शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा पुढीलवर्षीपासून राज्यस्तरावर होणार, ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा 

By नितीन काळेल | Updated: January 10, 2025 15:37 IST

साताऱ्यात स्पर्धेचे उद्घाटन; सांघिक भावना वाढीस मदत

सातारा : खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते. त्यामुळे पोलिस आणि महसूल विभागाप्रमाणेच पुढीलवर्षीपासून जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा विभाग आणि राज्यस्तरावरही सुरू करण्यात येतील, अशी महत्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांनी केली.सातारा येथे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री गोरे यांनी ही घोषणा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्यासह अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.मंत्री गोरे म्हणाले, सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा होत आहेत. यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी अशा सर्व घटकांना संधी मिळालेली आहे. त्यामुळे सर्वजण एक भावनेने स्पर्धेत सहभागी झाले असून उत्साहही दिसत आहे. स्पर्धेचे चांगले नियोजनही झाले आहे. क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिकरित्या आपण मजबूत होतो. त्यामुळेच मानसिकरित्याही खंबीर होण्याने संकटाशी सामना करता येतो. जिल्हा परिषदेच्या या स्पर्धा आता जिल्हास्तरावर होत आहेत. पण, पुढील वर्षीपासून विभाग आणि राज्यपातळीवर घेण्यात येतील.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यामुळे जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणतात. आपण सर्वजण सातारा जिल्हा विकासात आणखी पुढे घेऊन जाऊया. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. यामध्येही सातारा पुढे राहील, असा संकल्प करुया, असे आवाहनही मंत्री गोरे यांनी यावेळी केले.मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या, सातारा जिल्हा परिषदेची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी यंत्रणा आहे. या स्पर्धेत सर्वांचा सहभाग आहे. विविध १७ क्रीडा प्रकाराबरोबच सांस्कृतिक महोत्सवही होत आहे. या स्पर्धेत सर्वांनीच मनापासून खेळावे आणि शिस्त बाळगावी.क्रीडा ज्योत प्रज्वलीत अन् चित्ररथ..या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथम ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेचे उदघाटन झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्यालय आणि ११ पंचायत समितीच्या संघानी ओळख करुन दिली. त्यानंतर १२ चित्ररथ निघाले. वैविध्यपूर्ण असणाऱ्या या चित्ररथाचे सर्वांनीच स्वागत केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदministerमंत्रीJaykumar Goreजयकुमार गोरे