शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डॉन डी पुन्हा चर्चेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 08:00 IST

एका छोटय़ा मोहल्ल्यातील साधा गुंड  ते माफीया डॉन आणि त्यानंतर जागतिक दहशतवादी.  दाऊदचा प्रवास अनेक गुन्हेगारी प्रसंग  आणि घटनांनी खचाखच भरलेला आहे. आजही ‘ग्यारह मुल्कों की पुलीस’ त्याच्या शोधात आहे.2009 साली ‘फोर्ब्स’च्या यादीत जगातील पहिल्या 50 सामर्थ्यवान माणसांत दाऊद 19व्या क्रमांकावर होता !याच यादीत मुकेश अंबानी 35व्या तर लक्ष्मी मित्तल 47व्या क्रमांकावर होते!!

ठळक मुद्देकुख्यात दाऊद इब्राहिम कराचीत कोरोनाने मृत्युमुखी पडल्याची बातमी काही दिवसांपूर्वी सर्वत्र व्हायरल झाली. नंतर त्याचा भाऊ अनिसने त्या बातमीचा  इन्कार केला; पण दाऊदचे कारनामे त्यानिमित्त पुन्हा चर्चेत आले आहेत.

- रवींद्र राऊळ

‘डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलीस कर रही है, लेकीन डॉन को पकडना मुश्कीलही नही, नामुमकीन है’, असा तद्दन फिल्मी डायलॉग ज्याच्या ख-या आयुष्याला लागू पडतो तो कुख्यात दाऊद इब्राहिम कासकर कराचीत कोरोनाने आजारी असल्याची बातमी गेल्या आठवडय़ात आली आणि तपास यंत्रणांपासून मीडियार्पयत सारेजण पुढचे तपशील मिळवण्यासाठी धडपडू लागले. त्याचा भाऊ अनिसने त्या बातमीचा इन्कार करत दाऊद सुखरूप असल्याचं स्पष्ट केल्यावरच ती चर्चा विरत गेली. पण दाऊदची बातमी म्हटली की, गेल्या चार दशकांपासून तपास यंत्रणांचे कान टवकारले जातातच.माफीया डॉन आणि मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेचं कारस्थान रचणारा दहशतवादी दाऊद इब्राहिम याला पकडून देणा-याला 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं इनाम जाहीर झालेलं आहे. डोंगरीत लहानाचा मोठा झालेल्या दाऊदचा मुक्काम गेली सव्वीस वर्षे कराचीत आहे. पोलीस कॉन्स्टेबल इब्राहिम कासकर यांच्या या छोक-याचा टेमकर मोहल्ल्यातील गुंड ते माफीया डॉन आणि त्यानंतरचा जागतिक दहशतवादी घोषित होण्यार्पयतचा हा प्रवास आहे. मुंबईतील डोंगरी भागातल्या अहमद सेलर शाळेत शिक्षण अर्धवट टाकणा-यादाऊद इब्राहिमच्या हालचालींकडे जगभरातील वेगवेगळ्या तपासयंत्रणांचं कायमच लक्ष असतं. अशा या मोस्ट वॉण्टेड गुन्हेगाराबद्दल तब्बल चार दशकं उलटली तरी उलटसुलट बातम्या पसरण्याचं प्रमाण कधीच घटलं नाही. कधी त्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं तर कधी त्यात तथ्य असल्याचं सिद्ध झालं. 1986 साली मुंबईतून परागंदा झालेला दाऊद इब्राहिम काही ना काही कारणाने कायम चर्चेत असतोच. कधी त्याला दुबईतून फरफटत मुंबईत आणू, असा इशारा राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी दिला. कधी त्याच्या मुंबईतील मालमत्तेचा लिलाव तर कधी त्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारची सेटलमेंट सुरू आहे, असा राज ठाकरे यांनी केलेला आरोप, कधी त्याला कोणत्या राजकारण्याने फोन केले, तर कधी वैराग्य आलेल्या दाऊदच्या मुलाने बापाशी संबंध तोडून वेगळी चूल मांडलीय.. अशा काही ना काही बातम्या प्रसारमाध्यमातून वेळोवेळी येतच असतात.कधी त्याने आपल्या चेह-यावर प्लॅस्टिक सर्जरी केल्याची बातमी होते तर कधी डमी सोबत बाळगल्याची. तीन वर्षापूर्वी तर कराचीत त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्याचं वृत्त मुंबईत पोहोचलं होतं. त्यावेळी त्याचा विश्वासू साथीदार छोटा शकील याने त्या वृत्ताचा इन्कार केला होता. कोरोनाचा संसर्ग झाल्याने दाऊद आणि त्याची पत्नी मेहजबीन यांना उपचारासाठी कराचीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं वृत्त अगदी ताजं.मुंबईच्या रस्त्यावर प्रतिस्पर्धी गुंडांसोबत हाणामा:या करीत दाऊद आपलं वर्चस्व वाढवत गेला. 1970 साली भाऊ साबीर याच्यासोबत त्याने आपली टोळी तयार केली. डोंगरीचा नूरबाग, टेमकर स्ट्रीट, जे.जे. जंक्शन हा त्याचा एरिया. पठाण टोळीतले गुंड त्याचे कट्टर दुश्मन. पठाण टोळीसोबत त्याची मांडवली करणा-या हाजी मस्तानलाही तो जुमानेसा झाला.1974 साली दाऊदविरुद्ध अंगडियाची टॅक्सी अडवून शस्नंच्या धाकाने पावणेपाच लाख रुपये लुटण्याचा पहिला गुन्हा यलोगेट पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर 1986 त्याने मुंबईतून दुबईला पलायन केलं. दोन वर्षानी प्रतिस्पर्धी टोळीतील रमा नाईक याचा पोलीस एन्काउण्टर घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर झाला. तेथूनच दाऊद आणि गवळी गँगमध्ये रक्तरंजित गँगवार सुरू झालं.1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचून दुबईतील दाऊदने त्याची अंमलबजावणी केल्याचं उघडकीस आल्यानंतर लागलीच त्याने पाकिस्तानात आश्रय घेतला. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दाऊद कराचीत पोहोचल्याची खातरजमा होताच त्याला आपल्या ताब्यात देण्याबाबत केंद्र सरकारमार्फत पाक सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. पण पाकने कायमच तो आपल्याकडे नसल्याचा घोशा लावला. दाऊद पाकिस्तानात असल्याचा इन्कार करताना पाकने आपलं भांडं फुटू नये यासाठी त्याला काही काळ कराचीतून हलवून पाक आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळील वङिारिस्तान येथे ठेवलं होतं. याच काळात त्याचा दहशतवाद्यांशी संबंध वाढला असावा आणि त्यांच्याशी त्याने हातमिळवणी केली असावी, असा तपास यंत्रणांचा कयास आहे. सॅटेलाइल फोनवरून दाऊदने केलेल्या संभाषणांचं रेकॉर्डिगही तपासयंत्रणांनी मिळवलं. भारताने त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे 2003 साली भारत आणि अमेरिका सरकारकडून त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं. संपत्तीचा हव्यास असलेल्या दाऊदने पाकिस्तानातही मोठय़ा प्रमाणावर मालमत्ता खरेदी आणि ब-याच प्रमाणावर विविध उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक केल्याचं तपास यंत्रणांना आढळलं आहे. कराचीतील क्लिफ्टन भागात राहाणा:या दाऊदने मुलगा मोईन याच्या नावाने मोईन पॅलेस ही इमारत बांधली आहे. खवयाबाने शमशीर एरिया आणि कराचीतील हायवेवर शाह राहे फैजल येथे त्याच्या इमारती आहेत. याव्यतिरिक्त लाहोरमधील मदिना मार्केट आणि पेशावर जवळील ओर्काझाई येथेही घरे आहेत. पाकमधल्या सेहगल ग्रुपमध्येही त्याची मोठी गुंतवणूक आहे. शिवाय भाताच्या गिरण्याही त्याने सुरू केल्या आहेत.गंमत म्हणजे दाऊदवरून भारत - पाकमध्ये दावा आणि इन्काराचं नाटक होत असलं तरी दाऊदचं रूटीन लाइफ मात्र बिनधास्तपणे  सुरू राहिलं. अगदी त्याच्या कुटुंबीयांच्या निकाह समारंभाची आमंत्रणं डोंगरीसह मुंबईतल्या परिचितांना येत राहिली. त्याचे तपशील प्रसारमाध्यमांना मिळू लागले. गुप्तचर यंत्रणांकडून त्याची खातरजमा करण्याचं काम होत राहिलं.आपल्या सा-या कारवाया सुरू ठेवत दाऊदची वाटचाल कायम वेगाने होत राहिली. 2009 साली फोर्ब्स मासिकाकडून जाहीर झालेल्या जगातील पहिल्या 50 सामर्थवान माणसांच्या यादीत दाऊद इब्राहिम 19व्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी त्या यादीत 35व्या तर उद्योगपती लक्ष्मी मित्तल हे 47व्या क्रमांकावर होते.दाऊदची दुबईत पाच हजार कोटींची मालमत्ता होती. भारत सरकारच्या विनंतीवरून 2015 साली तेथील सरकारने सारा तपशील गोळा करायला सुरुवात केली तेव्हा दाऊदने तेथील बहुतांशी मालमत्ता मुलगी मेहरूख आणि जावई जुनैदच्या नावे केल्याचं उघडकीस आलं. भारत सरकारने संयुक्त राष्ट्र आणि इंटरपोलसह वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांना जी फाईल सादर केली आहे त्यात दाऊद टोळीच्या कारवायांची जंत्रीच दिली आहे. कराची विमानतळ ते अफगाणिस्तान या भागात डी कंपनीने मोठय़ा प्रमाणावर ट्रकद्वारे चालणारा वाहतूक व्यवसाय सुरू केला आहे.या व्यवसायातील ट्रकचालक, डॉनला हेरॉईनची तस्करी करण्यात मदत करत असतात. अफगाण - पाक सीमेवर हे नेटवर्क ब-यापैकी सक्रिय झालं आहे. दाऊद आणि त्याचा भाऊ अनिस हे पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीत हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसायात स्थिरावले आहेत. पाकिस्तानमधील हैदराबाद येथील कोत्री भागातील पेपर मिलशिवाय सिंध प्रांतातही ते मॉल चालवतात.दाऊदबद्दल पसरलेल्या अनेक कहाण्या कितपत ख-या आहेत हे उघडकीस येणं कठीण आहे. पण तपास यंत्रणा माग काढत असताना दाऊद आता केवळ माफीया डॉन राहिलेला नसून तो दहशतवादी झाल्याचं आढळतं.गेली 34 वर्षे दाऊद मुंबईत नसला तरी त्याच्या नावाची दहशत कायम राहिली. कधी त्या दहशतीचा फायदा घेत त्याची बहीण हसीना आपा अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय झाली तर कधी भारतात परतलेला भाऊ इक्बाल कासकरविरुद्धही खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.दाऊदला आणण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल प्रयत्नशील आहेत. पण दाऊदशी संबंध ठेवणारे येथील राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, बॉलिवूडमधील मंडळींना त्याचं इथे येणं कितपत रुचेल हा प्रश्न आहे. कारण ज्यादिवशी दाऊद तोंड उघडेल तेव्हा एकामागोमाग एक भूकंप होत राहतील हे मात्र नक्की. -------------------------------------------------------------------

