शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

झिकाचा वाढतोय धोका, राज्यात आठ रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 08:51 IST

झिकावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे.

मुंबई - राज्यात गेल्या दोन महिन्यांत झिकाचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखा एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा आजार प्राणघातक नसला तरी झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मेंदूचा आकार लहान होऊ शकतो.

पुण्यात सहा तर कोल्हापूर आणि संगमनेर येथे प्रत्येकी एक अशा आठ झिकाबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. एडिस डास सहसा दिवसा चावतात.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांसाठी जारी केल्या आहेत. झिकावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे.

झिकाचा प्रसार कशामुळे होतो?लैंगिक संपर्काद्वारे गर्भधारणेदरम्यान आईपासून गर्भापर्यंत संक्रमित होतो.रक्त आणि रक्त उत्पादनांचे संक्रमण अवयव प्रत्यारोपणाद्वारे

निदान कुठे होते?राष्ट्रीय रोगनिदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे तसेच व्हीआरडीएल प्रयोगशाळा नागपूर, मिरज, सोलापूर, अकोला व छ. संभाजीनगर येथे झिकाच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. 

उपचार काय?रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.तापाकरिता पॅरासिटामॉल घ्यावे. ऑस्पिरीन अथवा एन.एस.ए.आय.डी. प्रकारातील औषधांचा वापर करू नये.

केंद्राच्या मार्गदर्शक सूचना झिकाबाधित गर्भवतींवर लक्ष ठेवावे. त्यांची सतत तपासणी करावी. रुग्णालयांनी आपली संकुले एडिसमुक्त ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी. राज्यांनी निवासी भाग, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकामांच्या जागा, संस्था या ठिकाणी आरोग्य सुविधा बळकट कराव्या.रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम अधिक जास्त प्रमाणात राबवावेत.

टॅग्स :Zika Virusझिका वायरस