शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

ग्रामीण भागातील ढंगदार बोलीचे रंगतरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 09:05 IST

बळ बोलीचे : ‘भाषेसोबत ग्रामीण माणसे जेवढी खेळतात तेवढी शहरी माणसे खेळत नाहीत हे सत्य नाकबूल करता येत नाही. व्याकरण हे पुस्तके आणि परीक्षा यांच्याशी जास्त कटिबद्ध असते. ते रोज जिभेवरच्या भाषेत फार टिकत नाही आणि टिकवले जात नाही. आता बघा ‘काय म्हणून’ यापेक्षा ‘कामून’ किंवा ‘सहजपणे’ यापेक्षा ‘सबागती’ या एकेका शब्दांमधून गाव-लोक-भाषेचा पिंड कळतो आणि त्या बोलीचा ताजेपणा मन वेधूनच घेतो. मोडतोड करून सहज वाकवत आणि कुठल्या पुस्तकात सहसा न गवसणारी बोलीची शब्दकळा मनोवेधक तसेच लक्षवेधी अशीच असते. 

- प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख

चालता- बोलता, हसत-खेळत, रोज म्हणजे दररोज जसा आपण श्वास घेतो त्या न्यायाने गाव-लोक भाषेचा वापर करतात. त्यांची ही भाषा वाहणाऱ्या पाण्यासारखी अथवा खेळत्या हवेसारखी असते. त्या भाषेत अढी नसते. अवघडपणा नसतो. व्याकरणाचे गारुड त्या भाषेवर नसते. कर्म, क्रियापद, नाम, सर्वनाम, संबोधन किंवा विभक्तीचे हवे तसे वाकवलेले प्रत्यय घेऊन गाव-लोक-भाषा जनतेची सोबत पिढ्यान्पिढ्या करीत आलेली आहे. ‘भाषेसोबत ग्रामीण माणसे जेवढी खेळतात तेवढी शहरी माणसे खेळत नाहीत हे सत्य नाकबूल करता येत नाही. (अलीकडे धनंजय चिंचोलीकर अर्थात बब्रुवान रुद्रकंठावार या आमच्या प्रिय मित्राने कथालेखात विविध भाषेचा, नवीन शब्दांचा जो चवदार, भारदस्त ‘खिचडा’ तयार केला. तो केवळ अप्रतिम आणि केवळ नवनिर्मितीपूरक आहे. बब्रुवानची ही ‘नवी भाषा’ भाषाविज्ञानाला एक मिळालेली देणगी म्हणता येईल.) व्याकरणाचा साधन ऐवज बोलीतही भरलेला असतो; पण बोली व्याकरणाच्या गुलामीखाली नांदत नाही. बोलीचे ऐश्वर्य तिने कोणत्याही जोडखाशिवाय अबाधित ठेवलेले असतेच.

व्याकरण हे पुस्तके आणि परीक्षा यांच्याशी जास्त कटिबद्ध असते. ते रोज जिभेवरच्या भाषेत फार टिकत नाही आणि टिकवले जात नाही. आता बघा ‘काय म्हणून’ यापेक्षा ‘कामून’ किंवा ‘सहजपणे’ यापेक्षा ‘सबागती’ या एकेका शब्दांमधून गाव-लोक-भाषेचा पिंड कळतो आणि त्या बोलीचा ताजेपणा मन वेधूनच घेतो. लोकांच्या तोंडात बसलेले हे खास पण रोजचे शब्द बघा. वाचा. जे कंसात दिलेले आहेत कुठपर्यंत (कोठरोक), कशासाठी (कहाला),  माझेतुझे (मव्हंतुव्हं), मुद्दामच (हाटकून), दगदग (बेजार किंवा वदवद), धिंगाणाखोर (इबलीस), गोंधळ (सीलसील), मुले (डेंगरं’), म्हैस (डोबाड), हेला (हालगट), शेळीचे पिल्लू (पाठ) हे सगळे शब्द जुन्या ठराविक शब्दकोशांच्या भिंतीपलीकडचे; पण सतत नवे रूप दर्शविणारे शब्द आहेत.

