शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

प्रासंगिक - शैक्षणिक कार्यसंस्कृती बदलल्यास वैज्ञानिक क्षेत्रात दबदबा वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 03:58 IST

१९६0 साली स्थापन करण्यात आलेल्या रॉयल सोसायटी ऑफ लंडन या शास्त्रीय संशोधन क्षेत्रातील प्रथितयश आणि अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेद्वारे निवडण्यात आलेल्या सन्माननीय सभासदांपैकी पाच सभासद (फेलोज) मूळ भारतीय आहेत.

शैलेश माळोदे 

१९६0 साली स्थापन करण्यात आलेल्या रॉयल सोसायटी ऑफ लंडन या शास्त्रीय संशोधन क्षेत्रातील प्रथितयश आणि अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेद्वारे निवडण्यात आलेल्या सन्माननीय सभासदांपैकी पाच सभासद (फेलोज) मूळ भारतीय आहेत. ही बाब अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. त्यात डॉ. गगनदीप कंग यांचा समावेश असून फेलो ऑफ रॉयल सोसायटी (एफआरएस) म्हणून निवडल्या गेलेल्या त्या प्रथम भारतीय नागरिक ‘महिला’ आहेत.

अत्यंत मानाचा सन्मान प्राप्त झालेल्या आयझॅक न्यूटन (१६७२), चार्ल्स डार्विन (१८३९), मायकेल फॅरॅडे (१८२४), अर्नेस्ट रदरफर्ड (१९0३), अल्बर्ट आइन्स्टाइन (१९२१), श्रीनिवास रामानुजन (१९१८), जगदीशचंद्र बसू (१९२0), सी.व्ही. रामन (१९२४), मेघनाद सहा (१९२७), होमी भाभा (१९४१), एस. चंद्रशेखर (१९४४), सत्येंद्रनाथ बोस (१९५८), प्रा. मनमोहन शर्मा (२00५) यासारख्यांच्या यादीत त्यांचा समावेश झालाय. एफआरएस म्हणून निवडले गेलेले प्रथम भारतीय होते अर्देशीर कर्सेटजी वाडिया.

अस्तित्वात असलेली सर्वात जुनी विज्ञान सोसायटी म्हणून ओळखली जाणारी रॉयल सोसायटी लंडन २८ नोव्हेंबर १९६0 साली अस्तित्वात आली. त्यानंतर १५ जुलै १६६२ पासून अशा प्रकारे १७00 पेक्षा जास्त फेलोज निवडण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी म्हणजे २0१९ साली निवडण्यात आलेल्या एकूण ६२ (यात १0 परदेशी सदस्य आणि एक मानद सदस्य) सदस्यांना त्यांनी विज्ञान क्षेत्रात दिलेल्या लक्षणीय योगदानासाठी हे सदस्यत्व (फेलोशिप) बहाल करण्यात आले आहे. रॉयल सोसायटीचे अध्यक्ष आणि २00९ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञ प्रा. वेंकी रामाकृष्णन म्हणाले, ‘रॉयल सोसायटी प्रदीर्घ ऐतिहासिक वाटचालीत आमची फेलोशिप (सदस्यत्व) हा एक स्थिर तंतू असून त्यापासून मानवकल्याणासाठी विज्ञान हा आमचा उद्देश सफल झालेला आहे. कीटकशास्त्र, भूमिती, हवामानशास्त्र, भूशास्त्र यासहित वैविध्यपूर्ण विज्ञान शाखांमध्ये देदीप्यमान कामगिरी करून ज्ञानाची साधना करताना आणि त्यात सतत योगदान देणाºया सर्व फेलोजच्या कामाला जणू ही सलामीच आहे. या फेलोजची निवड प्रक्रिया अत्यंत कठोर आणि विविध टप्प्यांची असते. यासाठी सोसायटीच्या वेबसाइटवरील बटनला लॉगइन व्हावं लागतं आणि मग नावं प्रस्तावित करता येतात. उमेदवारांनी नैसर्गिक ज्ञानात (यामध्ये गणित, अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय ज्ञानही आलंच) वृद्धी करणारं भरपूर योगदान दिलेलं हवं. प्रत्येक उमेदवाराचा त्याच्या गुणवत्तेवर विचार केला जातो. हा उमेदवार वैज्ञानिक समुदायाच्या कुठल्याही क्षेत्रातून सुचविला जाऊ शकतो. महिला उमेदवारांच्या नामांकनांना आणि उगवत्या क्षेत्रातील नामांकनांना प्रोत्साहित करण्यात येतं.

मानद फेलोशिप वैज्ञानिक क्षेत्राच्या कार्याला मदत करणाºया लक्षणीय कामगिरीसाठी या विज्ञानाला मोठे फायदे होतील असे कार्य करणाºयाला बहाल करण्यात येते. यंदा ही फेलोशिप भारतीय औषध कंपनीचे अध्यक्ष युसुफ हमीद यांना जाहीर करण्यात आली आहे. अर्थात यात वैज्ञानिक क्षेत्रात प्रत्यक्ष कामगिरी असण्याची गरज नाही. मानद फेलोशिप बिल ब्रायसन आणि मेल्वीन ब्रॅग यांनाही पूर्वी देण्यात आली आहे. बिल ब्रायसन हे ट्रॅव्हल रायटर म्हणून प्रसिद्ध आहेत. १९९६ पूर्वी मानद सभासदत्व नव्हतं. फेलोशिप किंवा परदेशी सदस्य फेलोशिपसाठी रॉयल सोसायटीच्या दोन फेलोजनी नामांकन करायला हवं. तसं प्रमाण मात्र ३0 सप्टेंबरपूर्वी दरवर्षी प्राप्त व्हायला हवं. रॉयल सोसायटीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू वा संशोधन परिषदेच्या प्रमुखाकडून अतिरिक्त नामांकनं मागवू शकतात.

यंदा म्हणजे २0१९ मध्ये परदेशी सदस्य श्रेणीत निवडले गेलेले एफआरएस डॉ. गगनदीप कंग सध्या ट्रान्सलेशनल हेल्थ सर्व्हिस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट या भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील संस्थेच्या कार्यकारी संचालकपदी कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीमुळे तरुण मुलींना वैज्ञानिक क्षेत्रात करिअर करण्यासाठीचं प्रोत्साहन लाभेल यात काही संशय नाही. यंदा याव्यतिरिक्त प्रिन्स्टन विद्यापीठातील गणिताचे प्रा. डॉ. मंजुल भार्गवा, ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. अनंत पारेख आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडिजमधील डॉ. अक्षय व्यंकटेश यांनाही रॉयल सोसायटीची फेलोशिप देण्यात येणार आहे. या सर्वांमुळे भारताचा वैज्ञानिक क्षेत्रातील दबदबा वाढेल असं वाटतं. फक्त आपल्या शैक्षणिक संस्थांची कार्यसंस्कृती मात्र सुधारायला हवी.(लेखक विज्ञानाचे अभ्यासक आहेत) 

टॅग्स :scienceविज्ञान