शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:21 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘रंग प्रेमाचे’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक डॉ.उल्हास कडूसकर...

राजेश - या या, साधना मॅडम या! तुमचीच वाट बघत होतो.साधना - अरे, मॅडम काय? अहो जाहो काय? काय तू तरी राजेश? आणि मी अगदी वेळेवर आलेय हं ! बरोबर, ठरलेल्या वेळी.राजेश - अग, तू काय ती कॉलेजची मुलगी राहिलेली नाहीस, चुलबुली, बडबडी, कुठल्याही ग्रुपमध्ये सहज मिसळणारी, कधी बॅडमिंटनची रॅकेट तर कधी टेबल टेनिसची बॅट हातात घेऊन भिंगरीसारखी फिरणारी.साधना - तुला कुणी सांगितलं की मी बदलली आहे? मी आहे तशीच आहे हो, आता लग्नानंतर थोडाफार फरक पडणारच.राजेश - पडला ना? तेच तर मी म्हणतोय ! आता तुम्ही प्रतिष्ठित, सुविद्य सुगृहिणी आहात !साधना- बरं बरं ते राहू दे !राजेश - आणि तू एकटीच ! एकटी कशी काय आलीस ?साधना - हे बघ राजेश, तू मला इथे कशाला बोलावले आहेस आणि काय विचारणार आहेस ते मला माहीत आहे म्हणूनच मी एकटी आली आहे.राजेश - म्हणजे तू ओळखलंस तर?साधना - अर्थात.राजेश- मग, मी तीन महिन्यांसाठी यु.के.ला इंग्लंडला गेलो काय आणि नेमके तेव्हाच तू लग्न करून टाकलंस?साधना - तू माझा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड अगदी लहानपणापासूनचा मित्र, माझ्या साऱ्या बारीकसारीक गोष्टी तुला माहिती आणि एवढा मोठा निर्णय तू नसताना मी कसा काय घेतला ...?राजेश - अग तसं नाही ग ! पण इतक्या लांब असताना मला लगेच येणंही शक्य नव्हते.साधना - आपल्याला डावललं असं तुला वाटत असेल.राजेश- छे छे ! तसं नाही... तू हुशार आहेस, सूज्ञ आहेस.साधना - तरी पण मी अनुरागशी लग्न कसं काय केलं हेच तुला जाणून घ्यायचे आहे. हो ना?राजेश- अर्थात! आता सांग मला काय आणि कसं झालं ते ! पराग, चिराग, अनुराग आणि तू यांची मैत्री म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये गाजलेली सर्वांच्या चर्चेचा विषय झालेली.साधना - त्या तिघातून मी कुणाला ‘हो’ म्हणणार याच्यावर तर्क-वितर्क, कॉलेजमध्ये त्याच्यावर पैजा लागल्या म्हणे !राजेश- मग काय तर! तुझे आणि त्या त्रिकुटाचे मेतकूट याबद्दल सगळ्यांना कुतुहल होते ! कॉमन रुम, कँटीन नाहीतर कॉलेजच्या कुठल्याही कोपºयात तुमच्या तासन्तास काय गप्पा चालायच्या आणि त्यासुद्धा तावातावाने ! सगळ्यांना मोठी गंमत वाटायची !साधना - त्या तिघांना त्रिदेव म्हणायचे नाही तर ‘एक फुल तीन माली’ म्हणायचे, हे आम्ही ऐकून होतो.राजेश- मग या स्वयंवरात अनुरागने बाजी कशी काय मारली?साधना- ओळख तूच ! तुझा तर्क काय चालतो? तुला काय वाटतं. तू तर मला अगदी पहिल्यापासून घरापासून ओळखतोस. माझ्या महेश दादा इतकाच - खरा हितचिंतक दोस्त, कॉलेजमधला माझा पालक- वगैरे-वगैरेराजेश - नाही बुवा- कठीण आहे सांगणे! काही डोेके चालत नाही. पराग स्मार्ट राजबिंडा, स्पोर्टसमन, पॉप्युलर, त्यामुळे त्याच्याशी जोडी जमेल असे वाटत होते.साधना- हो! माझ्या मैत्रिणीदेखील मला त्याच्यावरून चिडवायच्या आणि त्यालाही, त्यातल्या काही जणी तर माझ्यावर जळायच्या !राजेश- मग काय झालं?साधना- खरं सांगू ! त्याने मला प्रपोजसुद्धा केलं होतं. पण हो नाही म्हणायच्या आत तो युएसला-अमेरिकेला निघून गेला. रिझल्ट लागल्याबरोबर...राजेश- आश्चर्य आहे.साधना- बहुधा त्याला कुठल्याही प्रकारे बांधून घ्यायचे नव्हते. तिकडे जाताना आम्ही दोघेही एकमेकांपासून स्पोर्टसमन्, स्पिरीट शिकलो आणि तसेच वागलो.राजेश- आणि मग चिरागमध्ये काय? तू म्हटलेल्या ‘आ जा सनम’ या एका गाण्यावरच तो फिदा झाला होता.साधना - आर्ट्स सर्कलमध्ये हिरीरीने भाग घेताना आम्ही जवळ आलो, त्यानेही मला प्रपोज केले होते.राजेश - वा...! उत्तमच की! मग त्याचे काय झाले?साधना - राजेश, माझंही त्याच्यावर प्रेम होतं. माझ्या मनात द्वंद्वच सुरू होतं. काय करावं ते कळत नव्हतं.राजेश - का? काय प्रॉब्लेम झाला? आणि अनुराग.... त्याचं काय?साधना - नाही, तुला नवल वाटेल, पण अनुरागनं मला कधीच प्रपोज केलं नाही, मात्र त्याच्या बारीकसारीक गोष्टीतून, नजरेतून, वागण्यातून आणि माझ्या वाटणाºया काळजीतून त्याचे प्रेम ओथंबून जात होतं.राजेश- मग तू निर्णय कसा घेतलास?साधना- मला जाणवेल की चिरागला माझी सोबत, साथसंगत हवी होती, त्याच्या संगीतात, कलेत माझी फक्त पार्टनरशिप हवी होती. लाईफ पार्टनर शिप? नक्की सांगता येत नव्हतं ! का कुणास ठाऊक.राजेश- शेवटी तू, निश्चय कसा केलास?साधना- एका मंत्राच्या आधारे! बघ, तुलासुद्धा उपयोगी पडेल निवड करताना, ज्याच्यावर आपण प्रेम करतो तो नव्हे, तर त्याच्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो त्यालाच पसंत करावं कळलं? आणि मी तेच केलं!-डॉ.उल्हास कडूसकर, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव