शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

100 वर्षे जुन्या वस्तू येथे काेट्यवधी रुपयांना मिळतात

By मनोज गडनीस | Updated: January 29, 2023 12:46 IST

डोक्यावर जे.जे. फ्लायओव्हर आणि त्याच्या सावलीत गजबजलेल्या मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील मिनारा मशिदीच्या समोरच्या बाजूने पायधुनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात उजवीकडे वळले की आपली पावले आपोआपच समोरच्या फुटपाथवर जातात.

- मनोज गडनीस डोक्यावर जे.जे. फ्लायओव्हर आणि त्याच्या सावलीत गजबजलेल्या मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील मिनारा मशिदीच्या समोरच्या बाजूने पायधुनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात उजवीकडे वळले की आपली पावले आपोआपच समोरच्या फुटपाथवर जातात. याचे कारण म्हणजे, त्या फुटपाथवर दिसतात अँटिक अर्थात दुर्मीळ वस्तूंनी भरलेली दुकाने. इतिहासाचे साक्षीदार राहिलेल्या या वस्तू बघण्यासाठी मग आपणही त्या फूटपाथवर रेंगाळतो. एरवी अँटिक वस्तू म्हटलं की, लोक आवर्जून उल्लेख करतात तो चोर बाजाराचा; पण चोर बाजाराच्या कित्येक पटींनी वैविध्यता असलेली ही दुकाने पायधुनीमध्ये १०० पेक्षा जास्त वर्षे आहेत अन् इथे वर्षभरात हजारो लोक येऊन आपल्या आवडीच्या वस्तूंची खरेदी करत घर अथवा कार्यालय सजवतात. १९२५ पासून अँटिक वस्तूंचे दुकान चालविणारे अनिस उल रेहमान यांची ही पाचवी पिढी आहे.

इथे केवळ भारतीयच नाही तर परदेशातूनदेखील अनेक लोक येतात. अनेक सिनेमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या दुर्मीळ वस्तू अशाच दुकानांतून खरेदी केल्या जातात, असे त्यांनी सांगितले. अन्य एक व्यापारी, आमीर शाहिद यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून एक वेगळा ट्रेंड पाहायला मिळतो. एखाद्या राजाची तलवार, राणीचे आभूषण किंवा राजवाड्यात वापरले गेलेले दिवे, खुर्च्या, सुरया या वस्तूंची प्रतिकृती साकारली जाते. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे अशा वस्तू बनविण्याचे मोठे कारखाने आहेत. येथून या वस्तू अँटिक मार्केटमध्ये विकण्यासाठी येतात. या बाजारात किंमत वस्तूला नव्हे, तर हौसेला आहे.

किमतीचा अंदाज कसा लावणार?ज्या खरोखर दुर्मीळ वस्तू आहेत, त्यांची किंमत निश्चित असते; पण ती दुकानदाराच्या मनात. ग्राहक आल्यानंतर घासाघिशीनंतर त्याची खरी किंमत ठरते; पण मुंबईच्या या बाजारातून आपल्या आवडीच्या वस्तूसाठी दोन ते तीन कोटी रुपयांपर्यंतदेखील पैसे लोकांनी मोजले आहेत. 

 मुगल-ए-आझमचा किस्सा...मुगल-ए-आझम या चित्रपटातील दृश्यांसाठी वापरल्या गेलेल्या वस्तू या अनिल उल रेहमान यांच्याच दुकानातून गेल्या होत्या, तर अभिनेत्री मुमताजपासून असंख्य कलाकार, दिग्दर्शक यांचा या दुकानामध्ये कायम राबता असायचा.

हत्यारांचे आकर्षणअलीकडे सिनेमा किंवा ओटीटीवर ऐतिहासिक सिनेमा अथवा सिरीज करण्याचा मोठा ट्रेंड आहे. यामधील पात्रांकडे त्यांची जी हत्यारे असतात, त्यांच्या प्रतिकृतींना मोठी मागणी आहे. 

 

टॅग्स :Mumbaiमुंबई