शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे ‘गुगल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 06:05 IST

पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशांवरून त्यांची ओळख पटवली जायची. मात्र हे तंत्र आता कालबाह्य झाले आहे. हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधला चेहरा  एवढंच काय, नुसत्या छायाचित्रावरूनही आता गुन्हेगारांची ओळख पटवता येईल. पोलिसांनी आतापर्यंत साडेसहा लाख गुन्हेगार संगणकावर आणले आहेत. ‘अँम्बीस’ प्रणालीनं त्यांची ‘ओळख’ एक कळ आणि एका बोटावर आणली आहे!

ठळक मुद्देमुंबईतील 85 गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांच्या हाती लागलेल्या ठशांवरून या प्रणालीने 118 आरोपींची ओळख एका झटक्यात पटवून दिली होती. 

- मनीषा म्हात्रे

फक्त बोटांच्या ठशांवरून गुन्हेगारांचा काढला जाणारा माग आता कालबाह्य ठरला आहे. बोटांच्या ठशांसोबत बुबुळांचे प्रतिबिंब, हाताच्या तळव्यांचे ठसे, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला चेहरा किंवा छायाचित्रांद्वारे संशयितांची, आरोपींची, गुन्हेगारांची ओळख आता चुटकीसरशी पटवता येईल आणि त्यांना गजाआड टाकणेही त्यामुळे फारच सोपे होईल. त्यासाठी कारणीभूत ठरणार आहे, ते म्हणजे ‘पोलिसांचे गुगल!’काय आहे हे पोलिसांचे गुगल?या प्रणालीचे नाव आहे ‘अँम्बीस’(ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेण्टिफिकेशन सिस्टीम). ही प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यात, सीसीटीव्ही, सीसीटीएनएस (क्राइम अण्ड क्रीमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँण्ड सिस्टीम) एकत्रिकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याने, देशभरातील गुन्हेगारांचा तपशील आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.2008 मध्ये शहरावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पुढच्याच वर्षी सीसीटीएनएस (क्राइम अँण्ड क्रीमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँण्ड सिस्टीम) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या अंतर्गत देशातील सर्व गुन्हेगारांचा तपशील, गुन्ह्यांची माहिती सीएएसच्या (कोर अँप्लिकेशन सॉफ्टवेअर) मदतीने एकत्रित करण्यात आली. बंगलोरच्या आयटी फर्म कंपनीद्वारे ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे एफआयआर, आरोपपत्र, गुन्हेगाराचा फोटो, त्याचा इतिहास, त्याची शारीरिक माहिती. या सार्‍याला डिजिटल स्वरूप आले.राज्यातील सीसीटीएनएसचे मुख्यालय पुण्यात आहे.  2010 मध्ये त्यात, प्रगती होत बोटांच्या ठशांवरून गुन्हेगारांचा माग सुरू झाला. त्यासाठी स्वतंत्र अशा फिंगर प्रिंट ब्युरोची (अंगुली मुद्रा केंद्र) स्थापना झाली. राज्यात मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी याची केंद्रे आहेत. तज्ज्ञांच्या मदतीने गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे कागदावर उमटवण्यास सुरुवात झाली. याचा एकत्रित तपशील या ब्युरोकडे पाठविण्यात येत होता.  

पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरताना केवळ बोटांचे ठसेच नाही तर हाताचे तळवे, चेहरा व डोळे स्कॅन करून ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी प्रय} सुरू झाले.याबाबतचा प्रस्ताव सायबर पोलिसांकडे आल्यावर महाराष्ट्र सायबरचे प्रमुख ब्रिजेश सिंह, सायबर अधीक्षक बालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अविनाश सरवीर, रूपाली गायकवाड, सुरेश मगदून, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, उल्हास भाटले, संदीप जाधव यांनी काम सुरू केले. अवघ्या 20 दिवसात याबाबतचा अहवाल त्यांनी शासनाकडे पाठवला. 2017 मध्ये पथकाने काम सुरू केले. एकाचवेळी साडेसहा लाख गुन्हेगारांचे तपशील या यंत्रणेत उपलब्ध आहेत.2018मध्ये इन्स्टॉलेशनचे काम झाले. राज्यातील 1160 पोलीस ठाणी, 10 जिल्हे, 10 मध्यवर्ती कारागृहे, 7 प्रादेशिक कार्यालयांत या प्रणालीचे हार्डवेअर पोहोचविण्यात आले.  फिंगर प्रिंट आणि डोळ्याचे स्कॅन करणारी मशिन्स देण्यात आली. सुरुवातीला 50 जणांचे पथक या प्रणालीच्या कामात गुंतले होते. सीसीटीएनएससारखेच अँम्बीस प्रणालीच्या यंत्रणेचे इंट्रानेटचे जाळे पुण्यातून मुंबईसह राज्यभरात पसरले.या नव्या प्रणालीने पोलिसांचे काम बरेच सोपे केले आहे. छायाचित्रावरून किंवा सीसीटीव्हीत कैद केलेल्या चित्रणावरूनही गुन्हेगारांची ओळख पटू शकेल, त्यांची इत्थंभूत माहिती पोलिसांना मिळू शकेल. महाराष्ट्र सायबरने पुढाकार घेत ही अद्ययावत प्रणाली विकसित केली. शहरातील 94 पोलीस ठाण्यांमध्ये या प्रणालीचा प्रयोग केल्यानंतर राज्यातील 1160 पोलीस ठाण्यांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित होईल. ही देशातील पहिली प्रणाली असून, गुन्हेगारांची संपूर्ण माहिती याद्वारे मिळणार आहे.मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून ही प्रणाली राबविण्यात येत आहे. सुमारे 200हून अधिक पोलीस कर्मचार्‍यांना या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लवकरच आणखी 2600 पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या प्रकल्पाअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये संगणक आणि हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती यंत्रणा थेट मुख्य डेटाबेसशी जोडलेली असणार आहे.या प्रणालीमुळे तपास अधिकार्‍यांच्या हाती सीसीटीव्हीचे अंधुक, अस्पष्ट चित्रण असले तरी त्याचा फायदा होऊ शकतो. दहा मिनिटांच्या सीसीटीव्ही चित्रणातून ही प्रणाली आरोपीची असंख्य छायाचित्रे, चित्रणाचे छोटे भाग तयार करते. चेहर्‍याचा 26 टक्के भाग दिसल्यासही प्रणाली आरोपीची ओळख  पटवू शकते.गुन्ह्यांची झटपट उकल करून दोषसिद्ध दर वाढवू शकेल अशी ही अद्ययावत प्रणाली पोलिसांसाठी गुगल सर्च इंजिनप्रमाणे काम करेल. त्यामुळे गुन्हेगारांना वचक बसेल, गुन्हे कमी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केला आहे.राज्यात सीसीटीव्ही, सीसीटीएनएस आणि अँम्बीस प्रणालीचे एकत्रिकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच देशभरातील गुन्हेगारांचा तपशील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. गुन्हे शोधासाठी ही प्रणाली पोलिसांना अतिशय उपयुक्त तर ठरेलच, गुन्हेगारांनाही यामुळे वचक बसेल.

मिनिटात पटणार गुन्हेगाराची ओळख!एखाद्या गुन्ह्यांत पहिल्यांदाच अटक होणार्‍या आरोपीच्या बोटांच्या ठशांपासून सर्व गोष्टी या प्रणालीत जतन करण्यात येतील. जेणेकरून दुसर्‍यांदा त्याने कुठला गुन्हा केल्यास त्याला पकडणे सोपे होईल.मुंबईसह राज्यातील दहा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचेही तपशील ‘अँम्बीस’मध्ये घेण्यात येत आहेत. जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीने पुन्हा गुन्हा करणार्‍यांना सहज पकडणे शक्य होणार आहे. एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यास त्याठिकाणचे फिंगर प्रिंट अँम्बीसमध्ये सर्च केल्यास, त्याचा तपशील उपलब्ध असल्यास तात्काळ त्याविषयची माहिती मिळणे आता सहज शक्य आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या ठिकाणीच अवघ्या काही मिनिटातच चोर कोण, हे समजणे शक्य होईल. राज्यात मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी फिंगर प्रिंट ब्युरो आहेत. तेथील तज्ज्ञाच्या मदतीने या प्रणालीचे कामकाज चालणार आहे.

