शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

ग्राहकशक्तीची ‘कडी’

By admin | Updated: December 12, 2015 16:32 IST

अर्भकावस्थेपासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येकजण ‘ग्राहक’ असतो, पण असंघटितपणामुळे त्याचा प्रभाव क्षीण ठरतो. ग्राहकांची शक्ती वाढवण्याचे प्रयत्न कुठे, कसे चालू आहेत, त्यातली आव्हाने कोणती, ग्राहक म्हणून आपल्याला काय करावे लागेल याचे धडे ब्राङिालिया येथे नुकत्याच झालेल्या ‘वर्ल्ड कंङयुमर कॉँग्रेस’मध्ये गिरवले गेले. तिथल्या अनुभवांचा हा कोलाज..

शुभदा चौकर
ब्राझिलिया हे ब्राझीलचे राजधानीचे शहर. टुमदार आणि अत्यंत नियोजित. हे शहर वसलेच मुळी 196क् मध्ये. अगदी ठरवून. पूर्वीचे राजधानीचे शहर होते रिओ द जनेरो येथे. पण राजधानी देशाच्या मध्यवर्ती भागात आणि देखणी हवी म्हणून हे शहर 2क्क्क् दिवसांत नव्याने बांधून काढले गेले. तेही विमानाच्या आकारात! इथले रस्ते, इमारती, अगदी झाडेसुद्धा नियोजनातूनच उभी राहिलेली आहेत. इथे ‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा रंगलेल्या असताना एका ख:याखु:या ‘स्मार्ट सिटी’त आठवडाभर वावरण्याची संधी मिळाली. ‘कंङयुमर्स इंटरनॅशनल’ (सीआय) ही जगभरातील ग्राहक संस्थांची शिखर संस्था. ‘सीआय’तर्फे दर चार वर्षांनी भरणारी वर्ल्ड कॉँग्रेस म्हणजे एक महामेळावा असतो. यंदा मुंबई ग्राहक पंचायतीतर्फेया महासभेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अपूर्व संधी मिळाली. 
पुढच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्याच्या तयारीत असलेला हा देश. या देशाने यंदा वर्ल्ड कंङयुमर कॉँग्रेसचे आयोजन करून जणू जगभरातील पाचही खंडातील ग्राहक संस्थांमध्ये एकोपा निर्माण करण्याची संधी साधून घेतली. जगातील सुमारे 80 देशांमधून सुमारे 4क्क् जण इथे जमले होते. ग्राहकहिताच्या दृष्टीने काही समजून घेण्यासाठी, काही शेअर करण्यासाठी!  
जगभरातील ग्राहक संस्थांच्या कामामधील समान धागा म्हणजे बाल, किशोर, युवा ग्राहकांची चिंता. त्यांना सजग ग्राहक करण्यासाठी चाललेली धडपड! आता वयाची चाळिशी ओलांडलेल्या पिढीवर जे काही ग्राहकत्वाचे संस्कार त्यांच्या जडण-घडणीच्या काळात झाले, तेव्हा जागतिकीकरणाचे वारे जगभरात खेळू लागले नव्हते. बाजारपेठा मर्यादित होत्या. ‘उपभोगावर संयम’ हे शाश्वत जीवनशैलीसाठी आवश्यक असे ग्राहक-तत्त्व! जागतिकीकरणापूर्वी हे तत्त्व आचरणात आणले जाणो सहज शक्य होते. पण आज उत्पादनांनी गच्च भरलेल्या, मार्केटिंगच्या मायावी क्लृप्त्यांची मोहिनी पडलेल्या आणि जाहिरातीतील अतिरेकी दाव्यांच्या भडिमाराने मती गुंगवणा:या बाजारपेठेत जी तरु ण पिढी वावरत आहे, त्यांना ग्राहक म्हणून वेळीच जागरूक केले नाही तर त्यांच्या जीवनमानावर दुष्परिणाम होतील, ही भीती जगभरातील ग्राहक संस्थांना वाटते आहे. बहुतांश संस्था त्यांच्या कामाचे जे सादरीकरण करत होत्या, त्यातून त्यांची ही कळकळ जाणवत होती. 
 ‘सीआय’च्या हाकेला प्रतिसाद देत काही देश एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आपापल्या परीने चळवळ छेडतात. ‘सीआय’ने अलीकडे सुचवलेली एक मोहीम म्हणजे प्रतिजैविकयुक्त (अॅण्टिबायोटिक्स) खाद्यपदार्थांच्या विरोधात अभियान! मानवी शरीरावर प्रतिजैविकांची परिणामकारकता कमी होत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत आले आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे चिकन, मटनमधील प्रतिजैविकांचे वाढते प्रमाण. अलीकडे खाद्य- उत्पादनांसाठी वापरल्या जाणा:या जनावरांना मोठय़ा प्रमाणावर प्रतिजैविके दिली जातात, जी चिकन, मांस यांच्या सेवनातून आपल्या पोटात जातात. त्यामुळे आपले शरीर प्रतिजैविकांना सरावते. मग कोणताही आजार बरा करण्यासाठी डॉक्टरांनी जर प्रतिजैविके दिली, तर त्यांचा इष्ट परिणाम चटकन होत नाही. मॅकडोनाल्ड, सबवे व केएफसी या तयार खाद्यान्न कंपन्यांनी प्रतिजैविक वापरलेले मांस वापरू नये यासाठी ‘सीआय’ने पुढाकार घेतला आहे. तरुणांमध्ये मॅकडोनाल्ड, सबवे व केएफसीचे आकर्षण खूप आहे. त्यांच्या आरोग्याचा विचार करता अनेक देशांमध्ये ही चळवळ राबवली जावी, अशी अपेक्षा ‘सीआय’ने व्यक्त केली आहे. शिवाय मॅकडोनाल्ड, सबवे व केएफसीमध्ये जाणा:या ग्राहकांनी आपापल्या ठिकाणी या चेनच्या व्यवस्थापनाशी संवाद साधून यासंदर्भातील त्यांचे धोरण काय आहे, ते या विषयाबाबत सतर्कआहेत ना, याची खातरजमा करावी, असेही आवाहन तेथे करण्यात आले.  
