शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

चेंडूसारखा ग्रेनेड येऊन थडकला आणि माझ्या समोर स्फोट झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 13:15 IST

26/11 Terror Attack : दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी केलेला मुंबईवरील हल्ला मी कधीच विसरू शकणार नाही. तो दिवस, ती रात्र मला अजूनही लख्ख आठवते.

- सदानंद दाते (प्रमुख, राज्य दहशतवाद विरोधी विभाग) दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी केलेला मुंबईवरील हल्ला मी कधीच विसरू शकणार नाही. तो दिवस, ती रात्र मला अजूनही लख्ख आठवते. रात्री निद्राधीन होण्याच्या तयारीत असतानाच दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी गोळीबार झाल्याचे वृत्त कानी आले. मी तडक मलबार हिल पोलिस ठाणे गाठले. तिथून एके-४७ घेऊन सहकाऱ्यांसोबत हल्लेखोरांच्या दिशेने झेपायचे असा मनसुबा होता; परंतु पोलिस ठाण्यात एके-४७ उपलब्ध नव्हती. एकच कार्बाइन होती. ती घेतली आणि सीएसएमटी स्थानकाकडे पथक रवाना झाले. 

कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांनी रुग्ण आणि डॉक्टरांना ओलिस धरल्याचे समजले. आम्ही त्या दिशेने चाल केली. ‘कामा’च्या प्रवेशद्वारावरच आम्हाला दोन मृतदेह दिसले. आमच्यापुढे काय वाढून ठेवले आहे, याची जाणीव तिथेच झाली. गोळीबार करणारे प्रसूतिगृह इमारतीच्या छतावर पोहोचल्याने आम्ही लिफ्टने सहाव्या मजल्याकडे निघालो. माझ्याकडे बुलेटप्रूफ जाकीट होते. म्हणून मी सगळ्यात पुढे राहण्याचे ठरविले. तिथूनच आमची आणि दहशतवाद्यांची चकमक सुरू झाली. अर्धवट उघड्या दरवाजाच्या दोन-तीन पावले मागे उभे राहूून मी जिन्यात इलेक्ट्रिक पाइपच्या क्लिप्स टाकल्या. त्याबरोबर आमच्यावर एके-४७च्या गोळ्यांचा भडिमार सुरू झाला. नंतर कसाबच्या चौकशीत कळले की, तो आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांनी आमच्या क्लिप्सना हँडग्रेनेड समजून गोळीबार केला होता. 

प्रसंग बाका होता. छतावर रुग्ण-डॉक्टरांना ओलिस ठेवलेले अत्याधुनिक शस्त्रधारी दहशतवादी. आणि आमच्याकडे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, कार्बाइन अशी शस्त्रे. असमतोल होता; परंतु परिस्थितीवर मात करण्याचा आम्ही चंग बांधला होता. छताकडून येणाऱ्या जिन्यावर लक्ष ठेवून आम्ही भिंतीचा आडोसा घेतला. एकीकडे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून होतो. तर दुसरीकडे रुग्णालयाच्या छतावरील दहशतवाद्यांचा बीमोड करण्याची शिकस्त सुरू होती.  

नियंत्रण कक्षाशी बोलत असतानाच लिफ्टच्या दरवाजावर हिरवा, चेंडूसारखा ग्रेनेड येऊन थडकला आणि माझ्या अगदी समोर त्याचा स्फोट झाला. त्या हँडग्रेनेडच्या स्फोटाने आमचे साथीदार पोलिस उपनिरीक्षक मोरे शहीद झाले, इतर सर्वच जण जखमी झाले. माझ्याही डोळ्यांत, गळ्याशी, चेहऱ्यावर ग्रेनेडच्या स्प्लिंटरच्या जखमा झाल्या. डोळ्यांतल्या जखमेने कही क्षण माझ्यासमोर अंधारी आली. त्यातून सावरून मी छताच्या दिशेने गोळीबार करून भिंतीचा आडोसा पकडला. ही चकमक पुढची सुमारे ४०-४५ मिनिटे चालली. त्यांनी फेकलेला पाचवा ग्रेनेड माझ्या अगदी जवळ, पायापाशीच फुटला. मला जाणवलेली सर्वांत वेदनादायी जखम या ग्रेनेडमुळे झाली. काही वेळ त्या आवाजाच्या आणि जखमेच्या धक्क्याने मला ग्लानी आली. या दहशतवादी हल्ल्यात आमचे अनेक साथीदार शहीद झाले; मात्र त्या रात्री मुंबई पोलिसांनी दाखविलेल्या कर्तव्यनिष्ठेचा आणि बहादुरीचा मला अभिमान आहे. (‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ या सदानंद दाते यांच्या पुस्तकातून साभार)

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला