॅशनसाठी मुळीच झाली नव्हती. जीन्सचे जनक लेवी स्ट्राउस हे र्जमन उद्योजक. 1851 साली लेवी हे आपल्या भावाच्या वाढत्या उद्योगाला हातभार लावायला अमेरिकेत न्यू यॉर्कला आले. धंदा घाऊक मालाचा होता. याच दरम्यान अमेरिकेत ‘‘गोल्ड रश’’ म्हणजे सोनं खणनाचे वारे सुरू झाले होते. ही संधी साधून धंदा अजून वाढवण्याचा विचार करून, लेवी यांनी आपले बस्तान सॅन फ्रान्सिस्को येथे हलवले आणि सुट्या मालविक्र ेत्यांना घाऊक माल पुरवू  लागले. 1853 साली त्यांनी लेवी स्ट्राउस अँड कंपनीची रीतसर स्थापना केली. इथेच त्यांना जेकब डेव्हिस भेटले. जेकब व्यवसायाने शिंपी होते. खाण कामगारांचे कपडे अजिबात टिकत नाहीत हे पाहून, लेवींनी आयात केलेलं डेनिम वापरून मजुरांसाठी जेकब ओव्हर-ऑल तयार करू लागले. कमीत कमी जोड आणि शिवणी असल्यामुळे उसवण्याची काळजीही कमीच. कामाची साधनं, औजारं सोयीस्कररीत्या अंगावर बाळगता यावीत म्हणून पॅण्टच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला लहान-मोठे खिसे लावण्यात आले. रंग अर्थातच निळा-शक्यतो डाग लपतील असाच. तरीही खिसे कशात न कशात अडकून फाटायचे. यावर उपाय म्हणून जेकब यांनी पहिल्यांदाच खिश्याचे जोड अधिक मजबूत करण्यासाठी तांब्याची रिव्हेट वापरायला सुरु वात केली. पुढे पॅण्ट बंद करण्यासाठी असलेली बटणं काढून त्याजागी झिप वापरात आणली गेली. डेनिम हे कापड मुळात सुटे असल्याने धुतल्यावर आटतं तेव्हा कपडे शिवण्यापूर्वी ते धुवून घेऊन परत आटणार नाही अशी खात्नी करूनच पॅण्ट शिवण्यात येऊ लागल्या. त्यावर लेवी आणि जेकब यांनी 1873 साली पेटंट घेतलं. लेवीच्या जीन्सचं पेटंट असलेलं ‘‘लेवी 501’’ हे मॉडेल आजही सर्वाधिक लोकप्रिय आहे. खाण कामगार तर खूश होतेच, पण आता हळूहळू अंग मेहनत करणारा प्रत्येकजण लेवी जीन्स वापरू लागला. आत्तापर्यंत उद्देशरहित, सहज परिधान करण्याच्या दृष्टीने कधी जीन्सचा कोणी विचारही केला नव्हता. दुसर्‍या महायुद्धापर्यंत डेनिम जीन्स काम करण्यासाठी मजबूत आणि आरामदायी म्हणूनच लोकप्रिय होती; तीदेखील फक्त अमेरिकेत. महायुद्धात परदेशी नेमणूक असलेले अमेरिकन सैनिक मात्न कामावर नसताना जीन्स घालत. या पेहेरावामुळे आकर्षक अशी बंडखोरी प्रतीत होत असे. परिणामी जीन्स जगभरात पोहोचू लागली. युद्धादरम्यान, बहुतांश पुरुष सेनेत भरती असल्याने बायका कारखाने चालवू लागल्या होत्या. त्यांचे घेरदार झगे कारखान्यात काम करताना अडचणीचे होते. तेव्हा 1934 मध्ये पहिल्यांदाच बायकांसाठी जीन्स तयार करण्यात आली. महिलांच्या क्षमतेचा, बुद्धिमत्तेचा याआधी विचार झाला नव्हता. या घटनांमुळे महिलाहक्क आणि स्त्नी-पुरु ष समानता या विषयांना वाचा फुटायला लागली होती. पाहता पाहता जीन्स हे तरु णाई आणि बंडखोरीचे प्रतीक होत गेले. इतके की शाळा-विद्यापीठांनी, उच्चभ्रू हॉटेल्स आणि नाट्यगृहांनी त्यांच्या आवारात जीन्स घालण्यावर बंदी आणली. हिप्पी आंदोलनांमध्ये जीन्स हा बुद्धिजीवी आणि उदारमतवादी लोकांचा मुख्य पेहराव म्हणून ओळखला जाऊ लागला. मुलींसाठी तर जीन्स घालणं हे अजूनही  बंडखोरीचं, लैंगिक स्वातंत्र्याचं प्रतीक होतं. त्यामुळे मुलींसाठी आता जीन्सच्या नवीन फॅशनदेखील तयार होऊ लागल्या. कमरेपाशी निमूळत्या आणि पाउलापाशी भरपूर रूंद अशा बेलबॉटम जीन्स या काळात खूप लोकप्रिय झाल्या. मार्लन ब्रांडोसारखे नट, एल्विस प्रिस्लेसारखे रॉक कलाकार, यांनी आपल्या लोकप्रियतेच्या काळात जीन्स परिधान करून कला सादर केल्याने जीन्सने फॅशन जगात मोठी लाट आणली. मेरिलिन मनरो तर डेनिम आयकॉन म्हणूनसुद्धा ओळखली गेली. डेनिम आणि जीन्स आता फॅशन डिझायनरसाठी आव्हान झाली. बेलबॉटम, हिपस्टर, स्ट्रेट फिट, लो वेस्ट, हाय राइज, स्किनी जीन्स, स्टोन वॉश, मंकी वॉश, डिस्ट्रेस्ड  या निळ्या कापडाचे आजवर अनंत नवीन पेहेराव तयार झालेत आणि सगळे लोकप्रियच ठरलेत.जगाचा, मानव संस्कृतीचा केवढा मोठा इतिहास या डेनिम-जीन्सने पाहिला आहे. किती तरी आठवणी या जादुई निळ्या वस्त्नात सामावल्या आहेत. डेनिम जीन्स हे डिझाइन खरोखर कालातीत आहे. 

snehal@designnonstop.in(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)