दाऊद कुटुंबीयांच्या‘निकाहांवर’ करडी नजर!जुलै 2005 मध्ये दाऊदची ज्येष्ठ कन्या मेहरूख हिचा निकाह पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याचा मुलगा जुनेद याच्याशी दुबईत लावण्यात आला. त्या समारंभाचे सविस्तर तपशील आणि फोटोही मुंबईतल्या मोहल्ल्यांमध्ये पोहोचले. खुद्द भाई त्या लग्नाला हजर नव्हता, असंही सांगण्यात आलं.2011 साली दाऊदचा मुलगा मोईन याचा लंडन येथील व्यावसायिकाची मुलगी सानियासोबत निकाह लागला. हा समारंभ दाऊदच्या कराचीतील घरीच त्याच्या उपस्थितीत पार पडला.दाऊदच्या मुंबईत असलेल्या नातेवाइकांचेही निकाह कायम चर्चेत राहिले ते दाऊदमुळेच. त्याची बहीण हसिना आपाचा मुलगा अलिशाह याचा निकाह समारंभ तेली मोहल्ल्यात झाला, तर मुलगी हुमेरा हिच्या निकाहाची जंगी पार्टी वरळीच्या हॉटेलमध्ये देण्यात आली होती. त्यावेळीही त्या समारंभांना कोणकोण हजेरी लावतं यावर पोलिसांची करडी नजर होती.------------------------------------------------------------------

दाऊद असा झालाजागतिक दहशतवादी!

अमेरिकेने अधिकृतपणे  दिलेल्या एका निवेदनानुसार दाऊद इब्राहिमच्या सिंडिकेटचा स्मगलिंगचा मार्ग दक्षिण आशिया, मध्यपूर्व व आफ्रिका येथून निघतो. त्यात अल कायदाचाही सहभाग आहे. दाऊद स्मगलिंगसाठी दहशतवाद्यांच्या मार्गाची मदत घेतो आणि त्यांना कमिशनही देतो. गुजरातमध्ये लष्कर-ए-तैयबाकडून हल्ले चढवण्यासाठी दाऊदने त्यांना आर्थिक मदत केल्याचं आढळलं आहे. शस्त्रास्रं विक्रीतही दाऊद गुंतल्याचं सांगण्यात येतं. भारताला खिळखिळं करण्यासाठी दहशतवादी आणि दाऊद एकत्र आले. स्मगलिंगसारख्या आपल्या कारवायांना दहशतवाद्यांचं संरक्षण मिळालं तर ते दाऊदला हवंच होतं. त्याने दहशतवाद्यांशी हातमिळवणी केल्याचं निदर्शनास आल्यानेच अखेर अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केलं. 

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपवृत्तसंपादक आहेत.)

ravindra.rawool@lokmat.com