शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दाक्षायणी-शर्वाणीची - वेगळी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:36 IST

जखमी कुत्री व मांजरांना आसरा देऊन त्यांची सेवाशुश्रूषा करणाऱ्या दाक्षायणी जाधव यांची प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर निवड झाली आहे. त्यानिमित्त दाक्षायणी व शर्वाणी जाधव या दोन्ही बहिणींच्या वेगळ्या वाटेवरची सफर...

- इंदुमती गणेशजखमी कुत्री व मांजरांना आसरा देऊन त्यांची सेवाशुश्रूषा करणाऱ्या दाक्षायणी जाधव यांची प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर निवड झाली आहे. त्यानिमित्त दाक्षायणी व शर्वाणी जाधव या दोन्ही बहिणींच्या वेगळ्या वाटेवरची सफर...रस्त्यावर भटकी कुत्री, मांजरं आणि तेही जखमी अवस्थेतील दिसली तरी आपण कडेने निघून जातो. दारात काय गल्लीतही त्यांचा आवाज आला, तर दगड मारायला कोणी मागेपुढे पाहत नाही; पण कोल्हापुरातील दाक्षायणी आणि शर्वाणी जाधव या दोन्ही बहिणी अशा जखमी कुत्री व मांजरांना आपल्या घरात आसरा देऊन त्यांचे खाद्य, सेवाशुश्रूषा, औषधोपचार करतात. गेल्या १५ वर्षांत त्यांनी २५0 हून अधिक कुत्री व मांजरांना जीवदान दिले आहे.

कोल्हापुरातील साळोखेनगर परिसरात राहणाºया दाक्षायणी या जर्मन व इंग्रजी भाषेचे क्लासेस घेतात, तर शर्वाणी या सीए आहेत. आई-वडिलांच्या संस्कारातून आलेले ‘प्राण्यांवर दया करा’ हे वाक्य त्यांनी प्रत्यक्ष जीवनातही अंगीकारले. भटक्या कुत्र्यांचा त्रास हा काही नवीन विषय नाही; पण त्यांनाही जीव आहे, वेदना होतात हेच आपण विसरून गेलो आहोत. १५ वर्षांपूर्वी एका कुत्रीला मारून महापालिकेचे कर्मचारी निघून गेले. तिच्या लहानग्या पिलांची केविलवाणी अवस्था बघून दाक्षायणी यांनी त्यांना घरी आणले आणि तेथूनच कुत्री व मांजरांच्या सेवाशुश्रूषा व संगोपनाला सुरुवात झाली. सुरुवातीला आई-वडिलांची नाराजी होती, पण आपल्या मुली एक चांगलं काम करताहेत, या भावनेतून त्यांनीही या कामाला साथ दिली.या बहिणी कुठेही जाताना एखादे कुत्रे किंवा मांजर जखमी अवस्थेत दिसले, तर त्याला घरी आणून औषधोपचार, जेवण, डॉग फूड, शुश्रूषा करतात. ते बरे झाले की सोडून देतात. हे प्राणी खूप लहान असेल तर इच्छुक कुटुंबांना सांभाळण्यासाठी देतात. एवढ्यावरच न थांबता ते कुत्र्यांचे निर्बीजीकरणदेखील करून आणतात. हे सगळे त्या स्वखर्चाने करतात.

घरात जिथे एका प्राण्याला सांभाळणे त्रासदायक असते, तिथे सध्या १५ कुत्री आणि १५ मांजरांना आपले व्याप पाहून त्या सांभाळतात. स्वत:साठीचा खर्च बाजूला ठेवतात, घर बंद ठेवून किंवा एकत्र कोठेही त्यांना जाता येत नाही. अनेकदा या प्राण्यांचा त्यांना त्रासही होतो, मात्र परिसरातील नागरिकांना त्यांचा त्रास होऊ नये याची काळजी घेतात. अनेक तडजोडी आणि प्रसंगी विरोध पत्करून त्यांनी हे काम अखंड सुरू ठेवले आहे. प्राण्यांशी ट्युनिंग जुळलं की ते आपल्याला त्रास होऊ नये याची काळजी घेतात. ते विनाकारण आपल्याला त्रास देत नाहीत. त्यांना मारणे हा उपाय नाही, तर पर्यायी सक्षम यंत्रणा हवी असे त्यांचे म्हणणे आहे.

(लेखक कोल्हापूर ‘लोकमत’मध्ये वरिष्ठ बातमीदार आहेत.)