एका रूग्णाला कुत्रा चावल्याने त्याला सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. अधिपारिचारिका यांनी आवश्यक ते उपचार केले होते. तरी देखील मो. इब्राहीम मो. इम्रान यांनी शिवीगाळ करुन गैरवर्तन केले. या काळात सुरक्षा रक्षक हजर नसल्याने महिला कर्मचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून कायमच गैरवर्तणूक केली जाते. संबंधित इसमावर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी रूग्णालयातील ५९ कर्मचाºयांनी अर्धा तास काम बंद आंदोलन केले. तसेच रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात तुषार सूर्यवंशी, जी. आर. बैरागी, एस. पी. कांदे, प्रशांत सूर्यवंशी, टी. पी. सूर्यवंशी, एस. बी. कुलकर्णी आदिंसह कर्मचारी सहभागी झाले होते.
मालेगावच्या सामान्य रुग्णालयात काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 17:56 IST