‘स’ एवढे एक बारीक अक्षर शब्दाच्या लगेच नंतर लावून - बसलास, जेवलास, झोपलास, निजलास, खाल्लास, उठलास अशी रूपे जिभेवरच्या भाषेत जास्त खुलूनच दिसतात. ‘बाळा, काय करतोयस/करतो आहेस!’ एवढा लांब विधानाचा प्रवास बोलीला मान्य नसतो. त्याऐवजी ‘काय करायलास’ एवढ्या दोन शब्दात भाषेचे काम भागते आणि विचारलेल्या प्रश्नांचे चटकन उत्तरपण मिळते किंवा कंसातील हे शब्द बघा कसे मजेदार आहेत. वारंवार (येऊन-जाऊन), उद्योग/काम (हुद्दा), हिंमत खचणे (हापकून जाणे), पहाटे (तामटाच्या आत), लवकर (येरवाळी), हळूहळू (सुतासुतानं), दारू-मद्य (मुतारा), परपुरुष (धगोड), संबंध (लोपताना), रविवार (आइतवार), गुरुवार (बस्तरवार), पिशवी (झोऱ्या), खापराचे पाणी प्यायचे मोठे भांडे (माथन) किंवा (बिनगी), गिऱ्हाईकाने खरेदी करून प्रथमत: दिलेले पैसे (बव्हनी), दूध रोज घरी येण्याची केलेली व्यवस्था (वरवा), घराची समोरची ऊठबस करण्याची आतिथ्य खोली (डहाळज), साप-सरोप, विंचू-इच्चू, बेडकी-बेंडकोळी, खिडकी, झरोका (सवनं), चवळी (बरबटी) असे न मोजता येतील इतके शब्द लोकांच्या भाषाव्यवहारात वापरले जातात. हे शब्द संपलेले नाहीत किंवा त्यांचा वापर सरलेला नाही.

मोडतोड करून सहज वाकवत आणि कुठल्या पुस्तकात सहसा न गवसणारी बोलीची शब्दकळा मनोवेधक तसेच लक्षवेधी अशीच असते. चावटला ‘चहाटळ’, चाणाक्षला ‘फैली’, जखमेतील किडला ‘आसाडी’, जखमेला ‘सावंद’, सापविष उतरवणीला ‘पांढाळ’, विष चढण्याला ‘झेंडू फुटणे’ असे लोक-बोलीत सर्रास शब्द वापरले जातात.

लोक, जीभ, भाषा, शब्द, संवाद, व्यवहार आणि दैनंदिनी या एकसंघ गोष्टी गावभाषेत एकमेकींना धरून तसेच जुळून असतात. उकार-वेलांटीची अथवा दीर्घ-ऱ्हस्वांची कोणतीच बाधा गाव-भाषेतील शब्दकळेला अडथळा ठरत नाही. किती गोड, किती सोपे, किती गेयात्मक आणि किती नेमके शब्द गावबोलीत घर करूनच बसलेले आढळतात. बैलगाडीच्या चाकांची मातीवर उमटणारी निशाणी असते. तिला ‘चाकोली’ असा अप्रतिम शब्द जनलोकांनी दिला आहे. शेतीकामातील अवजड काम करताना दोन बैलांपुढे दुसरे दोन बैल जुंपून चार बैलांची जोड घातली जाते. त्याला ‘चाव्हर’ असा फार सुंदर शब्द योजला जातो. पळवणे किंवा पळवून लावणे या ऐवजी ‘खेदाडणे’ किंवा नवा बैल कामासाठी तयार करणे, त्याला ‘पेटवणे’ हा फारच बोलका शब्द गावात वापरला जातो. पेटवणे या शब्दातील ‘ज्वालाग्रहीतत्त्व’ किती वेगळ्या पद्धतीने इथे योजलेले आहे. अमर्याद संपत्तीला ‘हौलाट’ म्हणतात.  खूपला ‘मायंदळ’ ‘मोप’ म्हटले जाते. भेकडाला ‘हारनकाळज्या’ तर ‘गरीब स्वभाव’ प्रकृतीला ‘शाऊ’ म्हणण्याची खेड्यांची भाषिक लकब मोठी लज्जतदार म्हणायला हवी. शिंग मारणाऱ्या बैलाला ‘डिवरा’ म्हणतात. जिद्द बैलाला ‘तापड’ किंवा ‘अफाट’ म्हणतात. ‘नादी लावणे’ या एका वाक्यप्रयोगामध्ये सांकेतिक, सामाजिक अनेक पदर सामावलेले आहेत. ही या प्रकारची बहुअर्थवाहक, बहुध्वनीसूचक, बहुपदर असणारी गावभाषा समाजाच्या सांस्कृतिकीकरणाचे नानाविध पैलू स्पष्ट करणारी भाषा आहे. महत्त्वाचे म्हणजे या गावभाषेला खेड्यांच्या वैशिट्यसंपन्नतेचा तसेच शेतीमातीचा खास म्हणून सौरभ आहे. हीच भाषेची मजाही आणि तीच तिची ओळखही !

टॅग्स :Socialसामाजिकmarathiमराठीliteratureसाहित्य