 स्वीडनची स्वीडिश सोसायटी फोर नेचर कॉन्झर्वेशन ही संस्था ‘सीआय’च्या साह्याने जगभरातील संस्थांसाठी दरवर्षी एक थीम देते. त्यावर काम करण्यासाठी अर्थसाह्यही करते. 
या उपक्र मांतर्गत चांगले उपक्र म राबविलेल्या काही संस्थांची सादरीकरणो झाली. विषय होता- ‘ऑरगॅनिक फार्मिग अॅण्ड सेफ, सस्टेनेबल फूड’. आपल्या पोटात सकस आहार जावा, यासाठी अनेकविध प्रयत्न वेगवेगळ्या संस्था करीत आहेत. शेतक:यांना ऑर्गनिक शेतीचे ज्ञान व भान देणो, मुलांना सकस आहाराच्या सवयी लागाव्या यासाठी रंजक खेळ व उपक्र म तयार करणो, मुलांच्या खाद्यपदार्थांमधील वेष्टन कसे असावे याचे संकेत आखणो, शाळेच्या आवारात मुलांना निकस खाद्य मिळणार नाही असे नियम करणो, शालेय आणि महाविद्यालयीन मुलांना जाहिरातींची भुरळ पडू नये यासाठी सजग करणो असे कितीतरी! मुंबई ग्राहक पंचायतीतर्फेमुंबई, पुणो, कोकण येथील काही शाळांमध्ये कन्ङयुमर क्लब चालवले जातात. पॅकबंद पदार्थांचे लेबल कसे वाचावे, वस्तूंची निवड करताना काय पाहणो महत्त्वाचे, जाहिरातीतील तथ्य अशा विषयांवर कार्यकत्र्याच्या मुलांशी गप्पा होतात, वक्तृत्व, नाटुकली इ. स्पर्धा होतात. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सुधाराव्या म्हणून खास सापशिडीचा खेळ विकसित केला आहे. मजा म्हणजे स्वीडन, फिलिपाइन्स, ब्राझील या देशांच्या प्रतिनिधींनीही असेच काही ना काही खेळ, उपक्र म तयार केले होते. त्याचे शेअरिंग येथे झाले.    
वाढत्या महागाईच्या काळात पैशाच्या तोलामोलाची आणि दर्जेदार उत्पादने व सेवा ग्राहकांना मिळाव्यात यासाठी प्रगत देशांतील काही ग्राहक संस्था सातत्याने वस्तूंचा व सेवांचा तौलनिक अभ्यास करतात. खाद्यपदार्थांपासून मोटारींपर्यंत सर्व वस्तूंचे विविध ब्रॅण्ड घेऊन त्यांचा तुलनात्मक अभ्यास प्रसिद्ध करायचा, कुठे खोट आढळली तर आवाज उठवायचा हे या संस्थांचे मुख्य काम. भारतात असे काम अजून फार जोरकसपणो होत नाही, कारण हे काम खर्चिक आहे. यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. 
पण 2क्क्9 मध्ये मुंबई ग्राहक पंचायतीने रिलायन्स एनर्जी आणि टाटा पॉवर यांचा तौलनिक अभ्यास करून ‘से टाटा टू रिलायन्स’ असे अभियान छेडले आणि तेव्हापासून आजपर्यंत मुंबईतील सुमारे चार लाख वीज-ग्राहक ‘रिलायन्स एनर्जी’ला टाटा करून ‘टाटा पॉवर’ची सेवा घेऊ लागले. 
मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी या मोहिमेची माहिती दिली.  
ब्राझीलमधील या कॉँग्रेसमधून एक धडा आम्ही घेतला. देश पातळीवर आपण एकत्रितपणो काही उपक्र म, मोहिमा हाती घेऊ शकतो का, याचा विचार आम्ही भारतीय प्रतिनिधींनी सुरू केला. या वर्ल्ड कॉँग्रेसच्या निमित्ताने भारतातील प्रमुख ग्राहक संस्थांचे मिळून आम्ही नऊ प्रतिनिधी फुटबॉल या टीम-गेम-प्रिय देशामध्ये एकत्र आलो होतो. गेली चार वर्षे ‘सीआय’च्या प्रतिनिधी मंडळावर अॅड. शिरीष देशपांडे होते. त्यांनी त्यांच्या मुदतीत ‘सीआय’चे प्रतिनिधित्व थेट संयुक्त राष्ट्रांच्या सभेत प्रभावीपणो केले. ‘सीआय’च्या ट्रस्टींनी त्याबद्दल गौरवोद्गार काढले. ‘सीआय’ प्रतिनिधी मंडळावरील त्यांची मुदत या सभेत संपली. नवा उमेदवार होता - जयपूरच्या ‘कट्स’चा जॉर्ज चेरियन. जॉर्ज चेरियन यांना सर्व भारतीय प्रतिनिधींनी मिळून एकमताने निवडून देण्याच्या निमित्ताने एकत्र आलेले आम्ही सारे भारतीय प्रतिनिधी वर्ल्ड कॉँग्रेसभर एकदिलाने वावरलो. ही आमची ‘टीम इंडिया’ अनेकांच्या कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय बनली होती.  
पूर्वी देशादेशांचे प्रश्न भिन्न असायचे. आता देशादेशांच्या प्रश्नांतही एकसमानता आली आहे. मॅगीचे उत्पादन करणा:या नेस्लेपासून ते व्होल्सव्ॉगनपर्यंत अनेक उत्पादक ग्राहकांची फसवणूक करतात. वित्तसेवा, टेलिफोन सेवा इ. देणा:या बहुराष्ट्रीय कंपन्याबद्दल सर्वदूर असमाधान आहे.
आगामी ऑलिम्पिकच्या यजमान देशात जमलेल्या ग्राहक-नेत्यांना लख्ख जाणीव झाली की, आज पाचही खंडांना समान प्रश्नांनी ग्रासले आहे. ऑलिम्पिकच्या चिन्हाप्रमाणो पाच खंडातील ग्राहक सजगपणो संघटित झाले, तरच ग्राहकांना राजयोग उपभोगता येईल.
 
