शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शरीरमाद्यंखलु सर्व साधनम्!

By admin | Updated: September 19, 2015 14:49 IST

वय वाढतं तसे आपल्या जीवनात अनेक बदल घडत असतात. त्यातला प्रमुख म्हणजे शारीरिक!तारुण्यातला उत्साह, शक्ती नंतरच्या काळात पेलवत नाहीच. यावर उपाय काय? अमेरिकेत त्यासाठी सप्टेंबर महिन्याची निवड करण्यात आलेली आहे. त्या महिन्यालाही तिथे‘हेल्दी एजिंग मन्थ’ म्हटलं जातं.

- दिलीप वि. चित्रे 
 
घडय़ाळाची टिक टिक अविरत चालूच असते. पण त्या सेकंदा- सेकंदात पुढे धावणा:या काटय़ाबरहुकूम आपले वय वाढत असते ही जाणीव आपल्याला नेहमीच ध्यानात असते असे नाही. वाढत्या वयानुसार आपल्या जीवनात अनेक बदल घडत असतात; त्यातला प्रमुख बदल म्हणजे शारीरिक! तरुणपणात असणारा उत्साह, शक्ती आपल्याला अर्थातच नंतरच्या काळात पेलवत नाही.
यावर उपाय काय? काय करता येईल, काय करू नये इत्यादि गोष्टींवर भर देण्यासाठी व लोकांचे लक्ष यावर केंद्रित व्हावे म्हणून अमेरिकेत सप्टेंबर महिन्याची निवड करण्यात आलेली आहे. सप्टेंबरला ीं’3ँ8 अॅ्रल्लॅ टल्ल3ँ म्हणण्यात येते. ‘व्हॅलेण्टाईन डे’ चा फेब्रुवारी महिना, ‘मदर्स डे’ चा मे महिना आणि ‘फादर्स डे’ चा जून महिना यातल्या उत्सवप्रियतेपेक्षा सप्टेंबर महिना जास्त महत्त्वाचा नाही का? ‘शरीरमाद्यं खलु सर्व साधनम्!’, ‘जया अंगी शक्ती, तया असे मुक्ती’, ‘बळी तो कान पिळी’ या विधानांना अर्थ आहेच ना!
वडिलोपाजिर्त धन-दौलतीवर पुढल्या पिढीचे लक्ष लागलेले असते. ती धनदौलत म्हणजे नुसती आर्थिकच. वडिलोपाजिर्त मिळणा:या अन्य धन-दौलतीवर म्हणजे संस्कार, आरोग्य, सुसंस्कृतता, विनयशीलता या गोष्टींचा कोणीच कसा विचार करत नाही? जे करत असतील त्यांना माङो शतश: प्रणाम! त्याबाबतीत मी फारच नशीबवान ठरलो म्हणायचं! कारण, वडिलोपाजिर्त मिळणारी अधिक धनदौलत फक्त वगळता इतर गोष्टींमधली श्रीमंती मला भरपूर मिळाली. पण आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य. ते जर उत्तम असेल तर कुठलीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकता. टं33 ट्रूे’’ील्ल नावाच्या एका डॉक्टरानं त्यासंबंधी काही मौलिक सूचना दिल्या. 
त्यानं त्याच्या एका लेखात लिहिलं.
4 सतत कार्यरत राहा. नियमित व्यायामामुळे शरीर उद्योगी आणि बुद्धी तीक्ष्ण राहू शकते.
- समाजशील बना, मित्र-मैत्रिणी जोडा, स्वयंसेवी वृत्ती अंगी बाळगा, वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी व्हा इत्यादि.
4कडधान्ये, पचन प्रक्रियेस उपयुक्त ठरणारा आहार, तंतुमय (ऋ्रुी1) पदार्थ असलेले अन्न अधिक प्रमाणात ग्रहण करा.
4औषधांमुळे जर जिभेची चव गेली असेल तर थोडय़ा प्रमाणात आवडणारे चविष्ट (मसालेदार) पदार्थ खा.
4योगा किंवा ळं्र उँ्र च्या व्यायामामुळे शारीरिक समतोल राखण्याचा प्रयत्न करा.
4हृदय आणि फुफ्फुसांच्या व्यायामासाठी दररोज भरभर चालण्याचा व्यायाम करा.
4रात्रभर गाढ निद्रेची आवश्यकता असते. निद्रानाशाची व्याधी असेल तर त्यावर उपचार करा.
4कुठल्याच गोष्टीचा उत्साह वाटत नसेल, मानसिक विमनस्कता (ीिस्र1ी22्रल्ल) वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
4स्मरणशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करा. लक्षात राहण्यासाठी गोष्टी लिहून ठेवण्याची सवय करा. धावपळ कमी करा.
शारीरिक आरोग्य आणि मानसिक संतुलन या दोन्ही गोष्टी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून चालणा:या असतात. एकीचा :हास होताच दुसरीही कोलमडते. आरोग्यदायी जीवनशैली म्हणजे विचारपूर्वक स्वीकारलेला सामाजिक, भावनिक, शारीरिक, बौद्धिक, धार्मिक इत्यादि संतुलनातून घडणारा प्रवास. हे संतुलन साधण्यासाठी शरीरसौष्ठव, पौष्टिक आहार, धडधाकटपणा, मानसिक आघात पेलण्याची क्षमता आणि पुरेसे आर्थिक बळ या गोष्टींची आवश्यकता असावी लागते. 
अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वत:च आपल्याला हव्या असणा:या आणि पेलणा:या वास्तववादी, वस्तुनिष्ठ ध्येयांची आखणी करून त्यांच्या परिपूर्ततेसाठी प्रामाणिक प्रयत्न करणो, सतत निरोगी, आनंदी जीवनशैली सांभाळणो ही साधी गोष्ट नाहीच; परंतु तसे केल्यामुळे केवळ शरीरावरच नव्हे, तर मानसिकतेवरसुद्धा होणा:या सकारात्मक परिणामांची योग्यता खूपच उच्च दर्जाची असते हे नि:संशय.
4टीन एजर्स असोत अथवा वृद्ध, तुम्ही स्वत:च निवडलेल्या ध्येयांची पूर्तता तुम्हाला करता येईल अशीच ध्येये निवडा.
4दूरवरच्या भविष्यातील ध्येये आत्ताच ठरवू नका. नजीकच्या भविष्यात ज्यांची पूर्तता करता येईल अशीच निवडा. ती साधी सोपी ठेवण्याचा प्रयत्न करा.
4तुम्ही आखणी केलेल्या ध्येयांची यादी तयार करून ती सतत दृष्टीसमोर राहील अशा ठिकाणी (रेफ्रिजरेटरवर) टेकवून ठेवा.
4योग्य आहार : उचित आहार हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे हे विसरू नका. अभ्यासाने सिद्ध केलेली गोष्ट म्हणजे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या व्याधींवर योग्य आहारामुळे नियंत्रण ठेवता येते.
4शारीरिक वजन भरमसाठ वाढू न देता त्यावर ताबा ठेवणो हे महत्त्वाचे. नियमित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे ते शक्य होऊ शकते.
4धूम्रपान आणि अल्कोहोल (दारू) यांच्यावर नियंत्रण ठेवा. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण हे सत्य आहे की वरील सर्व गोष्टींशी झुंजता यावे यासाठी महत्त्वाचे आहे ते शरीर! म्हणतात ना, ‘शरीरमाद्यं खलु सर्व साधनम्!’
 
