शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

मनाचा ठाव घेणारी ओल्या जिभेवरची भीजभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 11:57 IST

बळ बोलीचे : बोलीवरून माणूस कोणत्या भागांतला हे ओळखणे अवघड जात नाही. प्रवास करताना बाजूला बसलेला माणूस तोंड उघडले की, कळून येतो !!

- प्रा. केशव सखाराम देशमुखव्याकरण झुगारून जिभेवरच्या भाषेने तिची म्हणून पत आणि किंमत शाबूत ठेवलेली आहे. ग्रंथाची आणि शिक्षणाची भाषा प्रमाण आणि नागरी भाषा असते. त्या भाषेचे ‘सगळीकरण’ तसेच अनुकरण चटकन होते. शिक्षणाच्या भाषेचे मोल प्रमाण भाषेला चढलेले असते.

लोक-भाषा तशी मुळीच नसते. या लोक-भाषेचा पोत आणि तिची तरलता लवचीक, हार्दिक, सहजगत्या, प्रवाही, प्रभावी आणि टवटवीत असते. महत्त्वाचे म्हणजे ती मनाला भिडते. महत्त्वाचे असेही की, पाणी, प्रांत, हवा, समाज बदलला की, बोली बदलते. तिची ढब बदलते. तिची रग बदलते. तिचा रंग बदलतो. कारण, ओल्या जिभेवरील ही ओली म्हणजेच भीजभाषा ऐकताना आपल्या मनाचा ठाव घेते! जसे की, सामान्यरूपे होताना जिभेवरच्या भाषेत ‘त्यांना, यांना’ याऐवजी ‘त्याहेला, याहेला’ किंवा ‘त्याह्याला, याह्यला-’ अशा रूपांत अवतरते.प्रश्नार्थक सर्वनामांचे उच्चार ग्रामबोलीत गमतीशीर आढळून येतात. उदा. तू कोण आहेस? याऐवजी ‘तू कोन हास’ असे कानांवर जास्त पडते. ‘तू’ सर्वनामाची विभक्तीरूपे जिभेवरच्या भाषेत ‘तुव्हं-मव्हं’ असा मोकळा-ढाकळा पेहराव करून सादर होताना दिसतात.

बोलीला, तिच्यातील शब्दरूपांना खास सौंदर्य आहे आणि खास गोडवासुद्धा! येणार आहेस? जाणार आहेस? असे म्हणायला शब्द आणि वेळ पुष्कळ खर्ची जातो. मग त्याऐवजी ‘येतूस?-जातूस?’ या एका शब्दात सगळे काम इथे भागले गेले आहे. व्हयालं, जायालं किंवा इथवर, कुठवर या प्रमाणित रूपांपेक्षा ‘इथ्रोक, कोठ्रोक’ असे जोडशब्दांचे उच्चार गावांच्या जिभेवर रुळलेले आढळून येतात. शांत राहा, गप्प बसा, असे म्हणायचे तिथे काम पडत नाही. ‘मुका बस’ म्हटले सगळे त्यात आले.

‘गरजेपुरता भाषेचा वापर’ हा या गावभाषेतील काटकसरीचा नियम छानच ठरावा. हळूहळू असे  म्हणण्याऐवजी ‘वजंवजं’ किंवा ‘ढबानं’ म्हटले म्हणजे शब्दाची मजा वाढते आणि वजनसुद्धा. ‘पळवणे’ या शब्दाची योजना गाडीला जुंपलेल्या बैलांना वापरताना किंवा कुत्र्यांना पळवून लावताना ‘खेदाडणे’ एवढ्या क्रियापदातून दाखवली जाते. ‘जाऊ या, घेऊ या, खाऊ या, पिऊ या...’ हे क्रियावाचक शब्द एकेका शब्दांत- जाऊता, घेऊता, खाऊता, पिऊता, अशी गावमुखी उमटतात. त्यातील गोडवा आणि सहजता ही ‘मनभावन’ असते. ‘बघ’ याऐवजी ‘पहाय’ किंवा ‘जा’ याऐवजी ‘जाय’ ‘रहा’ याऐवजी ‘रहाय’ असा हेल काढून उच्चार होतो आणि त्यातून शब्दाशब्दांची मिठ्ठास वाढत जाऊ पाहते. ध्वनी उच्चारात जिथे जास्त ऊर्जा खर्च होते किंवा मुद्रणातही जिथे अधिक शब्द वापरले जातात. त्याऐवजी ‘वाक्याचे काम’ ‘एका शब्दात’ पूर्ण करण्याचे विस्मयकारक कार्य बोलीतला एक-एक शब्द करतो आणि वाक्याची बरोबरी करतो. आता हेच पाहा : ‘काय म्हणून’ त्याऐवजी ‘कामून’, ‘दररोज’ त्याऐवजी ‘रोच्चं’ किंवा- ‘रात्रंदिवस’ त्याऐवजी ‘रातंदिह्या’ असे शब्दप्रयोग चालता- बोलता केले जातात.

समाजशिष्टसंमत, सभ्य, सहज शिव्यांचा वापर लोक चालताबोलता करतात. त्यातही पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या शिव्या यांची प्रतवारी भिन्न-भिन्न दिसते. हिंगोली परिसरात, पूर्वेला शिव्यांचा प्रसाद फार बारकाईने बघितला, तर ऐकायला बरा वाटत नाही; पण अभ्यासायला रुची येऊ शकते.

* पुरुषांच्या शिव्या : ‘गवसीच्या, गधडीच्या, —- मनीच्या’ अथवा —-डीच्या, —-हुंग्या, हकनाक लिंगभावभेद करीत शिव्या दिल्या जातात. गंमत, मजा, दिल्लगी, थट्टा, मस्करी यातूनही शिव्या उगम पावतात. नातेसंबंधाचा वापर करून सहजपणे शिव्या वापरतात. शिव्या भांडणातील एक शस्त्र म्हणून वापरले जाते. हाणामारीच्या पूर्वीची पहिली स्टेप शिव्यांपासून सुरू होते. भूमी बदलली, पाणी बदलले म्हणजे शिव्यांचे रूप आणि शिव्यांचा जोर बदलतो !!* स्त्रियांच्या शिव्या : सांड्या, केरसुनी, मुडद्या, मेल्या, हालकट, बेसरम, सिरजोर, अगाऊ, लफंडर, ठेंगडा, लाजलज्जा : हे शब्द वापरून, त्यांच्या आशयापर्यंत पोहोचणाऱ्या सरळ, सभ्य शिव्या स्त्रिया देताना दिसतात. (अधिक तिखट शिव्या नको वापरायला म्हणून...)

शिमगा आणि शिव्या यांचे एक संमेलन पूर्वी फार रंगून सजवले जाई. जुने लोक कमी झाले आणि शिव्याही!! (हल्ली शिव्यांचा आविष्कार बेचव, सपक झाला आहे. सिनेमा, सिरिअल्समधून आणि हिंदीच्या प्रभावांतून भेसळ झालेल्या भाषेतून शिव्या ऐकू येतात. त्यांचे रूप रंगहीन भिंतीसारखे असते.) कुणी तरी म्हणाले : शि+वी= शिक्षण+विचार! शिवी दिली की, समोरचा वठणीवर येतो; जागा होतो. बाप काय किंवा मास्तर काय, ‘गाढवा’ असे मुलाला म्हणायचा; म्हणतो. गाढवा या शिवीला पूर्वापार जनमान्यताच लाभलेली आहे. खरंय ना!! (पण, यामुळे कष्ट उपसणारा, ओझी वाहणारा गाढव हा प्राणी लोकांनी वेठीला का धरला, हे कळत नाही.) ‘निजणे’ एवढे एक क्रियापद विविध छटा घेऊन येते. ‘झोपलात का = निजले का?, आजारी आहे = निजून आहे, ‘निजली’ याच शब्दाला लैंगिक संबंधीही एक अर्थ खेड्यांच्या भाषेत मिळालेला आहेच! जपून याऐवजी ‘सुतासुतानं’ असे म्हटले जाते. उन्हाचा उकाडा असह्य झाला, त्याला ‘धकायलं’ असे म्हटले जाते किंवा संकटांना! अडथळ्यांना ‘साडेसाती’ म्हणतात. आता हा साडेसातचा आकडा आता कुठून जरा शोध घ्यायला हवा!

जनभाषा ही पुस्तके वाचून बनली नाही. ती व्यवहार, रीतभात, प्रवृत्ती, दोष, चांगुलपण, रिवाज, सवय, परंपरा अशा विविध विषयांच्या अनुभवांतून बनत गेली आहे. माणसांत फरक तसा भाषेत फरक. आता बघा : लातूरकडे : काय करू लालाव, नांदेडकडे : काय करायल्या, हिंगोलीकडे : काय करायलास! ‘काय करतो आहेस?’ या एका लहान वाक्यांची ठेवण तीन जिल्ह्यांत खास वेगळी जाणवण्याइतपत निराळी आढळते ती अशी.

पाणी बदलले की ‘वाणी’ बदलली जाते. पाणीबाणी हा शब्द दुष्काळवर्णनाचाच शब्द नाही, तर तो भाषाबदलाचेपण निदर्शक जरूर आहे. इथे जिल्ह्याजिल्ह्यांतली माणसे, समाजसमूह खास ‘स्वत:च्या’ बोलीत बोलतात.या बोलीला स्वत:ची स्वतंत्र अशी ढब आहे. शैली आहे. गोडवा आहे. रंग आहे. तिचे प्रत्येक बोलीचे उच्चारणाचे एक स्वतंत्र कलारूप आहे. बोलीवरून माणूस कोणत्या भागांतला हे ओळखणे अवघड जात नाही. प्रवास करताना बाजूला बसलेला माणूस तोंड उघडले की, कळून येतो !! 

टॅग्स :Socialसामाजिकliteratureसाहित्य