पहिल्याच प्रयत्नात 85 गुन्ह्यांची उकल!गुन्ह्यांच्या ठिकाणी मिळालेले हाताचे ठसे, विविध खुणा अथवा अन्य पुराव्यांना चान्सप्रिंट म्हणतात. गुन्ह्यांत मिळालेल्या चान्सप्रिंट या प्रणालीअंतर्गत सर्च करण्यात येतात. मुंबईतील 85 गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांच्या हाती लागलेल्या ठशांवरून या प्रणालीने 118 आरोपींची ओळख एका झटक्यात पटवून दिली होती. यापूर्वी एखादी चान्सप्रिंट मिळाल्यास स्वत: त्याचे कामकाज करावे लागत असे. साडेसहा लाख आरोपींच्या तपशिलातून त्याचा माग घेणे शक्य नव्हते. या प्रणालीमुळे ते सहज शक्य झाले.

10 मिनिटांच्या फुटेजचा खेळ!या प्रणालीमुळे तपास अधिकार्‍यांच्या हाती सीसीटीव्हीचे अंधुक, अस्पष्ट चित्रण असले तरी त्याचा फायदा होऊ शकतो. दहा मिनिटांच्या सीसीटीव्ही चित्रणातून ही प्रणाली आरोपीची असंख्य छायाचित्रे, चित्रणाचे छोटे भाग तयार करते. चेहेर्‍याचा 26 टक्के भाग दिसल्यासही प्रणाली आरोपीची ओळख  पटवू शकते. यात, एकावेळी दहा एमबीपर्यंतचे फुटेज सर्च केले जाऊ शकते. 

फिंगर प्रिंटसाठी मोबाइल स्कॅनरचा वापरफिंगर प्रिंट गोळा करण्यासाठी मोबाइल स्कॅनरचा वापर करण्यात येत आहे. त्यात, या प्रणालीसाठी 41 युनिटमधील, 1160 पोलीस ठाण्यात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. 2600 पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.अँम्बीस प्रणालीसह विविध प्रणालींसाठी पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र तंत्रज्ञान कक्ष उभारण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक संदीप सावंत त्यावर देखरेख ठेवतात.  

35 वर्षांपूर्वीच्या ठशांमुळे अडकला होता छोटा राजन!कुख्यात गँगस्टर छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याला इंडोनेशियाकडून भारताच्या ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 35 वर्षांपूर्वी घेतलेले त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे ओळख पटविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले होते. एका वॉचमनची हत्या व पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी छोटा राजनला टिळकनगर पोलिसांनी 1980 मध्ये अटक केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी याच पोलिसांनी अजून एका हत्येप्रकरणी पुन्हा त्याला अटक केली होती. त्या वेळी हाताचे ठसे घेतले होते. त्यानंतर तब्बल 33 वर्षांनंतर तो इंडोनेशियात सापडला. मात्र आपण मोहनकुमार असल्याचे तो सांगत असल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी फिंगर प्रिंट्सची मूळ कॉपी शोधण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात आले. त्यासाठी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मनीषा शिर्के यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांचे पथक तब्बल आठवडाभर पोलीस ठाण्याच्या ‘रेकॉर्ड रूम’मधील हजारो कागदपत्रे तपासत होते. अखेर राजनच्या हातांच्या ठशांचे कागद तुकड्यांमध्ये आढळले. अतिवृष्टीवेळी त्या फिंगर प्रिंट भिजल्या होत्या. त्यात या कागदांचे तीन तुकडे झाले होते. मात्र पोलिसांनी ते जुळवून स्कॅन करून पाठविले. इंडोनेशिया दूतावासाने या पुराव्याच्या आधारावर राजनचा ताबा भारताकडे दिल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. मात्र आता सर्व डिजिटल झाल्यामुळे पोलिसांची ही कसरत थांबणार आहे.

manishamhatre05@gmail.com(लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत गुन्हे वार्ताहर आहेत.)