शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक लढविणे जिल्हा परिषदेच्या अभियंत्याला भोवले; निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 19:34 IST

नंदकिशोर मोरे हे अमरावती जिल्हा परिषदेच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागात कनिष्ठ अभियंता आहेत.

अमरावती : जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता नंदकिशोर रामाजी सागर (मोरे) यांनी वर्धालोकसभा मतदारसंघातून बहुजन सेना पुरस्कृत म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. मोरे हे परवानगी न घेता निवडणूक लढवित असल्याने त्यांच्यावर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांनी निलंबनाचे आदेश निर्गमित केले.

नंदकिशोर मोरे हे अमरावती जिल्हा परिषदेच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागात कनिष्ठ अभियंता आहेत. त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चे नियम (४) नुसार निवडणुकीमध्ये सहभाग घेता येत नाही. तथापि, मोरे यांनी वर्धालोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पुरावे प्रशासनाच्या हाती लागले आहेत. त्यामुळे सीईओ खत्री यांनी मोरे यांचे निलंबन करताना मुख्यालय धारणी येथील जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग ठेवले आहे. निलंबनकाळात महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयत्तर सेवा, निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे) या काळातील प्रदान (१९८१) मधील नियम ६८ नुसार निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील.

मोरे यांचा निर्वाह भत्ता जिल्हा परिषदेचा यांत्रिकी उपविभाग येथून काढण्यात येणार आहे. मोरे यांना खासगी नोकरी किंवा खासगी व्यवसाय करीत नसल्याचे प्रमाणपत्र दरमहा सादर करावे लागणार असल्याचे सीईओ खत्री यांनी आदेशात म्हटले आहे.

भूजल सर्वेक्षण विभागात कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदावर कार्यरत असताना, परवानगी न घेता मोरे हे निवडणूक लढवित असल्याप्रकरणी त्यांच्यावर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. - मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

लोकशाहीमध्ये मतदानाचा सर्वांना अधिकार आहे तसाच निवडणूक लढण्याचाही आहे. मी निवडणूक लढविण्यासाठी रीतसर परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. परंतु, ती नाकारण्यात आली.नंदकिशोर सागर ( मोरे)

टॅग्स :lok sabhaलोकसभाamravati-pcअमरावतीwardha-pcवर्धा