शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कॉर्पोरेट घटस्फोट ! उद्योगविश्वातील बलाढ्य अशा दोन घराण्यांतील संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 05:00 IST

उद्योगविश्वातील बलाढ्य अशा दोन घराण्यांतील संसार.. लाडाकोडात वाढवलेल्या आपल्या मुलीचं आयुष्य जावयानं ताब्यात घेतल्यावर सासरा अस्वस्थ होतो आणि एक दिवस मुलीच्या घरातून जावयाला थेट हुसकावूनच लावतो..दुसºया संसाराचीही अशीच अकाली काडीमोड..सासरा गांधीवादी, तर जावई कर्तबगार; पण मोकळाढाकळा. त्याची उधळमाधळ पाहून सासºयाची मुलीच्या संसारात ढवळाढवळ सुरू होते आणि एक दिवस कंटाळून जावईच घराबाहेर पडतो.. ‘टाटा’ आणि ‘इन्फोसिस’ कुटुंबांतला हा बेबनाव. तो का निर्माण झाला? सासरा हेकट, की जावई आडमुठा? पूर्ण भरात येण्याआधीच हे संस्कार का विस्कटले?..

अभय टिळक

दोन कुटुंबे आणि त्यांच्या दोन कथा... कुटुंब क्रमांक एक. घरातील उपवर मुलीच्या लग्नासाठी खटपट चालू असते. मोठ्या जोमात वरसंशोधनाची मोहीम राबवली जात राहते. मुलीचे घराणे चांगलेच तालेवार. घरात उद्योगधंद्याचा मोठा आणि प्रदीर्घ असा देदीप्यमान वारसा. मूल्यांची परंपराही तेजस्वी. हे सगळे निगुतीने सांभाळणारा जावई शोधायचा म्हणून घरातील वडीलधाºयांची तगमग. अखेर, माहितीतल्याच एकाला बोहल्यावर चढवले जाते. मोठ्या गाजावाजाने सोहळा पार पडतो. लग्नानंतरच्या नवलाईची चार-पाच वर्षे उलटतात. दरम्यान, मुलीच्या बापाची घुसमट सुरू होते. एवढ्या लाडाकोडाने वाढवलेल्या आपल्या मुलीच्या आयुष्यात नव्यानेच आलेल्या कालच्या तरुणाने बघता बघता तिचे विश्व व्यापून टाकलेले पाहून बाप अस्वस्थ बनायला लागतो. हळूहळू मग हस्ते-परहस्ते तर कधी मागील दाराने मुलीच्या संसारात त्याचा हस्तक्षेप चालू होतो. जावयाला हे सगळे जाचायला लागते. अखेर, सासरा आणि जावई या दोघांनाही हा कोंडमारा असह्य होतो आणि एके दिवशी बाप आपल्या मुलीच्या घरातून जावयाला बाहेर काढतो. हे झाले पहिले चित्र......चित्र क्रमांक दोन. घराणे उद्योगविश्वातीलच. मुलगी चांगली उच्चविद्याविभूषित. बाप मध्यमवर्गातून मोठ्या मेहनतीने कॉर्पोरेट विश्वातील हस्ती बनलेला. अतिशय सुसंस्कृत, शालीन आणि विद्येची बूज राखणारी कौटुंबिक परंपरा. बापाने तळहातावरच्या फोडाप्रमाणे मोठ्या लाडाकोडात जन्मापासून जपलेली मुलगी वयात आल्यानंतर तिच्या लग्नाचा प्रश्न साहजिकच उभा राहतो. वरसंशोधन चालू होते. अखेर एक मुलगा सापडतो. कर्तबगार, नावलौकिकाचा शिक्का कॉर्पोरेट विश्वात उमटवलेला. मोठ्या हिकमतीने उद्योग वाढवणारा. या बाबतीत जावयाची मनोभूमिका मात्र सासºयाच्या पिंडप्रकृतीशी पूर्ण भिन्न. सासरा गांधीवादी विचारसरणीचा. स्पर्धेपेक्षा सहअस्तित्वाचे मूल्य जपणारा. भपकेपणापेक्षा साध्या आयुष्याची गोडी असणारा. लग्न होते. संसार चांगला तिनेक वर्षे भरभराटीचा होतो. अचानकच, आपण पार कोपºयात फेकलो गेलो असे मुलीच्या बापाला वाटायला लागते. ज्या जावयाच्या धडाडीचे आजवर कौतुक केले त्याच्या चुका एकदम डोळ्यांत भरू लागतात. त्याची खर्चिक वृत्ती डाचायला लागते. मुलीच्या संसारात मग बापाची ढवळाढवळ चालू होते. जावयाला ते आवडत नसावे, हे ओघानेच येते. सासरा आणि जावयाच्या कुरबुरींचा आवाज घराच्या चार भिंतींबाहेरही यायला लागतो... आणि अखेर कंटाळून एके दिवशी जावईच घरातून बाहेर पडतो...तुमच्या-माझ्यासारख्या चारचौघांच्या कुटुंबांत अधूनमधून अशा घटना कानावर येतात. टाटा आणि मूर्ती या दोन कुटुंबांची कॉर्पोरेट कथा अशीच नाही का...!डाव का मोडला?

टॅग्स :Ratan Tataरतन टाटा