उतारवयातलं पथ्य
DACCO (Drug abuse and comprehensive coordinating office) या संस्थेनं शारीरिक आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीनं पुढील काही गोष्टी सुचवल्या आहेत.
=भरपूर पाणी प्या (दिवसाला निदान 6 ते 8 ग्लास भरून).
=भरपूर चाला.
=शक्यतो पाकिटातून मिळणारे तयार अन्न (Frozen food) टाळा. ताजे अन्न खाण्याची सवय करा.
=जिने चढण्या-उतरण्याचा व्यायाम करा.
=कुटुंबातील व्यक्ती, मित्र-मैत्रिणी यांच्यासह हसत-खेळत व्यायाम करण्याची सवय लावा.
=नियमितपणो व्हेकेशन घेत जा. प्रवास करा.
=दुपारचे, मधल्या वेळचे खाणे टाळू नका.
=दिवसातला काही वेळ स्वत:साठी राखून ठेवत जा.
=बरे वाटत नसेल तेव्हा जवळच्या मित्र-मैत्रिणी अथवा जवळचे नातेवाईक यांच्याशी मोकळेपणानं संवाद साधा.
=सकाळची न्याहारी टाळू नका. शरीराला पुरवलेले ते महत्त्वाचे इंधन असते.
=निदान सात तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा.
=घराबाहेरच्या मोकळ्या हवेत जास्त वेळ काढण्याचा हव्यास धरा. 
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह,  ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगीतिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम / संस्थांचे संपादक, 
संयोजक, संघटक)
dilip_chitre@hotmail.com