  कल्पना प्रत्यक्षात येणार!
 
अनेकदा खासगीतील गुजगोष्टींतून बातम्या मिळतात, संकेत समजतात. तसेच आमचेही झाले. पहिल्याच दिवशी ब्रेकफास्ट टेबलवर वठउळअऊ (वल्ल्र3ी िठं3्रल्ल2 उल्ली1ील्लूी ल्ल ळ1ंीि  ऊी5ी’स्रेील्ल3)  एक डायरेक्टर गुलेमो वॉलेस भेटले. अॅड. शिरीष देशपांडे यांना ते सांगून गेले, ‘तुमची कल्पना प्रत्यक्षात येणार!’ - ग्राहक संरक्षणासंदर्भात जगभरात जे जे काही चांगले-वाईट चालले आहे, त्याचा नियमित लेखाजोखा मांडणारी यंत्रणा विकसित केली जावी, ही अॅड. देशपांडे यांनी सुचवलेली आणि फुलवलेली कल्पना! गेल्या वर्षी जिनिव्हा येथे झालेल्या वठउळअऊ च्या मीटिंगमध्ये गुलेमो वॉलेस यांनी या कल्पनेचे ‘मुकुटातील शिरोमणी’ या विशेषणाने कौतुक केले होते. मधल्या काळात त्यांनी स्वत: ही कल्पना न्यूयॉर्कच्या अधिका:यासमोर मांडली. आणि आता लवकरच होणा:या संयुक्त राष्ट्रांच्या सभेत त्यावर सर्वमान्यतेची मोहोर उमटण्याची दाट शक्यता आहे! फळे, ज्यूस आणि चीजच्या अनेकविध चकत्यांनी भरलेल्या त्या ब्रेकफास्ट टेबलवर आमच्या मनात एकच भावना होती की, चीज झाले! ज्या तळमळीने अॅड. देशपांडे यांनी ही कल्पना आधी ‘सीआय’, नंतर वठउळअऊ मध्ये मांडून जगाच्या गळी उतरवण्यासाठी गेली तीन वर्षे रक्त आटवले त्याचे चीज झाले होते! हे प्रत्यक्षात येईल तेव्हा ही यंत्रणा म्हणजे भारताने जगाला दिलेली अनमोल भेट ठरेल!! 
 
(लेखिका ग्राहक चळवळीच्या 
ज्येष्ठ कार्यकत्र्या व पत्रकार आहेत.)
cshubhada@gmail.com